Article Section of TreKshitiZ Group

ट्रेकिंगसहयाद्रीच्या गडकिल्ल्यांमध्ये फिरत असतांना आपल्याजवळ जमा झालेली माहिती,चांगले वाईट अनुभव इतर लोकांबरांबर वाटता यावेत या विचारातूनच ‘लेख विभाग (आर्टिकल सेक्शन)‘ सुरु करण्यात आला. वृत्तपत्र, मासिके, वेब-साईटस्‌ इ. माध्यमातून गिर्यारोहण, गडकिल्ले इ. विषयांवर लेख या सेक्शनच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात येतात. ‘आर्टिकल सेक्शन‘ चे काम पुढील विषयांना धरून चालते.

१)गडकिल्ले -विविध गडकिल्ल्यांची माहीती, त्यांची भौगोलिक रचना, येण्या-जाण्याच्या वाटा, गडावर बघण्याची ठिकाणे, गडावर घडलेला इतिहास इ. संदर्भातील लेख.
२)गडकिल्ल्यांवरील गैरवर्तणूक - सहयाद्रीच्या विविध रांगामध्ये सामावलेल्या गडकिल्ल्यांनी आपल्या इतिहासामध्ये एवढी महत्वाची भुमिका बजावलेली असतांना देखील, येथे होणाऱ्या ऐतिहासिक गोष्टींची हेळसांड, गैरवर्तणूक इ. संदर्भातील लेख.
३)वृक्षमित्र - विविध गडकिल्ले आणि परिसरामध्ये वृक्षारोपण, वनसंवर्धन, वृक्षतोड अशा निसर्गविषयक विविध गोष्टींवरील लेख.

विविध लेखांवर मिळणाऱ्या प्रतिक्रियांवरुन असे नक्कीच म्हणता येईल की, वृत्तपत्र आणि इतर प्रसिद्धी माध्यमातून सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत पोहोचण्यासाठी ‘आर्टिकल सेक्शन‘ एक महत्वाची भुमिका बजावत आहे.