Forum Home Forum Home > Information Section > Articles on Indian History
  New Posts New Posts RSS Feed - दिनविशेष 5 जानेवार
  FAQ FAQ  Forum Search   Events   Register Register  Login Login


दिनविशेष 5 जानेवार

 Post Reply Post Reply
Author
Message
chaitanya View Drop Down
Groupie
Groupie
Avatar

Joined: 12 Jul 2012
Location: Dombivli
Status: Offline
Points: 92
Post Options Post Options   Thanks (0) Thanks(0)   Quote chaitanya Quote  Post ReplyReply Direct Link To This Post Topic: दिनविशेष 5 जानेवार
    Posted: 05 Jan 2015 at 9:54am
दिनविशेष 5 जानेवारी

सन 1671,

मराठ्यांनी साल्हेर जिंकले
ऑक्टोबर 1670 मधे मोगलांचा कांचनबारी च्या लढाईत पराभव केल्यानंतर मराठ्यांचा आत्मविश्वास द्विगुणित झाला. लागलीच त्यांनी मोगली मुलुखात छापे मारायला सुरुवात केली. मराठ्यांनी त्रिंबकगड, औंढा, पट्टा, अचला, अहिवंत, रावळ्या - जावळ्या, मार्कंड्या हे किल्ले घेतले. प्रतापरावानी बुर्‍हाणपुराजवळचा बहादुरपुरा लुटला. शिवाजी महाराजांनी स्वतः स्वारी करुन मोगलांचे आणखी एक संपन्न शहर कारंजा लुटले. परत येताना शिवाजी महाराजांनी एक फौज साल्हेर घ्यायला पाठवली. वाटेत या फौजेने मुल्हेर लुटले. नंतर या फौजेने साल्हेर ला वेढा दिला. वेढा देण्यात जास्त वेळ घालवण्या ऐवजी मराठ्यांनी किल्ल्यावर हल्ला केला. या हल्ल्यात किल्लेदार फत्तुल्लाखान ठार झाला. आणि 5 जानेवारी 1671 रोजी साल्हेर वर मराठी निशाण फडकले.

Edited by chaitanya - 05 Jan 2015 at 9:54am
Back to Top
Sponsored Links


Back to Top
 Post Reply Post Reply
  Share Topic   

Forum Jump Forum Permissions View Drop Down

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd.

This page was generated in 0.451 seconds.