Forum Home Forum Home > Historical and Trekking Destinations of India > Trekking Destinations
  New Posts New Posts RSS Feed - माहुलीचा अनुभव -
  FAQ FAQ  Forum Search   Events   Register Register  Login Login


माहुलीचा अनुभव -

 Post Reply Post Reply
Author
Message
ruchir.deshpande90 View Drop Down
Newbie
Newbie


Joined: 12 Dec 2014
Location: Kalyan
Status: Offline
Points: 10
Post Options Post Options   Thanks (0) Thanks(0)   Quote ruchir.deshpande90 Quote  Post ReplyReply Direct Link To This Post Topic: माहुलीचा अनुभव -
    Posted: 21 Dec 2014 at 4:16pm
माहुलीचा अनुभव -

२००९ फेब्रुवारी मध्ये माहुली ला गेलो होतो. मी माझा मित्र श्रेयस आणि त्याचा १ मित्र अमोल आम्ही ३ लोक होतो. अमावस्येचा दिवस होता. शनिवारी सकाळी ८.३० च्या सुमारास आसनगाव स्टेशन ला उतरलो, नाश्ता केला व रिक्षेचे काहीच्या काही भाव एकून पायी जायचा निर्णय घेतला. फेब्रुवारी चा महिना असल्याने खूपच उन होतं. साधारण १०.३० च्या सुमारास पायथाच्या गावात पोहोचलो आणि आम्ही तिघेहि पहिल्यांदाच जात होतो तरी guide न घेता गावात वाट विचारली आणि पुढे निघालो. वाट सुरवातीला अगदीच प्रशस्त होती आणि ती एका ऑफिस जवळ जाऊन थांबली आणि तिथे खूप कच्च्या वाटा होत्या तिथून जी वाट बरोबर वाटली तिथून पुढे चालत राहिलो. पुढे पुढे मात्र वाट अशी नवतीच तरी आम्ही वरती चढतच राहिलो. एव्हाना १ तासाहून अधिक वेळ झाला होता आणि आम्ही मात्र भटकतच होतो. आम्हाला वाटलं कि बरोबर ची वाट जवळच असेल सापडेल थोड्याच वेळात, पुढे चढतच राहिलो.  मुळात आम्ही सुरवातीलाच  वाट चुकलो होतो जी वाट धरली होती ती फक्त त्या ऑफिस पर्यंत च जाणारी होती, पण आम्ही हे कळल्यावर मागे फिरलो नाही (हे चुकलंच बहुतेक). एव्हाना २ तास हून जास्त वेळ गेला  आणि आता मात्र आम्ही खूपच भटकलो होतो  आजूबाजूला दाट कार्वी होती  आणि आम्ही तरीसुद्धा वर चढतच राहिलो अनेकवेळा पडलो पण मागे फिरलो नाही वाटलं कि जवळच असेल आता सापडेल वाट. जंगलात मध्येच एक-दोन प्राणी देखील पळून जाताना दिसले, थोडे घाबरलो. साधारण दुपारी २.३० च्या सुमारास एका point वर आलो जिथून वर जाण शक्यच नव्हत, सरळ उभा कडा किमान २० फूट!. तिथे खूप उघाड होती, आमच्यात आणि किल्ल्याच्या मध्ये आता फक्त हा कातळ च  उरला होता. उरली किल्ल्याची सर्व उंची आम्ही चढलो होतो. बहुतेक आम्ही माहुलीच्या त्या तीन सुळक्यांच्या थोडे उजुव्या बाजूला आणि जेमतेम २० फूट खाली होतो  पण इथून वर जाण शक्य नवतं(बरोबर ची वाट हि माहुलीच्या extreme  right ने जाते (facing माहुली)) पण आम्ही बरोबर मध्येच होतो आणि नेमके कुठे आहोत हे देखील कळत नवतं. बाजूच्याच कपारीत पाणी पडत होतं(फेब्रुवारीत!),  तिथेच डबा उघडला थोडसं खालं आणि तिथला पाणी प्यायलो. सकाळची पाय्थ्यापार्यान्त्ची चाल मग ४ तास केलेली कसरत, झालेल्या झख्मा, खूपच हिरमोड झाला होता. आम्ही तिघेही खूप दमलो होतो शिवाय उन पण फार होतं आणि आता ठरवलं कि जाऊदे नको माहुली खाली उतरू आणि घरी जाऊ. पण असा वाटलं कि चढलो खरे पण उतरता येणार का ? खूपच अवघड प्रश्न होता आणि तेच खर झालं साधारण १५ मिनिट खाली उतरल्यावर तशीच परिस्थिती उभा कातळ, कस जाणार खाली...शिवाय तिथे माती सरकत होती, थाबाला सुद्धा जागा नाही, पुन्हा वर आलो जिथे जेवलो  तिथे. 

