४) विहार |
Post Reply |
Author | |
amitsamant
Moderator Group Joined: 16 Jun 2012 Location: Dombivali Status: Offline Points: 738 |
Post Options
Thanks(0)
Posted: 12 Apr 2014 at 11:04am |
बौध्द धर्माच्या सुरुवातीच्या काळात; हिनयान पंथाच्या काळात विहार हे भिक्षूंच्या केवळ वर्षकाळातील वास्तव्यासाठी बांधण्यात आले होते. त्यामुळे त्यांची रचना साधीसोपी करण्यात आली होती. या हिनयान पंथीय विहारांमध्ये चैत्य स्तूपाच्या बाजूला विहारांची रचना केलेली असे. यात आयताकार ओसरी किंवा मार्गिका ठेवलेली असे. या मार्गिकेच्या एका बाजूस ओळीने दालने खोदलेली असत. दालनात मुख्य दरवाजाच्या बाजूला प्रकाश व हवा येण्यासाठी जाळीदार खिडक्या किंवा झराके असत. आत मध्यभागी आयताकार मोकळी जागा ठेवून तीन बाजूंना खोल्या असत. या खोल्यांमध्ये झोपण्यासाठी दगडी बाक, खुंटीसाठी भिंतीत खाच व दरवाजासाठी चौकटीत खाचा कोरलेल्या असत. याशिवाय विहारात पाण्यासाठी कुंडे खोदलेली असत. विहारातील भिंती, स्तंभ यावर कोरीवकाम किंवा शिल्प कोरलेली नसत. बौध्द धर्माचा प्रसार झाल्यावर महायान काळात भिक्षू फक्त वर्षाकाळात विहारात न राहता, कायम राहू लागले. विहारांचे रुपांतर शिक्षणकेंद्रात झाले; भिक्षूंची संख्या वाढली. त्याचा परिणाम विहारांच्या रचनेवरही झाला. विहार आकाराने प्रशस्त व अनेक मजली बांधण्यात आले. पाण्यासाठी कुंडे, उद्याने, स्नानगृहे, स्वयंपाकघर, भोजनकक्ष, सामान साठावण्याच्या कोठ्या यांची रचना विहारात करण्यात आली. हिनयान काळातील स्तुपांची जागा बुध्द मुर्तींनी घेतली. विहारांच्या भिंती, खांब, दरवरजाच्या चौकटी, बौध्द धर्मातील दैवते, जातक कथा, पानाफुलांची वेलबुट्टी कोरुन सजविण्यात आल्या. काही ठिकाणी भित्तीचित्रे रंगविण्यात आली. प्रार्थनापट कोरण्यात आले. Edited by amitsamant - 12 Apr 2014 at 12:07pm |
|
Sponsored Links | |
Post Reply | |
Tweet
|
Forum Jump | Forum Permissions You cannot post new topics in this forum You cannot reply to topics in this forum You cannot delete your posts in this forum You cannot edit your posts in this forum You cannot create polls in this forum You cannot vote in polls in this forum |