कुर्हाड (Axe) |
Post Reply |
Author | |
amitsamant
Moderator Group Joined: 16 Jun 2012 Location: Dombivali Status: Offline Points: 738 |
Post Options
Thanks(0)
Posted: 16 Jun 2012 at 8:15pm |
अश्मयुगात जमिनीचा प्रत्येक तुकडा झाडांनी, झुडुपांनी व्यापलेला होता. झाडे तोडण्यासाठी माणसाला हत्याराची गरज होती. त्याने लांब दांड्याला दगडी त्रिकोण बसवला व कुर्हाड तयार झाली. दगडाचा आकार गोलाकार; अर्धगोलाकार असा बदलत, लोहयुगात पूर्ण विकसित कुर्हाड तयार झाली. कुर्हाडीचे पाते साधारणत: अर्धगोलाकार असते. यात बर्हिवक्र व अंर्तवक्र असे दोन प्रकार असतात, तर काही पाती सरळ असतात. या पात्याला असलेल्या कडीत लाकडी अथवा लोखंडी दांडा बसवतात. या दांड्याची लांबी २ ते ४ फूट असते. दांडा जितका लांब तितका कुऱ्हाडीचा घाव जोरदार असतो. युध्दात कुर्हाडीचा उपयोग पूर्वापार होत आला आहे. शिरस्त्राण, चिलखत भेदण्यासाठी याचा उपयोग होत असे. लांब दांड्याच्या कुर्हाडी जड असल्यामुळे कुर्हाड चालवताना सैनिक लवकर दमत असत म्हणून कुर्हाडीचा युध्दात वापर कमी झाला.
कुर्हाडीचे प्रकार: १) गदा :- हा कुर्हाडीचा एक प्रकार आहे. २) शश्पार:- गदेसारखेच, पण वरच्या टोकास ६ फाळ असतात. ३) खारीमही:- वर टोक असलेली लोखंडी गदा, . ४) परशू :- धारदार, बर्हिवक्र पाते असलेली कुर्हाड; परशुरामाने हीच कुर्हाड वापरली. ५) हैद्राबादी तबर:- अंतर्वक्र पाते असलेली कुर्हाड, बळीसाठी वापरली जात असे.
कुर्हाडीचे पवित्रे: १) प्रक्षेप:- फेकून मारणे. २) परिक्षेप :- पवित्रा घेऊन चारही दिशांनी कुर्हाड चालवणे. ३) अभिक्षेप:- पवित्रा घेऊन समोरुन वार करणे Edited by amitsamant - 23 Feb 2014 at 1:03pm |
|
Sponsored Links | |
Post Reply | |
Tweet
|
Forum Jump | Forum Permissions You cannot post new topics in this forum You cannot reply to topics in this forum You cannot delete your posts in this forum You cannot edit your posts in this forum You cannot create polls in this forum You cannot vote in polls in this forum |