Forum Home Forum Home > Information Section > Forts of Sahyadri in Hindi
  New Posts New Posts RSS Feed - दुर्गसंवर्धन संमे
  FAQ FAQ  Forum Search   Events   Register Register  Login Login


दुर्गसंवर्धन संमे

 Post Reply Post Reply
Author
Message
Deepali Lanke View Drop Down
Senior Member
Senior Member
Avatar

Joined: 16 Feb 2013
Location: Pune
Status: Offline
Points: 230
Post Options Post Options   Thanks (0) Thanks(0)   Quote Deepali Lanke Quote  Post ReplyReply Direct Link To This Post Topic: दुर्गसंवर्धन संमे
    Posted: 29 Jul 2013 at 2:25pm

                                     सारांश - दुर्गसंवर्धन संघ संमेलन , महाराष्ट्र ,पुणे

                                                                                                     - दीपाली लंके

प्रस्तावना: ट्रेकक्षितीज संस्था डोंबिवली कडून आम्ही चार जणांनी पुण्यात झालेल्या दुर्गसंवर्धन संघ सम्मेलन मध्ये २७ आणि २८ जुलै २०१३ रोजी आरती दुगल,दीपाली लंके,करण सोनी आणि श्रीक्रीष्णा जोशी यांनी प्रतिनिधित्व केले.

२७ जुलै २०१३ दिवस पहिला :-संध्याकाळी वाजता नाव नोंदणी आणि चहापाना नंतर परिचय आणि परिसंवादाचा कार्यक्रम चालू झाला.सगळ्या मान्यवराचे आगमन आणि सत्कार झाले.सहभागी झालेल्या दुर्ग संवर्धनाच्या प्रतिनिधीना व्यक्तिश: ओळख आणि करत असलेल्या संवर्धन कामाचा आढावा मांडण्याची संधी दिली. ट्रेकक्षितीज कडून श्रीक्रीष्णा जोशी यांनी प्रस्तावना आणि flex मधील कामाचा आढावा अगदी मार्मिक शब्दात मांडला.

उपस्थित असलेल्या अध्यक्षीय मंडळी मध्ये पांदुरंग बलकवडे, महेश तेंडूलकर, मांडे सर, अमोल कोल्हे,धनंजय देशपांडे होते आणि त्यांना त्यांचे अनुभव मांडण्याची विनंती करण्यात आली.

अगदी थोडक्यात आणि मार्मिक शब्दांमध्ये अध्यक्षीय मंडळीनि उपस्थित असलेल्या दुर्गप्रेमिंची मने जिंकून घेतली.आम्ही बलकवडे सरांचा इतिहासाचा गाढा अभ्यास अनुभवला तर मांडे सरांचे बोलके अनुभव एकले आणि आपल्या विशिष्ट शैलीने बोलताना त्यांनी उपस्थित असलेल्यांना खिळवून ठेवलं.त्याच वेळी या काळाचे शिवबा मानले जाणारे अमोल कोल्हे यांनी फोनेवरून संपर्क साधून दुर्गप्रेमीना संवर्धनाच्या पवित्र कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. आणि याच मंचावर धनंजय देशपांडे यांनी आपण स्वताचा मार्केटिंग कसा करावा आणि करत असलेल्या संवर्धन कार्याचा प्रचार आणि प्रसार कसा करावा याची शिकवण दिली. महेश तेंडूलकर यांनी आपले मत अगदी थोडक्यात मांडले.सगळ्यांचा एकंच म्हणन होतं जे काम हाती घेतलंय सगळ्यांच्या मदतीने अहं पण ठेवता शास्त्रोक्त पद्धतीने पूर्णत्वास न्या. रात्री उशिरा जेवण्यानंतर पहिल्या दिवसाचा समारोप झाला.

२८ जुलै २०१३ दिवस दुसरा :-

सकाळी :३० वाजता महत्वपूर्ण आणि व्याख्यान पूर्व दिवसाची सुरुवात शिवशाहीर बाबसाहेब पुरंदरे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिकृतीला हार घालून आणि दीप प्रज्ज्वलन करून झाली.बाबासाहेबांचे चरण स्पर्श करून अगदी धन्य वाटले आणि बाबासाहेब हे चालते बोलते शिवचरित्र आहे हे समजल. जीवन कृतार्थ झाल्याचा आनंद वाटला.

