Forum Home Forum Home > Adventure Forum > Adventure Sports
  New Posts New Posts RSS Feed - झुंज वेगाशी- Iron Butt Associ
  FAQ FAQ  Forum Search   Events   Register Register  Login Login


झुंज वेगाशी- Iron Butt Associ

 Post Reply Post Reply
Author
Message
Deepali Lanke View Drop Down
Senior Member
Senior Member
Avatar

Joined: 16 Feb 2013
Location: Pune
Status: Offline
Points: 230
Post Options Post Options   Thanks (0) Thanks(0)   Quote Deepali Lanke Quote  Post ReplyReply Direct Link To This Post Topic: झुंज वेगाशी- Iron Butt Associ
    Posted: 24 Dec 2014 at 11:18am
                        झुंज वेगाशी- Iron Butt Association’s SaddleSore 1600KM

                                  - दीपाली लंके 4th January 2014

जिद्द, इच्छाशक्ती आणि स्वतःवर विजय मिळवण्याची इच्छाच माणसाला काहीतरी वेगळं करण्याच बळ देते.बऱ्याच गोष्टी आपण आयुष्यात करत असतो पण वेगाशी स्पर्धा करण्याचा आपण कधी विचार करतो का? वेग हा शब्द आला कि आपल्याला वेग आणि वाऱ्याशी झुंज देणारे रायडर डोळ्यांसमोर येतात. आणि वेगाशी स्पर्धा करणाऱ्या एखाद्या Championship बद्दल माहिती मिळालीच तर त्याचे वेध न लागले तर नवलच. Championship शब्द सोपा आहे पण तो प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मात्र जीवाचा रान कराव लागतं.Management Skill चा संबंध येतो तो येथेच. रायडींग चा रणसंग्राम तोही वेगाशी स्पर्धा करत वाऱ्याला कापत पुढे जात राहणं न थांबता न थकता आपल्या ध्येयाला जवळ करत राहण या गोष्ठी ध्येयाने पछाडलेलेच करू शकतात.काहीतरी वेगळं प्रत्येकालाच कराव वाटत पण नेमक कसं कराव आणि काय कराव हेच लक्षात येत नाही. आणि असे विचार करणारे जोडगोळे एकत्र आले कि भन्नाट कल्पना,स्वप्न सत्यात उतरल्याशिवाय राहत नाही.रोहन पाटील रायडींग मध्ये मातब्बर , रायडींग म्हणजे जीव कि प्राण असणारा आणि त्याच्या मागे बसून त्या रायडींग चा भल्या भल्यांना आस्वाद घ्यावासा वाटला तरी न घेता येणारी मंडळी पण मी मात्र मुळातच निर्भीड बाणा असणारी या रायडींग चा मन मुराद आनंद लुटत असते.Iron Butt Association मुळातच आपली वेगळी ओळख निर्माण केलेली एक संस्था आहे जी रायडर्स ला सतत प्रोत्साहन देत असते .विभिन्न प्रकार आणि त्यात असलेला मिश्कीलपणा हे वेबसाईट बघताना लक्षात येतो.आपण कितपत खडतर प्रवास पेलू शकतो त्यावर आपण कोणती Championship करावी हे समजते. उगीच गाडी काढावी आणि अंतर पार करावे आणि म्हणावं मी Championship पूर्ण केलीय त्याला अर्थ नसतो. 

एक रेखेसूद Championship म्हटलं तर वेळेच बंधन, त्या रायडींग शी संबंधित असलेली अनाकलनीयता अनुभवन म्हणजे एक अविस्मरणीय शिदोरी च होय.आम्ही निवडलेली Championship म्हणजे SaddleSore 1600KM. जेव्हा एकटा रायडर रायीड करतो तेव्हा हा घमासान संग्राम बारा वाटतो पण मागे पिलिअन ला घेवून जान म्हटलं तर भल्या भल्यांना जिकीरीच वाटत . आम्ही मनात पक्क ठरवलं काहीही झाला तरी आम्ही दोघेहि सोबत एकाच गाडीवर  Championship पूर्ण करणार.24 तासात 1600 किलोमीटर अंतर हे कापायचं आणि घेतलेल्या प्रत्येक थांब्याची महिती आणि पेट्रोल भरण्याची पावती , ओडोमीटर रीडिंग, रायीड सुरुवात करण्याच्यावेळी असणारा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार ,आणि तुम्ही परत अर्ध वळण घेणार तेव्हा असणारा मध्य प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि रायीड संपल्यावर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार खूप महत्वाचे असून त्या आधारे तुम्ही केलेली Championship qualify होते. रायीड करताना साधे नियम पाळावे लागतात पूर्ण Safety Gears असणे बंधनकारक असते. प्रत्येक गोष्टीची काळजी येथे घ्यावी लागते तुम्ही निवडलेला मार्ग सुद्धा यात बरीच अडचण किंवा मदत करू शकतो. आम्ही निवडलेला मार्ग पुढीलप्रमाणे होता:- HPCL Balwadkar Auto Mumbai Bangalore Bypass Highway, near Sayaji Hotel, Wakad Pune, Maharashtra, India - Nelamangala, Tumkur, Bangalore - HPCL Balwadkar Auto Mumbai Bangalore Bypass Highway, near Sayaji Hotel, Wakad Pune, Maharashtra, India (821 km one way).

