Trekking with TreKshitiZ Group

ट्रेकिंग


क्षितीज ग्रुपचा सर्वात आवडता उपक्रम म्हणजे सर्व निसर्गप्रेमींना ट्रेकिंगला घेऊन जाणे आणि अधिकाधिक लोकांमध्ये ट्रेकिंगबद्दल आवड निर्माण करणे.

मुख्य उद्देश-
१)सहयाद्रीच्या बळावर हिंदवी स्वराज्याचे स्वप्न ज्यांनी पाहीले व अथक प्रयत्नांनी ते साकार केले अशा शिवरायांच्या कार्याची ओळख करुन देणे.
२) महाराष्ट्राचा इतिहास घडवणाऱ्या,मराठमोळी संस्कृती अंगावर झुलवणाऱ्या आणि शिवरायांचा सहवास लाभलेल्या गडकील्ल्यांविषयीची ऐतिहासिक जाणिव निर्माण करणे.
३) स्वराज्याच्या रक्षणाकरता प्राणंचीही पर्वा न करता लढणाऱ्या तानाजी, बाजीप्रभू, मूरारबाजी आणि इतर अनेक अनामी वीरांच्या त्यागाची, शौर्याची ओळख आजच्या पिढीला करुन देणे.
४)आपला अखंड प्रेरणादायक इतिहास जागवतांनाच, पूर्वजांनी केलेल्या चूकांची माहिती,त्यांचे जहाल परीणाम आणि त्यापासून घ्यायचा बोध हे सर्व लोकांपर्यंत पोचवणे.
५)रोजच्या धकाधकीच्या,ताणतणावांनी भरलेल्या आयुष्यापेक्षा थोडे वेगळे निसर्गाशी जवळीक साधणारे असे आनंदाचे, विरंगुळयाचे क्षण इतरांनाही अनुभवता यावेत यासाठी ट्रेकिंगचे आयोजन करणे.
६)मानवी आक्रमणामूळे होणारी गडाची हेळसांड थाबवणे,तसेच नैसर्गिक साधन संपत्तीचे संरक्षण करणे.

मुख्य वैशिष्टये -
१) केवळ सहल अथवा मौजमजा म्हणून न जाता, गडाचा इतिहास,गहाची भौगेलिक परीस्थीती, गडाशी संबधीत घटना यांची माहीती पुरवली जाते आणि खऱ्या अर्थाने गड ‘पाहीला’ जातो.
२) गडाची स्वच्छता(कचरा गोळा करणे व योग्य ती विल्हेवाट लावणे) तसेच ही भावना इतरांपर्यंत पोचावी यासाठी गडांवर प्रतिबंधात्मक फलक लावणे. हे उपक्रम राबवले जातात.