वैशिष्ट पूर्ण असलेल्या या दिवसात बर्याच अध्यक्षीय मंडळींच्या व्याख्यानाने दिवस गाजला.आणि संवर्धन कार्याला कशी गती आणि चालना देता येईल याचे मार्गदर्शन केले.प्रत्येक महोदयांच्या व्याख्यानाचा सारांश पुढीलप्रमाणे आहे:-

मिलिंद क्षीरसागर ( दुर्ग संवर्धन संघ ,महाराष्ट्र अध्यक्ष आणि शिवाजी ट्रेल चे मुख्य):-

मिलिंद सरांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील चालू असलेल्या संवर्धन कार्याचा आढावा सांगितला. NSS च्या माध्यमातून कशी कार्यशाळा आणि शिबीर घेवून संवर्धन कार्याला चालना देता येईल हे स्पष्ट केले.तसेच दीड वर्षापूर्वी स्थापन झालेल्या History Club च्या माध्यमातून कशी जागरूकता केली जाईल याचा संक्षिप्त आढावा मांडला. भविष्यातील योजनांमध्ये महाराष्ट्रातील सगळ्या विद्यापीठांना एकत्रित करून दुर्ग संवर्धना चे  धडे गिरविण्याचा मानस बोलून दाखवला.तसेच दगडू शेठ हलवाई  ट्रस्ट आणि त्या अख्यारीत असलेल्या गणेश मंडळांना वर्षातून दोनदा दुर्ग भेटीचे आवाहन केले. तसेच दुर्ग संवर्धना बद्दलची जागरूकता हि तरुणापेक्षा शालेय विद्यार्थ्या मध्ये Handbook आणि CD तून प्रचार ची करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे :-

आपल्या सर्वांचे लाडके प्रवक्ते, इतिहास तद्य, शिवशाहीर बाबासाहेब  पुरंदरे  यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी सुद्धा आपल्या कणखर पण सर्वाना समजेल अश्या शैलीत प्रेक्षकांना मंत्र मुग्ध केले.

महाराष्ट्र संतांची,वारकार्यांची तसेच धारकरी यांची भूमी मानली जाते.याच धारकरी संप्रदायात मोडणाऱ्या आणि जोडगोले असलेले गो.नि. दांडेकर आणि बाबसाहेब पुरंदरे येतात.

स्वातान्त्र्यावीर सावरकरांसोबत जवळून काम केलेल्या बाबासाहेबांनी शिवबा आणि जिजाई कडून बोध घ्यावा असे सुचविले.

संवर्धन च्या बाबतीत बोलताना ते म्हणाले गडकोटांवर जाण्यापूर्वी त्या गडाची रचना,इतिहास, आणि अभ्यास करूनच मग जावे. नियोजनबद्धता हि कुठल्याही कामासाठी यशाची गुरुकिल्ली असते असे सांगितले. रक्तातूनच या सगळ्या गोष्टी यायला हव्यात आणि निरीक्षणं करत राहावे हे सुचवले.

उदाहरणार्थ : सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दरवाज्यावर छोटे छिद्र आहेत ते शत्रूंवर गरम पाणी किंवा तेल टाकण्यासाठी आहेत हे सांगितले.

शिवाजी महाराजांच्या काळात त्यांनी सोनाराची संस्कृत भाषेवर असलेली पकड ओळखून त्यांना मंडळात शामिल करून घेतले आणि त्यांनीच पुढे संस्कुत भाषेवर ग्रथ लिहिला तो ग्रथ " करण कौस्तुभ " असून सद्य घडीला नासा मध्ये शास्त्रीय अभ्य्सासाठी ठेवण्यात आलेला आहे.

शिवशाहीर बाबसाहेब पुरंदरे  यांच्या व्याकरणात मी आणि अहं पणा नाही आणि ते अजून विद्यार्थी असून  शिवचरित्राचे पारायण केले तेवढे कमी आहे हे सांगितले.

त्यांचं एक तासाच व्याख्यान हे कधीच संपू नये असंच वाटत होतं.शेवटी सगळ्यांनी सह्याद्रीची वैभवलक्ष्मी असलेले गडकोट त्यांच्या हयातीत परत जिवंत करावेत हाच आशावाद मांडला. तसेच किल्ले वसई मोहीम श्रीदत्त राउत यांच्या पुस्तकचे प्रकाशन केले.

