सात |
Post Reply |
Author | |
saurabhshetye
Senior Member Joined: 15 Nov 2013 Location: Mumbai Status: Offline Points: 159 |
Post Options
Thanks(0)
Posted: 15 Aug 2014 at 6:08pm |
वेडात मराठे वीर दौडले सात !
“श्रुति धन्य जाहल्या श्रवुनि आपुली
वार्ता
रण सोडुनि सेनासागर अमुचे पळता
अबलाहि घरोघर ख-या लाजतिल आता
भर दिवसा आम्हा दिसू लागली रात”
वेडात मराठे वीर दौडले सात !
ते कठोर अक्षर एक एक त्यातील
जाळीत चालले कणखर ताठर दील
“माघारी वळणे नाही मराठी शील
विसरला महाशय काय लाविता जात?”
वेडात मराठे वीर दौडले सात !
वर भिवई चढली दात दाबती ओठ
छातीवर तुटली पटबंदाची गाठ
डोळ्यांत उठे काहूर ओलवे काठ
म्यानातुन उसळे तरवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात ! “जरी काल दाविली प्रभु, गनिमांना पाठ
जरी काल विसरलो जरा मराठी जात
हा असा धावतो आज अरी-शिबिरात
तव मानकरी हा घेउनि शीर करात”
वेडात मराठे वीर दौडले सात !
ते फिरता बाजुस डोळे किंचित ओले सरदार सहा सरसावुनि उठले शेले रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले उसळले धुळीचे मेघ सात, निमिषात वेडात मराठे वीर दौडले सात ! आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना छावणीत शिरले थेट, भेट गनिमांना कोसळल्या उल्का जळत सात दर्यात वेडात मराठे वीर दौडले सात ! खालून आग, वर आग, आग बाजूंनी, समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी, गर्दीत लोपले सात जीव ते मानी खग सात जळाले अभिमानी वणव्यात वेडात मराठे वीर दौडले सात ! दगडांवर दिसतिल अजुनि तेथल्या टाचा ओढ्यात तरंगे अजुनि रंग रक्ताचा क्षितिजावर उठतो अजुनि मेघ मातीचा अद्याप विराणी कुणि वा-यावर गात वेडात मराठे वीर दौडले सात ! -
कुसुमाग्रज नाशिक, 1936
|
|
Sponsored Links | |
Post Reply | |
Tweet
|
Forum Jump | Forum Permissions You cannot post new topics in this forum You cannot reply to topics in this forum You cannot delete your posts in this forum You cannot edit your posts in this forum You cannot create polls in this forum You cannot vote in polls in this forum |