खंजीर |
Post Reply |
Author | |
amitsamant
Moderator Group Joined: 16 Jun 2012 Location: Dombivali Status: Offline Points: 738 |
Post Options
Thanks(0)
Posted: 16 Jun 2012 at 2:47pm |
खंजीर हे हलके, लहान पण घातक शस्त्र आहे. याच्या दुधारी
पात्यास दोन ठिकाणी वळणे असतात; त्यामुळे पाते नागमोडी दिसते खंजीराची मूठ लाकूड, हस्तीदंत,
सोने, चांदी यापासून बनवलेली असते. खंजीराचे पाते ६ ते १५ इंच लांब असते. खंजीराच्या
नागमोडी आकारामुळे घाव खोलवर व जीवघेणा होतो. खंजीराचे पाते चांदीने मढविलेल्या म्यानात
ठेवले जाते. खंजीर हे मुघलांचे प्रमुख अस्त्र होते. खंजीर हे ओमान देशात वापरले जाणारे परंपरागत शस्त्र आहे. ओमानच्या राष्ट्रीय ध्वजावरही खंजीर विराजमान आहे. ओमान देशात पुरूषांमध्ये पौंगडावस्थेत पदार्पण केल्यानंतर खंजीर बाळगायला सुरूवात होते. १९७० पर्यंत खंजीर हे केवळ शोभेसाठी अंगावर बाळगण्याचे शस्त्र बनले होते व खंजीराचे पाते म्यानातून बाहेर काढणे हे भयंकर कृत्य समजले जात असे कारण त्याचा उपयोग बहुधा बदला घेण्यासाठी वा हत्या करण्यासाठी केला जात असे. Edited by amitsamant - 14 Feb 2014 at 10:27am |
|
Sponsored Links | |
Post Reply | |
Tweet
|
Forum Jump | Forum Permissions You cannot post new topics in this forum You cannot reply to topics in this forum You cannot delete your posts in this forum You cannot edit your posts in this forum You cannot create polls in this forum You cannot vote in polls in this forum |