धनंजय कुलकर्णी ( पुरातत्त्व विभाग, रत्नागिरी):-

महत्वाचे स्मारक हे पुरातत्व विभागाच्या अख्यारीत आहे आणि राज्य शासन मदत्नीधीचा पुरवठा करतो.

आणि देशपातळीवरील स्मारकांना केंद्रीय शासनाचा मदतनिधी मिळतो.सामान्य पातळीवर हा Heritage Law काढण गरजेच आहे हे त्यांनी स्पष्ट केला. गडांवर जाताना किंवा संवर्धन कार्य हाती घेण्याआधी मूळ इतिहास त्याचा बांधकाम कसा आहे,गडाचा वापर ,प्रकार आणि कालावधी यांची  माहिती मिळवण्याची आवश्यकता आहे असे सुचवले.उत्खनन करण्यागोदर पुरातत्व खात्याची अनुमती घेणे गरजेचे आहे असे सांगितले.तसेच कचरा साफसफाई करण्यागोदर नियोजन करणे महत्वाचे आहे असे सांगितले.

सचिन जोशी (डेक्कन कॉलेज पुरातत्व विभाग पुणे ):-

संवर्धनाच्या दृष्टीने अगदी महत्वाच्या गोष्ठी सरांनी मांडल्या आहेत.कोणत्याही गडाच संवर्धन कार्य हाती घेण्यागोदर पुढील पायऱ्या लक्षात घ्याव्यात  :-

. सर्वेक्षण

. दुरुस्ती

.संवर्धन आणि जतन

लगेचच तिसऱ्या पायरीवर जावू नये हे सुद्धा स्पष्ट केले.

गडाच GPS वापरून तसेच आधुनिक तंत्राद्यान वापरून नकाशे मांडणे अगदी गरजेचा आहे हे सांगितले. गडांवर सापडणाऱ्या pottery, bangles अनेक मिळणाऱ्या वस्तू कचऱ्यात फेकता पुरातत्व खात्यात जमा कराव्यात तसेच त्याची नोंद करून ठेवणे गरजेच आहे हे स्पष्ट केले.

स्थानिक लोकांशी संपर्क साधून त्यानांही संवर्धन कार्यात सामील कराव.गडांवर असलेल्या अनेक वास्तूंचे अवशेषांचे फोटो काढावेत आणि नोंद करून ठेवावी त्यामुळे पुढच्या पिढी साठी इतिहास हा समृद्ध होत जाईल.

राहुल मुंगीकर ( संशोधक समंत्रक , महाराष्ट्र राज्य जैव विविधता मंडळ,पुणे कार्यालय) :-

(९८२२६१११२८ mbiodiversityboard@gmail.com)

प्रत्येक गडाला भौगोलिक,शास्त्रीय आणि जैव विविधता लाभलेली असते.अभ्यसाविना केलेली कोणतीही गोष्ट निसर्गासाठी आणि गडकोट यासाठी हानिकारक ठरू शकते हे त्यांनी सांगितले.

किल्ल्याचा अभ्यास हा प्रामुख्याने वरची,मधली आणि खालची फळी यानुसार होतो.प्रत्येक फळीची जैव विविधता हि वेगळी असते.

प्रामुख्याने गडांचे प्रकार खालिक Zone  नुसार समजावून घेता येतील:-

Zonation of Forts:

Z1 & Z2 (Konkan: Thane & Raigad)

Z3 & Z4 (Western Ghats of Raigad, Pune ,Ratnagiri & Satara)

Z5 & Z6 (Deccan Plateau: Pune & Satara)

प्रत्येक किल्ल्याची Ecosystem संवर्धन कार्यापूर्वी आपण समजावून घ्यायला हवी असे मांडले.

संवर्धनाचा Natural Flow कसा असला पाहिजे हे त्यांनी पुढील प्रमाणे सांगितले:

. Fort Conservation

. Ecosystem

.Vegetation

.Species

.Fort Wall Vegetation

.Plantation

राहुल सरांनी बारकाव्यांसह जैव विविधता आणि दुर्ग संवर्धन याबद्दल माहिती दिली.तसेच दुर्ग संवर्धन महासंघ आणि राहुल मुंगीकर यांनी मिळून एक Website  निर्माण करण्याचा मानस बोलून दाखविला.जर स्थानिक लोकांना सोबत घेवून त्यांची जणांची PBR (People Biodiversity Representative) टीम केली तर सरकारचा निधी कसा उपलब्ध  करून घेता येईल याबद्दल मार्दर्शन केले.आणि त्या Site ला Heritage Site घोषित करण सोपं कसा होईल हे सांगितले.

