तोफा व तोफगोळे |
Post Reply |
Author | |
amitsamant
Moderator Group Joined: 16 Jun 2012 Location: Dombivali Status: Offline Points: 738 |
Post Options
Thanks(0)
Posted: 16 Jun 2012 at 8:55pm |
बंदुकीच्या दारुचा शोध कोणी व केव्हा लावला याबद्दल
मतभेद असले, तरी भारतात त्यासंबंधीचे ज्ञान बर्याच काळापासून ज्ञात होते. टॅव्हेनियर
या इटालियन प्रवाशाच्या माहितीनुसार भारतात आसाममध्ये बंदुकीची दारु तयार करण्याचे
तंत्र माहित होते. तेथून ते ब्रम्हदेशातून सर्व जगात फैलावले. प्राचिन भारतात बंदुकीच्या
दारुचा दुसरा उल्लेख डयूटेनच्या साहित्यात मिळतो. बंदुकीच्या दारुमुळे अलेक्झांडरच्या
हिंदूस्तान जिंकण्याच्या पुढील मोहीमेला प्रतिबंध बसला असा उल्लेख आढळतो. पाश्चिमात्य
इतिहासकारांच्या मते बंदुकीच्या दारुचा शोध रॉजर बेकन याने इ.स. १२४९ मध्ये लावला.
परंतू चर्चच्या भितीने उघड न केलेले हे दारूच्या शोधाचे सांकेतीक भाषेत लिहून ठेवलेले
ज्ञान काही वर्षांनी जर्मन पाद्री बेयॉल्ड स्वॉर्ल्झ याने अभ्यास करुन प्रात्यक्षिकाद्वारे
इ.स. १३२० साली जगासमोर आणले. तोफा ओतण्याचे
तांत्रिक ज्ञान ख्रिश्चनांपासून स्पेनमधील मुसलमानापर्यंत पोहचले, ते तुर्कांनी आत्मसात
केले. तुर्कस्थानचा सुलतान दूसरा महमूद याने अर्बन नावाच्या तंत्रज्ञाकडून "ऑन्ड्रीनोपल"
ही अजस्त्र तोफ तयार केली. या तोफेचे नळकांडे २७ फूट लांब असून या तोफेमधून १००० पौंड
वजनाचा तोफगोळा १ मैल लांब अंतरावर फेकण्यात येत असे. १४५३ मध्ये याच दूसर्या महेमूदाने
१३ अवजड व ५६ लहान तोफांसह; रोमन साम्राज्याच्या कॉन्स्टिन्टीनोपल शहरांच्या भिंतीवर
सतत तोफांचा भडिमार करुन; भिंती नेस्तनाबूत करीत शहरात प्रवेश केला व रोमन साम्राज्याचा
अंत केला. रणतंत्राच्या दृष्टीने तोफ हे वेढ्याच्या कामासाठी तसेच अभेद्य भिंत पाडण्याच्या
दृष्टीने एक फार मोठे शस्त्र आहे, हे या युध्दात सिध्द झाले. बाबराने
पानिपतच्या पहिल्या युध्दात व १५२७ मध्ये राणासंगाविरूद्धच्या शिक्रीच्या लढाईत तोफांचा वापर केला. बाबराने भारतात प्रवेश करताना
उस्ताद कुली खान या तोफा ओतण्यार्या तुर्की तंत्रज्ञाला बरोबर आणले व त्याच्या मदतीने
आग्य्राला तोफा ओतण्याचा छोटा कारखानाही काढला होता. पानिपतच्या तिसर्या युध्दात मराठ्यांनी
युरोपियनांकडून काही तोफा विकत घेऊन वापरल्या. प्रारंभीच्या
काळात तोफा ब्रॉन्झच्या बनविलेल्या असत. १५ व्या शतकात त्या ओतिव लोखंडाच्या केल्या
जात. इ.स. १७८४ मध्ये इंग्लीश सैन्यदलातील एक आधिकारी हेन्र्री शार्पनेल याने; तोफेच्या
नळकांड्यातून बाहेर पडून लक्ष्याला भिडल्यानंतरच स्फोट होणार्या तोफगोळ्याचा शोध लावला.
ब्रॉन्झच्या तोफा या उष्णतेने वितळण्याच्या धोक्यामुळे तोफांमध्ये लोखंडाचा वापर वाढून
अनेक फैरी जलद गतीने फेकता येऊ लागल्या. नेपोलीयनने इ.स. १८०८ मध्ये शत्रुची संरक्षण
फळी फोडण्यासाठी तोफांचा उपयोग केला होता. इ.स. १८५१ मध्ये जर्मनच्या क्रॅप्स कारखानदाराने; ब्रीच लोडींग तोफेच्या पाठीमागील भागाकडून दारुगोळा भरण्याची सोय करून तोफेच्या तंत्रात क्रांतीकारी सुधारणा केली. जर्मनीजवळ पहिल्या महायुध्दात १६००० यार्ड पल्ल्याच्या ४२ सीएम तोफा व दुसऱ्या महायुद्धात ८८ मिमि तोफा होत्या. Edited by amitsamant - 04 Feb 2014 at 4:30pm |
|
Sponsored Links | |
Post Reply | |
Tweet
|
Forum Jump | Forum Permissions You cannot post new topics in this forum You cannot reply to topics in this forum You cannot delete your posts in this forum You cannot edit your posts in this forum You cannot create polls in this forum You cannot vote in polls in this forum |