Forum Home Forum Home > Adventure Forum > Events
  New Posts New Posts RSS Feed - सुरगड - एक अविस्मरण
  FAQ FAQ  Forum Search   Events   Register Register  Login Login


सुरगड - एक अविस्मरण - Event Date: 09 Nov 2014

 Post Reply Post Reply
Author
Message
sagro4u View Drop Down
Newbie
Newbie
Avatar

Joined: 18 Nov 2014
Location: Dombivli
Status: Offline
Points: 15
Post Options Post Options   Thanks (1) Thanks(1)   Quote sagro4u Quote  Post ReplyReply Direct Link To This Post Calendar Event: सुरगड - एक अविस्मरण
    Posted: 20 Nov 2014 at 8:18am
लहानपणापासून दिवाळीच्या सुट्टीत किल्ले बांधण्याची आवड होती. या वर्षी महाराष्ट्रातील एक अजिंक्य जलदुर्ग उभा करण्याचा निर्धार केला.
किल्ले जंजिरा
पहिल्यांदाच ट्रेक क्षितीज संस्थेमार्फत भरवलेल्या किल्ले बांधणी स्पर्धेत आमच्या किल्ल्याच नाव नोंदवल आणि प्रथम पारितोषिक पटकावल. याच स्पर्धेतील स्पर्धकांसाठी ट्रेक क्षितीज ने एक आगळावेगळा ट्रेक आयोजित केला होता. ९ नोव्हेंबर २०१४ ला आम्ही सर्व स्पर्धक या ट्रेकसाठी सुरगड ला प्रस्थान करणार होतो. पहिल्यापासून ट्रेक ची आवड आहे त्यामुळे एक नवीन किल्ला एक नवीन ट्रेकिंग स्पॉट पाहण्याची उत्सुकता होती. कित्येकदा मन उत्सुकतेमुळे कल्पनेच्या घिरट्या घालून यायचं. आणि अखेर नव्या उमेदीत ९ नोव्हेंबर सकाळ उजाडली.
नवीन चेहरे नवीन सवंगडी घेऊन आमची बस सुरगड च्या दिशेने निघाली. दीपाली लंके आमची ट्रेक लीडर.
वेळेच आणि इतर सर्व गोष्टींच नियोजन तिने उत्कृष्ठ केल होत. नाश्त्याला चवदार उपम्याची सोय होती. गावात पोहोचल्यावर एका शाळेच्या पटांगणात दीपाली ने ट्रेक बद्दल माहिती दिली. त्यानंतर सर्वांची ओळख करून घेऊन आम्ही सर्व किल्ल्याच्या दिशेने मळलेली पायवाट तुडवत चालू लागलो. काही क्षणात ओळखीच्या सवंगड्यांचे ग्रुप्स विभागले गेले आणि अनोळखी मित्रांसोबत सगळेजण मिसळले. आपोआप एकमेकांशी ओळख होऊ लागली. उन्हाचा तडाखा जाणवत होता. थोड्याच वेळात आम्ही एका पठारावर पोचलो. तिथे थोडीफार फोटोग्राफी करून आम्ही पुन्हा चढायला सुरुवात केली. हे सगळ करत असताना दीपाली ने किंवा इतर ट्रेक क्षितीज च्या सहयोग्यानी आम्हाला अडवलं किंवा घाई केली नाही. या वरून दीपाली ने वेळेच नियोजन करताना या सर्व छोट्या छोट्या गोष्टीही लक्षात घेतल्या होत्या हे दिसून आल. पुढे जंगलातल्या पायवाटेने चढत चढत आम्ही एका भुयारी पाण्याच्या टाक्याजवळ पोहोचलो. तिथून डाव्या बाजूला असलेल्या घळीतून चढून वर गेलो. वर गेल्यावर मारुतीरायाचे दर्शन झाले आणि तिथून उजवीकडे असलेल्या बुरुजावर जाऊन पोहोचलो. कुंडलिका नदी आजूबाजूचा हिरवळीने बहरलेला परिसर बघून थकवा पार निघून गेला. थोड मागे येउन समोरील चढण चढून वर आलो आणि मग किल्ल्याचा एकंदरीत परीघ आणि इतर वास्तूंचा परिचय झाला.
पोट कावकाव म्हणू लागल होत आणि मग एक मोकळी जागा बघून प्रत्येकाने आपापले डब्बे उघडले. कधी ह्याच्या डब्ब्यात हाथ मार तर कधी त्याच्या डब्ब्यात अस करत करत पोटातला जमदग्नी शांत केला. मग TD ने ट्रेक क्षितिजच्या एकंदरीत वाटचालीबद्दल माहिती दिली. त्यानंतर महेंद्रदादाने हि छान माहीती सांगितली. आणि मग किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूने आम्ही उतरण्यास सुरुवात केली. वेळेत आम्ही सगळे बस जवळ येउन पोहोचलो. तिथे ग्रुप फोटो घेतले पण आम्ही काहीजण गावच सौंदर्य पाहत राहिलो आणि ग्रुप फोटोमधून मिस झालो. त्यानंतर वाटेत चहा आणि कांद्यापोह्याचा फडशा पाडून पुढची वाट धरली. बस मध्ये महेश ने icecream ने सगळ्याचं तोंड गोड केल. आणि मग गाण्यांच्या मैफिलीत कधी डोंबिवलीला पोहोचलो कळलंच नाही.
म्हणूनच मी या ट्रेक ला एक अविस्मरणीय अनुभव म्हटलंय.

I would like to appreciate Deepali(trek leader) for great Leadership and nice human being in nature.
Back to Top
Sponsored Links


Back to Top
amitsamant View Drop Down
Moderator Group
Moderator Group
Avatar

Joined: 16 Jun 2012
Location: Dombivali
Status: Offline
Points: 738
Post Options Post Options   Thanks (0) Thanks(0)   Quote amitsamant Quote  Post ReplyReply Direct Link To This Post Posted: 20 Nov 2014 at 8:35am
मित्रा
छान लिहिल आहेस. पण तूच लेखात उल्लेख केलेल्या फोटोग्राफसची जोड दिली असतीस तर अजुन मजा आली असती. ( फोटो अपलोड करताना रिसाइझ करुन अपलोड कर. )

यापुढेही तुझ्याकडुन नविन नविन ट्रेकसची माहिती फोरमवर वाचायला मिळो.
Back to Top
chaitanya View Drop Down
Groupie
Groupie
Avatar

Joined: 12 Jul 2012
Location: Dombivli
Status: Offline
Points: 92
Post Options Post Options   Thanks (0) Thanks(0)   Quote chaitanya Quote  Post ReplyReply Direct Link To This Post Posted: 20 Nov 2014 at 8:12pm
छान लिहिल आहेस मित्रा... मी महेश च आइसक्रीम मिस केल...
Back to Top
 Post Reply Post Reply
  Share Topic   

Forum Jump Forum Permissions View Drop Down

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd.

This page was generated in 0.329 seconds.