विवेक काळे आणि देव सर :-

देव सरांनी दुर्ग साहित्य आणि दुर्ग संवर्धन याची कशी सांगड घालता येईल हे स्पष्ट केले तर विवेक काळे सरांनी मी सह्याद्री बोलतोय याची - मिनिटांची Video Clipping दाखविली.

 

दुर्ग संवर्धन संघ घोषित हिरोजी इंदलकर २०१३ चा पुरस्कार किल्ले वसई मोहीम श्रीदत्त नंदकुमार राउत यांना जाहीर करण्यात आला.

यानंतर दुर्गप्रेमींच्या चर्चा सत्रानंतर आणि प्रश्नोतरानंतर कार्क्रम संपला असे घोषित करण्यात आले.

साधारण २० दुर्ग संवर्धन संस्था या कार्यक्रमात सहभागी झल्या होत्या.

Visitng Card List:-

  1. Kille Vasai Mohim

Shridatta Nandkumar Raut

09764316678/9930697571

shridattaraut@gmail.com

  1. Vinsys Fort Restoration- Malhargad

Pradeep Arude

9822121553

Pradeep.arude@vinsys.in

  1. Durgasanvardhan

Santosh Jadhav & Sandeep Jadhav

8308290298/9922083950

  1. Shri Shivdurg Sanvardhan

Yogesh Pathak

9823300724

Shivdurg2009@gmail.com

 

  1. Mihir Tourism

Sudhir Karandikar

9922408540

mihirtourism@gmail.com

 

ट्रेकक्षितीज संस्थे साठी काही सूचना:-

१. आपण केलेल्या १२ वर्षांच्या सुधागड प्रकल्पात बर्याच मुलभूत गोष्टींचा विचार झाला नाही तो आता करायला हवा.

२.किल्ल्याला जिवंत स्वरूप प्राप्त करून देण्यासाठीचे प्रयत्न करायला हवेत.त्यासाठी दुर्ग संवर्धक संघाची तसेच इतर संस्थाची मदत घेवून काम करण्याची गरज आहे.

३.सुधागड प्रकल्प करताना प्रत्येक सदस्यामध्ये सुसूत्रता असणे गरजेचे आहे.सद्य स्थितीला त्याचा अभाव जाणवतो.

४.शास्त्रीय दृष्ट्या नकाशे आणि सापडलेल्या गोष्ठी यांचा Documentation करण गरजेचा आहे.

संस्थेला तसेच गरज पडेल तिथे पुरातत्व विभागाला त्या नोंदींची माहिती देणे गरजेचा आहे.

५. सुधागड चा इतिहास, गडाचा प्रकार त्याची जैव विविधता समजून घेवून स्थानिक लोकांच्या   मदतीने संवर्धनाचे प्रयत्न करणे गरजेचे आहे.

६.टप्प्या टप्प्या ने कसे संवर्धन कामाचा आलेख उंचवता येईल हे सुद्धा बघावे.

७. प्रत्येक सदस्याने दूरदृष्टी ठेवून काम करावे.

                                                                                   

 

Back to Top
Sponsored Links


Back to Top
amitsamant View Drop Down
Moderator Group
Moderator Group
Avatar

Joined: 16 Jun 2012
Location: Dombivali
Status: Offline
Points: 738
Post Options Post Options   Thanks (0) Thanks(0)   Quote amitsamant Quote  Post ReplyReply Direct Link To This Post Posted: 29 Jul 2013 at 6:13pm
दिपाली, दुर्ग संवर्धक संमेलनाचा वृतांत तू फारच सुंदर लिहिला आहेस. तू मांडलेल्या मुद्द्यांवर सुधागड टिममध्ये आपण नक्कीच चर्चा करू.
Back to Top
 Post Reply Post Reply
  Share Topic   

Forum Jump Forum Permissions View Drop Down

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd.

This page was generated in 1.633 seconds.