आम्ही हा प्रवास आमच्यासारख्याच रायडींग मध्ये तरबेज असलेल्या दोन रायडर (अरुण पवार आणि अरुण झांजे )सोबत 4 जानेवारी 2014 रोजी रात्री 3 वाजता चालू केला. वेळेचं बंधन ,वेग आणि Championship बद्दल असलेली कुतूहलता यामुळे मनाची घालमेल हि चालूच होती. आम्ही आमचा हा खडतर प्रवास चालू केला तो एकाच ध्येयपूर्तीने.जानेवारी हा महिना थंडीचा आणि त्यात वेगाशी, वाऱ्याशी मैत्री करावी म्हंटली तरी दोघे मैत्रीचा हात पुढे करता करत नाही. सगळे गेअर्स असले तरी थंडीमुळे अंगावर शहारे आल्यावाचून राहत नाही. आम्ही फक्त 10 टप्पे या रायीड साठी घेतले ते फक्त इंधन भरण्यासाठी एरवी वेळ जाता जात नाही आणि या दिवशी घड्याळाचे काटे एवढ्या वेगाने पुढे सरकत होते कि सूर्योदय कधी झाला आणि सुर्य डोक्यावर येवून मध्यान्ह होवून कधी सूर्यास्ताकडे मार्गक्रमण करत होता हे कळतच नव्हते ध्येय दृष्टीसमोर असले कि भूक तहान विसरून आपण मार्गक्रमण करत असतो यावेळी प्रत्यक्ष आम्ही अनुभव घेतला आवश्यक तेवढेच आम्ही ग्लुकोज पाणी, फळ आणि थोडा नाश्ता करून होतो. जेवण्याचा विषय निघाला आणि कुणी काढला. रायडींग करणे वेगाशी मैत्री करून त्यावर आरूढ होणे आणि वाऱ्याला कापत ध्येयाच्या दिशेने जाने खूपच रोमाचांक अनुभव आणि शिकवण आहे.

रायडर ने मारलेले लहान लहान कट,अवजड वाहनांना मागे टाकत वेळ पडेल तेव्हा त्यांना जागा देत पुढे रायीड करत राहणे म्हणजेच एक कला आहे. डोळ्यांची उघडझाप न करता थंडीनी हात पाय शहारले तरी घोड- दौड चालूच ठेवणाऱ्या रायडर मंडळीना मी पिलिअन सलाम करू इच्छिते.अधून मधून डोकावणारे अडथळे माणसं, वाहणं,आणि उरले सुरले आपले स्पीड ब्रेकर जीवाची घाल मेल वाढवतात येथे रायडर चा कस लागतो गाडीवर नियंत्रण ठेवून न धडपडता अगदी कलात्मकतेने वाटचाल करणे हे काही सोपे नव्हे. एकमेका साह्य करू या उक्तीप्रमाणे आम्ही एकमेकांना साथ देत वाटचाल करत होतो. दिवस होता तेव्हा रायडींग करणे सोपे होते पण जसा जसा काळोख वाढत होता तेव्हा मात्र डोळ्यावर येणाऱ्या गाड्याच्या प्रकाशामुळे रायीड करणं नाही म्हंटले तरी अवघड जात होते ध्येयपूर्ती जस जशी होत होती आणि अवघे काही किलोमीटर राहिले असताना गाडीच्या vibration मुळे आणि वेगामुळे शरीर अगदी सुन्न पडलं होतं.हात पाय अगदी बधिर झाले होते. थंडीमुळे भुकेने पोट व्याकुळ झालं होतं आणि अधून मधून ती व्याकुळता डोकावत होती.डोळ्यांची उघडझाप अक्षरश बंद झाली होती डोळे उघडे होते ते अंतिम स्थाना पर्यंत पोहचण्यासाठीच. पाय,हात ताठरले होते थंडी मुळे काय काय  होऊ शकतं हे येथेच अनुभवलं. There is will; there is Way! या शब्दांप्रमाणे आम्ही अक्षरश या Championship चा फडशा पाडला आणि स्वप्न सत्यात उतरलं.आम्ही कोणत्याही विक्रमासाठी हि घोड दौड केली नव्हती प्रयत्नांना यशाची जोड हि लाभतेच मी आणि रोहन हि Championship करणारे दुसरे जोडगोळे ठरलो आणि आमच्या प्रयत्नांची पराकाष्टा फळरुपास आली. येणारे अडथळे आणि त्यांना समर्पकपणे उत्तर देण्याची शक्ती च येथे पुरून उरते आणि तुम्हाला विजयाचा साक्षीदार करते. निर्भीडता, रायडींग शैली,सहन शक्ती आणि इच्छाशक्ती जिंकली आणि आम्ही सुद्धा!! वेगाशी स्पर्धा करणाऱ्या सगळ्या रायडर्स ला सलाम!!


SaddleSore 1600KM Champonship च्या अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर टिचकी मारा:

               http://www.ironbutt.com/ridecerts/getdocument.cfm?DocID=30



Edited by Deepali Lanke - 24 Dec 2014 at 11:20am
Back to Top
Sponsored Links


Back to Top
amitsamant View Drop Down
Moderator Group
Moderator Group
Avatar

Joined: 16 Jun 2012
Location: Dombivali
Status: Offline
Points: 738
Post Options Post Options   Thanks (0) Thanks(0)   Quote amitsamant Quote  Post ReplyReply Direct Link To This Post Posted: 24 Dec 2014 at 12:23pm
Dipali,
छान लिहिल आहेस, आमच्यासाठी पण हे काहीतरी वेगळ आणि नविन आहे. 
Back to Top
AARTI View Drop Down
Senior Member
Senior Member


Joined: 30 Apr 2014
Location: PUNE
Status: Offline
Points: 105
Post Options Post Options   Thanks (0) Thanks(0)   Quote AARTI Quote  Post ReplyReply Direct Link To This Post Posted: 01 Jan 2015 at 2:25pm
मस्त लिहिलं आहेस दिपाली...!
Back to Top
 Post Reply Post Reply
  Share Topic   

Forum Jump Forum Permissions View Drop Down

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd.

This page was generated in 0.336 seconds.