Forum Home Forum Home > Nature > Birds of India
  New Posts New Posts RSS Feed - 'भिगवण पक्षी निरीक
  FAQ FAQ  Forum Search   Events   Register Register  Login Login


'भिगवण पक्षी निरीक

 Post Reply Post Reply
Author
Message
Nimisha Joshi View Drop Down
Newbie
Newbie
Avatar

Joined: 17 Jan 2014
Location: Dombivli (E)
Status: Offline
Points: 10
Post Options Post Options   Thanks (0) Thanks(0)   Quote Nimisha Joshi Quote  Post ReplyReply Direct Link To This Post Topic: 'भिगवण पक्षी निरीक
    Posted: 20 Jan 2014 at 3:47pm
दरवर्षी काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा ट्रेकक्षितीज संस्थेचा प्रयत्न असतोया प्रयत्नातूनच नवनवीन संकल्पनांचा शोध लागतो आणि मग गड किल्ल्यांवर इतिहास शोधणारी पाऊले अवचित पक्षी फुले आणि फुलपाखरे यांचा वेध घेऊ लागतात.  नुकताच झालेला भिगवण पक्षीनिरीक्षण उपक्रम हा याचे उत्तम उदाहरण आहे. झोंबणारी थंडी, निळेशार पाणी, त्यावर स्वच्छंद बागडणारे पाणपक्षी आणि येन तेन प्रकारेण त्यांचा मागोवा घेणारे आम्ही असे ह्या सोहळ्याचे स्वरूप होते.  

भीमा नदीवर असणाऱ्या उजनी धरणामुळे तयार झालेल्या पाणवठ्यावर दरवर्षी हजारोंच्या संख्येने पाणपक्षी निवाऱ्यासाठी येतात. सोलापूर महामार्गावर असणारे भिगवण हे छोटेसे गाव तिथे येणाऱ्या स्थलांतरित पाणपक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे.  पुणे शहरापासून सुमारे १०० किमी अंतरावर असणाऱ्या या गावी जाण्यासाठी ट्रेन आणि बस या दोन्ही मार्गांचा अवलंब करता येतो परंतु लांब लांब पसरलेल्या जागांमुळे आम्ही खाजगी वाहनाने जाणे पसंत केले.


डोंबिवलीहून शुक्रवार दिनांक १० जानेवारी रोजी रात्री ११३० च्या सुमारास टीम निघाली. शनिवारी सकाळी ०५.३० ला आम्ही भिगवण मधील कुंभारवाडी या गावात पोहोचलो. कुंभारवाडी गावात श्री संदीप नगरे यांनी आमची चहा नाश्ता जेवण आणि राहण्याची सोय केली होती तसेच पक्षीनिरीक्षणासाठी लागणाऱ्या होड्यांची सोयही त्यांनी करून ठेवलेली. चहा नाश्ता  आटोपून सुमारे ०८.३० च्या सुमारास आम्ही पक्षीनिरीक्षणाचा श्रीगणेशा केला.


भिगवण पक्षीनिरीक्षण उपक्रम हा प्रामुख्याने खालील प्रकारात विभागता येईल 


कुंभारवाडी परिसर


डिकसळ परिसर 


 संदीप  यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कुंभारवाडी गावातील कच्च्या रस्त्याच्या अंगाने पाणवठ्याजवळ पोहोचलो तिथून पुढे होडीने पलीकडच्या किनाऱ्यापर्यंत जाताना आम्हाला अनेक पक्षी बघावयास मिळाले.  हे निरनिराळे पक्षी बघताना अर्थात संदीप यांचे मार्गदर्शन होतेच.  संदीप  हे स्वतः पक्षीनिरीक्षण चे अभ्यासक आहेत.  अनेक लेखकांची पुस्तके अभ्यासून आता त्यांनी स्वतः पुस्तक लिहिण्याचे कार्य हाती घेतले आहे. ह्या सकाळच्या सत्रात आम्हाला  पुढील प्रमाणे पक्षी बघावयास मिळाले


Black winged stilt


  
               

Brown headed seagull



           

Grey Heron

               


           
Open billed stork





Painted Stork





Flemingo





Green beaeater





Hoopooe





Ashy Drongo





Cormorant



Lark
Northen shoveler (Male & Female)
Yellow Wogtail
Spoon billed stork
Whiskered Tern
River tern
Round headed gull
Longtail shrike
Sandpiper
Red Avadawat (Formerly known as Red munia)
White Throated kingfisher
Purple sunbird
Purple rumped sunbird
Little egret
Large egret
Bar headed goose
Black ibis
White ibis
Glossy ibis
Chakrawat
Red vented bulbul
Godwit

