Forum Home Forum Home > Nature > Flora and Fauna In Sahyadri
  New Posts New Posts RSS Feed - Common Sailor Butterfly
  FAQ FAQ  Forum Search   Events   Register Register  Login Login


Common Sailor Butterfly

 Post Reply Post Reply
Author
Message
amolnerlekar View Drop Down
Senior Member
Senior Member
Avatar

Joined: 21 Jan 2013
Location: DOmbivali
Status: Offline
Points: 159
Post Options Post Options   Thanks (0) Thanks(0)   Quote amolnerlekar Quote  Post ReplyReply Direct Link To This Post Topic: Common Sailor Butterfly
    Posted: 24 Nov 2014 at 2:55pm
भटके तांडेल 

'व्यक्ती तितक्या प्रकृती' अशी आपल्याकडे मराठीत म्हण आहे; परंतु ट्रेक करताना किव्वा निसर्गात फिरताना आपल्याला 'व्यक्ती तितक्या आवडी' असे म्हणावे लागेल. सह्याद्रीत फिरताना कुणाला आवडतो तो त्याचा इतिहास, कुणाला भौगोलिक रचना, कुणाला प्राणी जीवनाचे वैविध्य तर कुणाला अगदी सहजपणे लक्ष वेधून घेणारे 'भटके तांडेल' सारखे फुलपाखरू…



कोवळ्या उन्हात पंख पसरून शांतपणे बसलेले 'भटके तांडेल' (Common Sailor) आपले लक्ष वेधून घेते. नर आणि मादी दिसायला सारखेच असून त्यांचा पंखविस्तार अंदाजे ५ ते ६ से.मी. पर्यंत असतो. पंखांचा रंग काळा असून त्यावर पांढर्या ठिपक्यांनी मिळून तयार झालेले तीन पट्टे असतात. पंखांचा खालिल भाग बदामी रंगाचा असतो. पंखांच्या कोपर्यावर असणारी काळ्या-पांढर्या रंगाची बारीक झालार त्याच्या रूपात सौंदर्य भरवते. 



याचा वावर शेवरी आणि मुरुडशेंग ह्या वनस्पतींवर प्रामुख्याने आढळतो. अंडी ०.९ मि.मी. आकाराची असून गोलाकृती असतात. अंडी उबायला साधारणत: ३ ते ४ दिवस लागतात आणि त्यानंतर बाहेर पडणारे सुरवंट लांबीला २.२ मि.मी. आणि रंगाने हिरवट असून त्यावर फिकट तपकिरी ठिपके असतात. पुढील साधारण २२ दिवसात ह्याची वाढ पूर्ण होते आणि त्याची लांबी २५ मि.मी. इतकी होते. पुढील २ दिवसात सुरवंटाचे फुलपाखरू होऊन ते उडण्यासाठी तयार होते. 

भटके तांडेल अलगद आणि हळुवार उडते आणि म्हणून कदाचित त्याला 'sailor' असे म्हणले जात असावे. Common Sailor दक्षिण आशिया आणि भारतात सर्वत्र आढळते. बाकी काही फुलपाखरान्प्रमाणेच ह्याचा पंखांचा उपयोग नैसर्गिक रंग बनविण्यासाठी होतो.   

Scientific name : Neptis hylas
Class/ Family : Insecta / Nymphalidae

संदर्भ : महाराष्ट्रातील फुलपाखरे (डॉ. राजू कसंबे), www.google.com.

-- अमोल नेरलेकर । २४.११.२०१४ 


Edited by amolnerlekar - 24 Nov 2014 at 2:56pm
Back to Top
Sponsored Links


Back to Top
dipali View Drop Down
Newbie
Newbie


Joined: 21 Nov 2014
Location: mumbai
Status: Offline
Points: 18
Post Options Post Options   Thanks (0) Thanks(0)   Quote dipali Quote  Post ReplyReply Direct Link To This Post Posted: 24 Nov 2014 at 3:03pm
Sundar lihile ahes...
Back to Top
amitsamant View Drop Down
Moderator Group
Moderator Group
Avatar

Joined: 16 Jun 2012
Location: Dombivali
Status: Offline
Points: 738
Post Options Post Options   Thanks (0) Thanks(0)   Quote amitsamant Quote  Post ReplyReply Direct Link To This Post Posted: 24 Nov 2014 at 3:24pm
मस्त
Back to Top
amitsamant View Drop Down
Moderator Group
Moderator Group
Avatar

Joined: 16 Jun 2012
Location: Dombivali
Status: Offline
Points: 738
Post Options Post Options   Thanks (0) Thanks(0)   Quote amitsamant Quote  Post ReplyReply Direct Link To This Post Posted: 24 Nov 2014 at 3:27pm
मस्त, अमोल.
Back to Top
 Post Reply Post Reply
  Share Topic   

Forum Jump Forum Permissions View Drop Down

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd.

This page was generated in 0.432 seconds.