                              आणि आता मात्र खूपच बिकट परिस्थिती होती न वर जाता येत ना खाली, काय कराव काहीच सुचेना तिथेच थांबलो एव्हाना ३.३० झाले होते अंधार पडायला वेळ होता पण आमच्या मनात अधिकच गडद होत चालल होतं.  शेवटी निरुपाय होऊन mobile काढला(सुदैवाने range  होती) आणि एका मित्राला फोने केला तो आधी येउन गेला होतं माहुली ला, पण फोन वरून त्याला आम्हाला काहीच सांगता आला नाही त्याला फक्त एवढाच कळलं कि आम्ही माहुली ला आहोत आणि भटकलो आहोत. पुन्हा अंधार, काय करायचं ......
 
                             पुन्हा एकाचा फोन आला हा आधीच्या मित्राचा भाऊ होता, त्याने आमच्याकडून आमच्या location चा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला पण काहीच कळलं नाही शेवटी त्याने सांगितलं कि बरोबरची वाट तर उजवीकडून आहे तुम्ही जमेल  तसा उजवीकडे सरकत राहा. बरेच फोन झाले मध्ये आणि tension वाढतच होतं. साधारण ३० मीन उजवीकडे आल्यानंतर (आमच्या डावीकडे ) खूप लांबवर आम्हाला काही माणसे दिसली. कळल हिच ती बरोबरची वाट पण आता ५ वाजले होते अंतर तर खूपच होतं पण विचार करायला वेळच नव्हता वरच्या कड्याला धरत धरत आम्ही उजवीकडे सरकत होतो जेमतेम अर्धा पाउल राहील एवढी जागा होती आणि माती निसरडी होती तिथे सुद्धा खूप वेळ पडलो. पुन्हा एकदा मित्राच्या भावाचा phone आला त्याने सांगितले कि अंधार होईपर्यंत तुम्ही बरोबरच्या वाटेकडे चालत राहा पण नाहीच जाता आलं तर अशा ठिकाणी रात्री थांबा जिथून तुम्हाला ८-१० फूट पर्यंत चा सगळा दिसेल आणि पाण्याजवळ तर बिलकुल थांबू नका(प्राण्यांमुळे बहुतेक). मी योगायोगाने काहींचा group घेऊन पायथ्याला पोहोचलोच आहे तुम्ही मध्ये कुठे थांबलात तर रात्री गावकर्यांसोबत येतोच. 

जीवात जीव आला, पुन्हा आम्ही सरकतच राहिलो. त्या कड्याला पाली सारखे चिटकत पुढे जात होतो मी पहिलाच होतो आणि अचानक मी १ सेक थांबलो आणि माझ्या समोरून मोठा दगड खाली गेला . कड्यावरून कोणी तरी दगडं टाकत  होतं आमच्याच आजूबाजूलाच पडत होती आम्ही ओरडून सांगत होतो कि खाली माणसा आहेत दगड टाकू नका तरी पडतच होती, बहुतेक आमच्या आवाजाचा अंदाज घेऊनच कोणीतरी टाकत असावेत(माकडं असावीत बहुतेक). पण थांबायला वेळ च नव्हता पुढे सरकत राहिलो आणि थोड्यावेळाने दगड बंद झाली आणि आम्ही पुढे जात राहिलो पण वाट तर दूरच होती. अंधार वाढतच चाललेला आणि तेवढ्यात माझा पाय सरकला आणि मी ७-८ फूट खाली घसरत गेलो आणि आणि दगडावर आपटलो. सुदैवाने जास्त लागले नाही पण वाटेतल्या निवडूंग मूळे खूप खरचटले. 

पुन्हा पुढचा प्रवास चालू झाला आणि आता अगदीच संधिप्रकाश राहिला होता वाटेत एक मोठा  दगड होता जिथे रात्रीसाठी थांबता आला असतं पण जरा पुढे गेलो तर काय! सिमेंट ने fix  केलेली शिडीच दिसली. शिडी चढून वर गेलो तर गुहांमध्ये already एक मोठा group stay साठी च आला होता. थंडीमुळे रात्रभर झोप च लागली नाही. सकाळी उठताच(बरोबरच्या वाटेने) घरी परतलो.ह्या अनुभवामुळे खूप काही शिकलो(कि ट्रेकला half pant नाही घालायची :P  आणि १ दिवस ट्रेक असला तरी torch असावीच ) आणि नव्या उमेदीने पुन्हा सह्याद्रीत भटकायला तयार झालो.
Back to Top
Sponsored Links


Back to Top
amitsamant View Drop Down
Moderator Group
Moderator Group
Avatar

Joined: 16 Jun 2012
Location: Dombivali
Status: Offline
Points: 738
Post Options Post Options   Thanks (0) Thanks(0)   Quote amitsamant Quote  Post ReplyReply Direct Link To This Post Posted: 30 Dec 2014 at 4:01pm
थरारक अनुभव.
चांगला लिहिला आहेस.
Back to Top
 Post Reply Post Reply
  Share Topic   

Forum Jump Forum Permissions View Drop Down

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd.

This page was generated in 0.563 seconds.