मौनी महाराज मंदिर |
Post Reply |
Author | |
amitsamant
Moderator Group Joined: 16 Jun 2012 Location: Dombivali Status: Offline Points: 738 |
Post Options
Thanks(0)
Posted: 30 Nov 2013 at 8:47pm |
गावाचे नाव :- पाटगाव
जिल्हा :- कोल्हापूर जवळचे मोठे गाव :- गारगोटी, भूदरगड. इ.स. १६७६ च्या विजयादशमीला छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेवर निघाले. त्यावेळी महाराजांनी मौनी महाराजांचे पाटगाव येथे जाऊन आशिर्वाद घेतले होते. ही नोंद ९१ कलमी बखरीत ७६ व्या कलमात वाचायला मिळते .दक्षिण दिग्विजय मोहिमेवरून परत येई पर्यंत मौनी महाराजांनी जिवंत समाधी घेतली होती. दिनांक ३ जून १६७८ रोजी महाराजांनी सहस्त्र भोजनासाठी सनद दिली होती. मौनी महाराजांच्या समाधीवर मंदिर बांधण्यास महाराजांच्या काळात सुरुवात झाली होती. भुदरगड तालुक्यात पाटगाव आहे. पाटगाव मध्ये मौनी महाराजांची समाधी आहे. समाधीकडे जाणार्या वाटेवर ताराराणीनीं बांधून घेतलेले भव्य प्रवेशव्दार आहे. समाधी मंदिरावर शरभ कोरलेला आहे. त्याने पाच हत्तीना पकडलेले दाखवण्यात आले आहे. मंदिराच्या लाकडी बांधकामातील कलाकुसर पाहाण्यासारखी आहे. मौनी महाराजांची समाधी एकसंध दगडात असून खालील दगड मोठा व वरील दगड उतरत्या बांधणीने छोटे होत गेलेले आहेत. जाण्यासाठी :- पाटगावाला जाण्यासाठी कोल्हापूर गाठावे. कोल्हापूर (५३ किमी) - गारगोटी (३५ किमी) - पाटगाव. पाटगावात रस्त्याला लागून मौनी महाराजांचे समाधी मंदिर आहे. आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- रांगणा किल्ला. Temples in Maharashtra, Ancient Temples in Maharashtra Mauni Maharaj Samadhi Mandir , Village :- Patgaon, Dist :- Kolhapur, Nearest city :- Gargoti, Kolhapur. Edited by amitsamant - 04 Dec 2013 at 1:10pm |
|
Sponsored Links | |
Post Reply | |
Tweet
|
Forum Jump | Forum Permissions You cannot post new topics in this forum You cannot reply to topics in this forum You cannot delete your posts in this forum You cannot edit your posts in this forum You cannot create polls in this forum You cannot vote in polls in this forum |