साधारण १२.३० च्या सुमारास म्हणजे तब्बल ४ तासांच्या अथक श्रमानंतर आम्हाला भुकेची जाणीव होऊ लागली आणि मग पोटपुजेसाठी आम्ही संदीप यांच्या घरी प्रस्थान केले. गरम गरम गावरान जेवण आणि घटकाभर वामकुक्षी झाल्यावर साधारण ४ च्या सुमारास आम्ही पुन्हा पक्षीनिरीक्षणासाठी कंबर कसली. परंतु या दुसर्यादुसऱ्या सत्रात पुन्हा होडीने प्रवास न करता आम्ही चालतच किनारा आणि त्या आजूबाजूला पसरलेली शेतवाडी पिंजून काढायचे ठरवले. जेणेकरून जे पक्षी पाण्यान स्वैर न करता किनाऱ्याची शोभा वाढवतात त्यांच्यावरही नेत्रसुख घेता येईल. संधीप्रकाशात आणखीनच उजळू पाहणारा तीर त्यात आपली रुपडी पाहणारे पक्षी आणि कातरवेळी घराची ओढ लागलेले पक्ष्यांचे थवे पाहून आम्ही थक्क झालो. या दुसऱ्या सत्रात पुढील पक्षी आम्हास पहावयास मिळाले

 

Purple Moorhen





Pond Heron





Common coot


 


Jungle myna





Common stonechat




दिवेलागणी च्या सुमारास आम्ही संदीप नगरे यांच्या घरी परतलो. प्रात्याक्षिकाला जोड मिळावी म्हणून ट्रेकक्षितीज संस्थेतर्फे प्रणोती खानोलकर यांनी आम्हाला स्लाईड शो दाखवला ज्यात सर्व तांत्रिक गोष्टींचा समावेश होता. पक्षी म्हणजे काय त्यांचे अवयव वैशिष्ट्ये काय इथ पासून ते पक्षी कसे ओळखावेत ह्या सर्व तांत्रिक बाबींचा अभ्यास या स्लाईड शो मधून करावयास मिळाला. अशाप्रकारे हा भिगवण पक्षीनिरीक्षणाचा पहिला टप्पा पार पडून आणि पुढील दिवशीचे आकर्षण असणाऱ्या मयुरेश्वर प्राणी अभयारण्याचे स्वप्न उशाशी घेऊन आम्ही निद्रादेवीच्या अधीन झालो.



Back to Top
Sponsored Links


Back to Top
chaitanya View Drop Down
Groupie
Groupie
Avatar

Joined: 12 Jul 2012
Location: Dombivli
Status: Offline
Points: 92
Post Options Post Options   Thanks (0) Thanks(0)   Quote chaitanya Quote  Post ReplyReply Direct Link To This Post Posted: 20 Jan 2014 at 4:02pm
खूप छान लिहिल आहे. आणि छान फोटो. त्या दिवशीच्या आठवणी ताज्या झाल्या. हा माझ्यासाठी पहिला पक्षीनिरिक्षणाचा अनुभव होता. आणि त्यात खूप बघायला आणि शिकायला मिळाले.   
Back to Top
trekmayuri View Drop Down
Newbie
Newbie
Avatar

Joined: 30 Sep 2012
Location: Dombivali
Status: Offline
Points: 24
Post Options Post Options   Thanks (0) Thanks(0)   Quote trekmayuri Quote  Post ReplyReply Direct Link To This Post Posted: 20 Jan 2014 at 4:10pm
Very informative...Thanku nimisha :)
I missed to see all these ones in real with you all but loved the photos and hoping to spot them very soon :)
Keep it up guys.. 
Back to Top
amitsamant View Drop Down
Moderator Group
Moderator Group
Avatar

Joined: 16 Jun 2012
Location: Dombivali
Status: Offline
Points: 738
Post Options Post Options   Thanks (0) Thanks(0)   Quote amitsamant Quote  Post ReplyReply Direct Link To This Post Posted: 20 Jan 2014 at 7:38pm
प्रिय निमिषा,
पहिल्याच प्रयत्नात सुंदर लिहिल आहेस.फोटोही फार सुंदर आहेत. फोटो बरोबर पक्ष्यांची मराठी नाव दिली असतीस तर बर झाल असतं. मराठी नाव जास्त सुंदर आहेत. 
दुसर्‍या भागाची वाट पाहतोय.

अमित सामंत

Back to Top
sunilT View Drop Down
Newbie
Newbie
Avatar

Joined: 25 Nov 2013
Location: Dombivli
Status: Offline
Points: 3
Post Options Post Options   Thanks (0) Thanks(0)   Quote sunilT Quote  Post ReplyReply Direct Link To This Post Posted: 20 Jan 2014 at 8:22pm
Gr8 pics.. good narration :)

Back to Top
 Post Reply Post Reply
  Share Topic   

Forum Jump Forum Permissions View Drop Down

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd.

This page was generated in 0.096 seconds.