जोगवा मागणारीच लेण |
Post Reply |
Author | |
amitsamant
Moderator Group Joined: 16 Jun 2012 Location: Dombivali Status: Offline Points: 738 |
Post Options
Thanks(0)
Posted: 03 Oct 2014 at 12:11pm |
याशिवाय सुतोंडा किल्ल्यावर २ लेणी आहेत. पण त्यात कुठल्याही मुर्ती नाहीत. सुतोंडा किल्ल्याची माहिती साईटवर दिलेली आहे. जाण्यासाठी :- स्वत:चे वहान असल्यास औरंगाबादहून ३ मार्गांनी सुतोंडा गडावर जाता येते :- १) औरंगाबाद - चाळीसगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून ६३ किमी अंतरावर कन्नड गाव आहे. कन्नडहून एक रस्ता फर्दापूरला जातो .या रस्त्यावर कन्नड पासून ५० किमी वर बनोटी गाव आहे. बनोटी गावातून एक रस्ता ३ किमीवरील नायगाव गावात जातो. नायगाव हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. २) औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्या औरंगाबाद - जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून १०५ किमी अंतरावर फर्दापूर गाव आहे. फर्दापूर - चाळीसगाव रस्त्यावर फर्दापूर पासून १५ किमीवर सोयगाव हे तालुक्याचे गाव आहे. सोयगाव ते बनोटी अंतर २५ किमी आहे. बनोटी गावातून एक रस्ता ३ किमीवरील नायगाव गावात जातो. नायगाव हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. ३) औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्या औरंगाबाद - जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून ६५ किमी अंतरावर सिल्लोड गाव आहे.सिल्लोडहून एक रस्ता ३१ किमी वरील घाटनांद्रा गावाकडे जातो. घाटनांद्राहून १३ किमीवर तिडका नावच गाव आहे. हे गाव फर्दापूर - चाळीसगाव रस्त्यावर आहे. तिडका गावातून ३ किमीवर बनोटी गाव आहे. बनोटी गावातून एक रस्ता ३ किमीवरील नायगाव गावात जातो. नायगाव हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. नायगाव गावातून बाहेर पडल्यावर आईमाईच्या टेकाडाला वळसा घालून आपण किल्ल्याकडे जातो. या टेकाडावर आईमाईची घुमटी आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी आल्यावर वरच्या बाजूला चोर दरवाजा दिसतो. पायथ्यापासून किल्ल्यावर जाण्यासाठी २ मार्ग आहेत. पहिल्या मार्गाने आपण चोर दरवाजाने किल्ल्यात प्रवेश करतो. हा मार्ग खड्या चढणीचा आहे. या मार्गाने किल्ल्यावर चढून जाण्यासाठी ३० मिनिटे लागतात. चोर दरवाजापासून दुसर्या बुरुजाखाली साधारणपणे किल्ल्याच्या अर्धा उंचीवर डाव्या बाजूची पायवाट पकडावी व तटबंदीला समांतर चालत रहावे. ५ मिनिटात कातळात कोरलेल्या पायर्या दिसतात. त्या लेण्यांपाशी घेऊन जातात. गावातून माहीतगार वाटाड्या घेतल्यासच हे लेण सापडू शकेल. सुतोंडा किल्ल्याची माहिती साईटवर दिलेली आहे. आजूबाजूची पहाण्याची ठिकाणे :- सुतोंडा किल्ला, अंतुर किल्ला, Sutonda, Sutonda Fort, Naigaon Fort, Naigaoncha killa, Antur, Forts in Aurangabad, Caves in Aurangabad
Edited by amitsamant - 30 Jul 2015 at 3:59pm |
|
Sponsored Links | |
Post Reply | |
Tweet
|
Forum Jump | Forum Permissions You cannot post new topics in this forum You cannot reply to topics in this forum You cannot delete your posts in this forum You cannot edit your posts in this forum You cannot create polls in this forum You cannot vote in polls in this forum |