Forum Home Forum Home > Nature > Flora and Fauna In Sahyadri
  New Posts New Posts RSS Feed - Yellow Pansy Butterfly
  FAQ FAQ  Forum Search   Events   Register Register  Login Login


Yellow Pansy Butterfly

 Post Reply Post Reply
Author
Message
amolnerlekar View Drop Down
Senior Member
Senior Member
Avatar

Joined: 21 Jan 2013
Location: DOmbivali
Status: Offline
Points: 159
Post Options Post Options   Thanks (0) Thanks(0)   Quote amolnerlekar Quote  Post ReplyReply Direct Link To This Post Topic: Yellow Pansy Butterfly
    Posted: 21 Nov 2014 at 10:31am
हळदी भिरभिरी 

निसर्ग म्हणजे नानाविध रंगांची उधळण. त्याच्यातील अनेक घटकांमधून रंगांची विलोभनियता अगदी सहज दृष्टीस पडते. मग ह्या विविधतेला फुलपाखर तरी कशी अपवाद राहणार? कण्हेरगडावर फिरताना मला भेटलेले पिवळ्याधमक रंगाचे फुलपाखरू : हळदी भिरभिरी

 

नराच्या पंखांवरील रंग हा मादीपेक्षा जास्त ठळक असतो. दोघांच्या पंखांच्या मध्यभागी निळ्या रंगाचे मोठे ठिपके आढळतात. ह्या ठिपक्यांचा आकार नरामध्ये मादीपेक्षा मोठा आणि ठळक असतो. निळ्या ठिपक्यांच्या भोवती असणार्या काळ्या रंगाचे प्रमाण नरामध्ये जास्त असते. मादीच्या पंखांवर निळ्या-काळ्या रंगाचे दोन छोटे 'डोळे' नजरेस पडतात. दोघांच्याही पंखांच्या वरील बाजूस पांढर्या-काळ्या रंगाची झालर दिसते. पंखांची खालेल बाजू निळ्या-राखाडी रंगाचे असते. पंखविस्तार ४.५ ते ६ से.मी. पर्यंत असतो. 



हळदी भिरभिरीचा वावर कोरांटी वनस्पतीवर जास्त प्रमाणात आढळून येतो. अंडी साधारण हिरव्या रंगाची असून आकार ०.६ ते ०.७ मि.मी. असतो. साधारणत: २ ते ३ दिवसात अंडी उबून त्यातून सुरवंट बाहेर येते. सुरवंटाची लांबी १.३ मि.मी. पर्यंत असते. सुरुवातीचे काही दिवस सुरवंटाची उपजीविका अंड्याच्या कवचावर होते. २२ दिवसांमध्ये अनेक टप्प्यातून ह्याची वाढ होत लांबी ४ से.मी. पर्यंत वाढते. त्याचा रंग फिकट लाल रंगाचा असतो. त्यापुढील ६ दिवसात त्या सुरवंटाचे फुलपाखरात रूपांतर होते. 



Yellow Pansy म्हणजेच हळदी भिरभिरी आफ्रिका, दक्षिण आशिया, भारतात आणि पर्यायाने सह्याद्रीत सर्वत्र आढळणारे फुलपाखरू आहे. ह्याच्या पिवळ्याधमक रंगामुळे ते सहज दृष्टीस पडते परंतू ह्याच रंगामुळे ह्याला स्वसंरक्षण करणेदेखील तितकेच कठीण जाते. 

Scientific name : Junonia hierta
Class/ Family : Insecta / Nymphalinae

संदर्भ : महाराष्ट्रातील फुलपाखरे (डॉ. राजू कसंबे), www.google.com.

फ़ोटो : १. हळदी भिरभिरी : नर (D. Momaya) ; २. हळदी भिरभिरी : मादी (अमोल नेरलेकर).

-- अमोल नेरलेकर । २१.११.२०१४ 


Edited by amolnerlekar - 21 Nov 2014 at 10:55am
Back to Top
Sponsored Links


Back to Top
chaitanya View Drop Down
Groupie
Groupie
Avatar

Joined: 12 Jul 2012
Location: Dombivli
Status: Offline
Points: 92
Post Options Post Options   Thanks (0) Thanks(0)   Quote chaitanya Quote  Post ReplyReply Direct Link To This Post Posted: 21 Nov 2014 at 10:41am
फार छान अमोल... असच लिहित रहा...
Back to Top
AARTI View Drop Down
Senior Member
Senior Member


Joined: 30 Apr 2014
Location: PUNE
Status: Offline
Points: 105
Post Options Post Options   Thanks (0) Thanks(0)   Quote AARTI Quote  Post ReplyReply Direct Link To This Post Posted: 21 Nov 2014 at 11:07am
मस्त लिहिला आहेस अमोल...
Back to Top
 Post Reply Post Reply
  Share Topic   

Forum Jump Forum Permissions View Drop Down

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd.

This page was generated in 0.113 seconds.