जंबिया |
Post Reply |
Author | |
amitsamant
Moderator Group Joined: 16 Jun 2012 Location: Dombivali Status: Offline Points: 738 |
Post Options
Thanks(0)
Posted: 16 Jun 2012 at 8:14pm |
हे मुस्लीम पध्दतीचे लहान शस्त्र आहे. याचे पाते दुधारी, निमुळते, टोकदार असते. पात्याच्या मधोमध शीर असते. शिंग पाते विशिष्ट कोनात वळवलेले असते. जंबियाची मूठ शिंग, लाकुड व हस्तीदंत यापासून बनविलेली असते. मुठीवर पकड घट्ट रहावी म्हणून मूठ टोकाकडे रुंद केलेली असते किंवा मूठ दोन्ही बाजूला रुंद करुन त्याला डमरूचा आकार दिलेला असतो. पात्याच्या आकाराचे म्यान जंबियाला असते. जंबियाचे म्यान चांदी, रत्ने आणि चामडे यांनी सजविले जाते. जंबिया शेल्यात खोचला जात असे किंवा पट्ट्याला अडकविला जात असे.यमेन देशामध्ये पुरूषाने १४ व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर जंबिया हा त्याचा रोजच्या वस्त्रप्रावरणाचा एक अनिवार्य भाग बनतो. गेंड्याच्या शिंगापासून बनविलेल्या हा सैफानी मूठीचा जंबिया, मानाचे प्रतिक समजले जाते.जंबियाचा उपयोग मुख्यत्वे शोभेसाठी असला तरी तंट्याच्या वेळी मात्र ते म्यानातून बाहेर निघू शकते. Edited by amitsamant - 12 Feb 2014 at 1:40pm |
|
Sponsored Links | |
Post Reply | |
Tweet
|
Forum Jump | Forum Permissions You cannot post new topics in this forum You cannot reply to topics in this forum You cannot delete your posts in this forum You cannot edit your posts in this forum You cannot create polls in this forum You cannot vote in polls in this forum |