मुख्य उद्देश-
१) महाराष्ट्राचा संरक्षक म्हणून शतकानुशतके उभ्या असलेल्या सह्याद्रीचे नैसर्गिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक महत्त्व लोकांपर्यंत विशेषतः शाळा - कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे. २) शाळा - कॉलेजच्या विद्यार्थ्यांना रुक्ष वाटणाऱ्या मात्र प्रत्यक्षात अखंड प्रेरणेचा स्त्रोत असणाऱ्या आपल्या संघर्षमय इतिहासाविषयी सर्वांमध्ये आवड, जागृती आणि सार्थ अभिमान निर्माण करणे. ३) गड - किल्ल्यांची सफर बसल्या जागेवर परिणामकारकपणे घडवून आणणे. ४) ट्रेकिंग विषयी सर्वांमध्ये आवड निर्माण करण्याबरोबरच प्रवासाबद्दल, सुरक्षेबद्दल महिती पुरवणे. ५) गड - किल्ल्यांच्या संवर्धनाविषयक, स्वच्छताविषयक कर्तव्याची जाणीव आणि या संदर्भातील विविध उपक्रमांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे. स्लाईड - शो चे विविध विषय - १) सह्याद्रीचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक महत्त्व. २) सह्याद्रीतील विविध किल्ल्यांची माहिती. ३) शिवरायांचे चरित्र. ४) शिवरायांची युध्दरिती. क्षितिज ग्रुपने आतापर्यंत या विषयांवर विविध ठिकाणी अनेक स्लाईड - शो सादर केले आहेत. |