दुर्गादेवी मंदिर ( |
Post Reply |
Author | |
amitsamant
Moderator Group Joined: 16 Jun 2012 Location: Dombivali Status: Offline Points: 738 |
Post Options
Thanks(0)
Posted: 13 Dec 2014 at 9:38am |
दुर्गादेवी मंदिर (मुरुड हर्णे)
गावाचे नाव :- मुरुड हर्णे जिल्हा :- रत्नागिरी जवळचे मोठे गाव :- दापोली. दापोली जवळ असलेल्या मुरुड हर्णे हे प्राचीन काळापासून नावाजलेले बंदर आहे. या गावात दुर्गादेवीचे प्राचिन मंदिर आहे. सध्या बांधलेल्या मंदिराचा जिर्णोध्दार १७६३ मधे करण्यात आलेला आहे. सभामंडपात प्रवेशव्दाराच्या डाव्या बाजूस एक मोठी घंटा टांगलेली आहे. ही पोर्तुगिज घंटा आहे. मंदिराचा सभामंडप कोरीव लाडकी खांबांवर तोललेला आहे. खांबांच्या वरच्या बाजूस शरभ व हत्ती कोरलेले आहेत. गाभार्याच्या व्दारपट्टीवर गणेशमुर्ती कोरलेली आहे. गाभार्यातील दुर्गादेवीची मुर्ती अष्टभूजांची असून ती कर्नाटकातल्या गंडकी नदितील शिळेपासून बनवलेली आहे. मंदिराच्या बाहेर एक झिजलेला गध्देगाळ ठेवलेला आहे. मंदिराच्या बाजूला मुरुड हर्णे गावातील प्राथमिक शाळा आहे. या शाळेचे वैष्ष्ट्य म्हणजे या साळेन दोन भारत्रत्न भारताला दिलेले आहेत. त्यपैकी एक महर्षी धोंडो केशव कर्वे आणि दुसरे रॅंगलर परांजपे. जाण्यासाठी :- मुंबईहून दापोलीला पोहोचावे. दापोलीहुन ८ किमी वरील मुरुड हर्णे गावातील दुर्गादेवी मंदिरापाशी गाडीने थेट पोहोचता येते. आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- १) सुवर्णदुर्ग, गोवा, फ़त्तेदुर्ग, कनकदुर्ग २) आंजर्ल्याचा कड्यावरचा गणपती ३) व्याघ्रेश्वर मंदिर, आसुद ४) केशवराज मंदिर, आसुद वरील सर्व ठिकाणांची माहिती साईटवर दिलेली आहे. Durga devi Mandir , Murud Harne, Durgadevi Temple , Murud harne, Temples in Kokan , Temples near Dapoli, Temples in Ratnagiri District. Edited by amitsamant - 14 Jan 2015 at 12:36pm |
|
Sponsored Links | |
Post Reply | |
Tweet
|
Forum Jump | Forum Permissions You cannot post new topics in this forum You cannot reply to topics in this forum You cannot delete your posts in this forum You cannot edit your posts in this forum You cannot create polls in this forum You cannot vote in polls in this forum |