Forum Home Forum Home > Adventure Forum > Monsoon Trekking
  New Posts New Posts RSS Feed - Avismarniya Bhorgiri ani Bhimashankar
  FAQ FAQ  Forum Search   Events   Register Register  Login Login


Avismarniya Bhorgiri ani Bhimashankar

 Post Reply Post Reply
Author
Message
Shreyas Pethe View Drop Down
Senior Member
Senior Member
Avatar

Joined: 05 Aug 2015
Location: Pune
Status: Offline
Points: 135
Post Options Post Options   Thanks (0) Thanks(0)   Quote Shreyas Pethe Quote  Post ReplyReply Direct Link To This Post Topic: Avismarniya Bhorgiri ani Bhimashankar
    Posted: 05 Aug 2015 at 9:48am
           खूप दिवसांपासून इच्छा होती भीमाशंकर ट्रेक करायची .मोहन शी बोलणं झालं आणि लगेच तयारी
चालू केली.तो म्हणाला राजगुरुनगर पासून बसावं लागेल ,मी तयारच होतो..मला काहीही
करून ट्रेक करायचा होता ,अगदी त्यासाठी तहसीलदार बाई ना वडील आजारी आहेत म्हणून
थाप पण मारली !!!!
     रात्री मित्राच्या घरी शिर्डी ला पोहोचलो ,मग मस्तपैकी सकाळी आवरून आम्ही दोघेही संगमनेर ला निघालो.
त्याने मला संगमनेर ला सकाळी ६ वाजता सोडले आणि मी लगेचच पुणे बस ने राजगुरुनगर
च्या दिशेने कूच केले.मोहन ला संपर्क करून मी चास (कमान) ला जायच ठरवलं.


          मला TREKSHITIZ चास ला भेटले.कुटुंब
वाटत होता ते एक..थोडा वेळ थांबून तिथे चहा-नाश्ता केला आणि पुढच्या प्रवासाला
लागलो...अंदाजे ११ वाजत आले होते...

           भोरगिरी म्हणजे किल्लेवजा एक टेहेळणी ची
जागा अशासाठी बांधला गेलेला किल्ला..तिथल मंदिर सुंदर..स्कर्ट घातलेली गणपतीची
मूर्ती रोमन आणि ग्रीकांशी त्या काळी चालू असलेल्या व्यापाराची साक्ष
देणारी..कौठेश्वर मंदिराचे जुने अवशेष त्याची प्राचीन सुंदरता स्पष्ट करत
होते.त्यानंतर एक छोटीशी ओळख परेड झाली .सगळे मुरलेले होते त्यासोबत एक नन्हा
शिपाई पण होता १५ ट्रेक केलेला!!!

         भुरभूर पावसात भोरगिरी वर पोहोचलो.मी डबा आणला न्हवता पण तसा मला अजिबात जाणवल नाही.भोरगीरीवरील
पाण्याचे कुंड,विरभद्राची मूर्ती,महादेव पिंडी तसेच भग्नावस्थेतील प्रवेशद्वार
पाहत गुप्त भीमाशंकर कडे प्रयाण केले. वाटेत येणाऱ्या झाडांची,फुलांची,ऐतिहासिक
गोष्टींची,पक्षांची माहिती अमित अदा,चिन्मय,प्रणोती,सुगंधा सांगत होतेच.

         गुप्त भीमाशंकर एक अविस्मरणीय अनुभव ठरला.तो पाण्याचा प्रवाह,गौरव आणि सचिन ने केलेली पाण्यातील
साखळी,पाठीचा मसाज आणि शेवटी ती लपलेली महादेवाची पिंड!!!!!!

          पावसात भिजतच घनदाट अरण्यातून भीमाशंकर गाठलं.जबरदस्त भिजलो होतो.मुंबईच्या डबेवाल्यांच्या धर्मशाळेत
निवासाची उत्तम व्यवस्था केली होती.रात्री जेवणाच्या आधी छोटे छोटे ग्रुप करून
नाटुकले सदर केले.आम्ही मुकाभिनय केल्याने आम्हाला प्रथम क्रमांक मिळाला!!!
          झोपताना TD ने TREKSHITIZ ची ,चिन्मय
आणि प्रणोती ने FLOURA AND FAUNA IN BHIMASHANKAR WILDLIFE SANCTURY ची,सुगंधाने
फुलांबद्दल माहिती दिली.अमित दादा ने आम्ही ज्या मार्गाने आलो त्याचे ऐतिहासिक
महत्व सांगितलं .जेवण खूप चं झालं ,तिथूनच एक मस्त घोंगडी घेऊन स्वर्गात गेलो!!!!

         ६ वाजता WAKE UP CALL झाला.चहा-नाश्ता आटोपून नागफणी पाहून आलो.अमित
दादा सोबत वेगवेगळया विषयांवर चर्चा झाली.महाराजांचे दुर्ग बांधणीचे
तंत्र,पद्मदुर्ग,सिंधुदुर्ग बद्दल चं माहिती मिळाली.येताना भीमाशंकर आणि भीमेचा
उगम याचे दर्शन घेतले.प्रसन्न वाटलं .ती घंटा पहिली.चिमाजी आप्पांचा पराक्रम!!!!

           आल्यावर जेवण करून गणेश घटने उतरण्यास सुरुवात केली.उतरताना सारखा पदरगड साद घालत होता.पुढच्या
वेळेस पदरगड सर् करायचाच या इराद्याने घात उतरलो.सुंदर धबधबे,निबिड अरण्य,मुसळधार
पाऊस,त्यात सगळ्यांची साथ.कधी खांडस ला पोचलो समजलेच नाही..

           भोरगिरी आणि पदरगड या व्यापारी मार्गावरील टेहेळणी दुर्गांमधील सुंदर ट्रेक दोन दिवसात
कापला.कौठेश्वर आणि भीमाशंकर हि विश्रांती स्थाने पहिली.नवीन ट्रेक वेड्यांची ओळख
झाली.जाणकार साथीदार मिळाले.नवीन नाती जुळली.

अविस्मरणीय अनुभवांनी गच्च भरलेल्या या प्रवासाने खूप काही शिकवले.





 


Edited by Shreyas Pethe - 05 Aug 2015 at 11:40am
Back to Top
Sponsored Links


Back to Top
amitsamant View Drop Down
Moderator Group
Moderator Group
Avatar

Joined: 16 Jun 2012
Location: Dombivali
Status: Offline
Points: 738
Post Options Post Options   Thanks (1) Thanks(1)   Quote amitsamant Quote  Post ReplyReply Direct Link To This Post Posted: 05 Aug 2015 at 10:26am
श्रेयस , छान लिहील आहेस.
Back to Top
 Post Reply Post Reply
  Share Topic   

Forum Jump Forum Permissions View Drop Down

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd.

This page was generated in 0.746 seconds.