दिनविशेष 5 जानेवार |
Post Reply |
Author | |
chaitanya
Groupie Joined: 12 Jul 2012 Location: Dombivli Status: Offline Points: 92 |
Post Options
Thanks(0)
Posted: 05 Jan 2015 at 9:54am |
दिनविशेष 5 जानेवारी
सन 1671, मराठ्यांनी साल्हेर जिंकले ऑक्टोबर 1670 मधे मोगलांचा कांचनबारी च्या लढाईत पराभव केल्यानंतर मराठ्यांचा आत्मविश्वास द्विगुणित झाला. लागलीच त्यांनी मोगली मुलुखात छापे मारायला सुरुवात केली. मराठ्यांनी त्रिंबकगड, औंढा, पट्टा, अचला, अहिवंत, रावळ्या - जावळ्या, मार्कंड्या हे किल्ले घेतले. प्रतापरावानी बुर्हाणपुराजवळचा बहादुरपुरा लुटला. शिवाजी महाराजांनी स्वतः स्वारी करुन मोगलांचे आणखी एक संपन्न शहर कारंजा लुटले. परत येताना शिवाजी महाराजांनी एक फौज साल्हेर घ्यायला पाठवली. वाटेत या फौजेने मुल्हेर लुटले. नंतर या फौजेने साल्हेर ला वेढा दिला. वेढा देण्यात जास्त वेळ घालवण्या ऐवजी मराठ्यांनी किल्ल्यावर हल्ला केला. या हल्ल्यात किल्लेदार फत्तुल्लाखान ठार झाला. आणि 5 जानेवारी 1671 रोजी साल्हेर वर मराठी निशाण फडकले. Edited by chaitanya - 05 Jan 2015 at 9:54am |
|
Sponsored Links | |
Post Reply | |
Tweet
|
Forum Jump | Forum Permissions You cannot post new topics in this forum You cannot reply to topics in this forum You cannot delete your posts in this forum You cannot edit your posts in this forum You cannot create polls in this forum You cannot vote in polls in this forum |