Print Page | Close Window

प्रयत्नांची परिसी

Printed From: TreKshitiZ
Category: Adventure Forum
Forum Name: Events
Forum Description: Mountaineering and Trekking related events, Photography Competition, Audio Video Competition.
Note :- Please do not add trekking events anywhere on this Discussion Board.
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=318
Printed Date: 01 Jan 2025 at 3:20pm
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: प्रयत्नांची परिसी
Posted By: Deepali Lanke
Subject: प्रयत्नांची परिसी
Date Posted: 04 Feb 2015 at 11:47am
 

                                        प्रयत्नांची परिसीमा - निसर्गमित्र संस्था, पनवेल

दीपाली लंके २६/०१/२०१५

निसर्गमित्र संस्थेने Valley Crossing प्रबळगड किल्ला ते कलावंतीन खूबा अंदाजे ६०० फूट हा कार्यक्रम  २४, २५ आणि २६ जानेवारी २०१५ रोजी आयोजित केला होता. अनेक संस्था असे साहसी कार्यक्रम जनतेसाठी आयोजित करतात त्यात त्यांचा हेतू काय असतो हे आपल्याला कदाचितच माहिती असते. एखादं सत्कार्य करण्याच्या हेतूने जेव्हा संस्था असे साहसी कार्यक्रम आयोजित करते तेव्हा चार चांद लागतात असेच मी संबोधले तर त्यात नवलाई नाही.आजच्या या कलयुगात माणुसकीचा पदोपदी बळी जात असताना एक संस्था आणि निगडीत सदस्य त्यांच्या सख्यासाठी भक्कम पणे उभे राहतात आणि त्याचं जीवन पूर्ववत करण्यासाठी घडेल तशी मेहनत करण्यासाठी सज्ज होतात,एकत्र येतात याचं प्रत्यंतर मला "याची देहा याची डोळा "आलं. एक माणूस एका माणसाच्या पाठीशी भक्कम पणे उभे राहण्याचं कित्येकदा आपण पाहिलं असेल किंवा अनुभवलं असेल पण एका सख्याचं स्वास्थ्य पूर्ववत येण्यासाठी एक मदत म्हणून एक संस्था भक्कमपणे उभे राहण्याचा अनुभव माझ्या मनाच्या गाभाऱ्याला स्पर्श करून गेला.संस्था ती कोणतीही असू देत समविचारी लोकांनी अथक परिश्रमांनी घडवलेला तो एक मेरु होय.या साहसी कार्यक्रमा अंतर्गत संस्थेचे, सदस्यांच्या अथक परिश्रमाचे आणि अशा अनेक विवध पैलूंचे दर्शन घडले तीच अनुभूती मी येथे शब्दबद्ध करीत आहे. कार्य मोठं आहे शब्दांमध्ये न सामावणारं आहे तरी छोटेखानी प्रयत्न येथे मी करीत आहे.

तीन दिवस सारख्या तुकड्यांमध्ये इच्छुक मंडळींना विभाजित करण्यात आलं होतं. येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत माहेरी आलेल्या लेकी सारखंच होत होतं.प्रत्येक सदस्य मराठमोळ्या मावळ्या प्रमाणे,हसतमुखाने आणि आपुलकीने सगळ्यांची काळजी आणि विचारपूस करत होते. प्रबळगड विस्ताराने अगदी प्रचंड निबिड अरण्याचा वारसा लाभलेला तर छोटेखानी कलावंतीन किल्ला ताठ मानेने अस्तित्व जाणवून देणारा, दोन्ही किल्ले अगदी एकमेकांच्या बाहुपेशात असलेले पण मध्ये असलेल्या दरीने विभाजित झालेले भटक्यांसाठी पर्वणीच आहे.हीच दरी हेरण्यात आली आणि एका साहसी कार्यक्रमाची सूत्रबद्धता करण्यात आली. प्रबळगडावर असलेल्या वाडीच्या शेजारीच Campsite ची व्यवस्था करण्यात आली होती. राजे महाराजांच्या काळातल्या शामियाना सारखे तंबू वैशिष्ट्यपूर्ण आणि अगदी ऐसपैस असेच होते. जागा अगदी मोक्याचीच होती जिथून प्रबल गड किल्ल्याचा भाग Valley Crossing केंद्रबिंदू होतं आणि कलावंतीन चा खूबा दिमाखात भगवा फडकावत या साहसी प्रकारात सामील व्हा अशी प्रतारणाच जणू करत होता. सकाळचा गार वारा सुर्योदय आणि निबिड अरण्यात असलेले पक्ष्यांचे अस्तित्व अगदीच जाणवत होते नवी पहाट जणू सगळीकडे आनंदच पसरवत होती. निसर्गाच्या सानिध्यात मी पणा,अहंकार सगळा कसा नाहीसा झाला होता. निसर्ग सृष्टी लोभसपणे आपल्याला जवळ करत असते. सामान्य माणूस Valley Crossing करतो ते साहस अनुभवतो आणि परतीला लागतो पण तो अमलात आणण्यासाठी संस्थेचे सदस्य अहोरात्र प्रयत्न करत असतात झटत असतात त्यांचे कष्ट आणि थकवा सामान्य माणसाने अनुभवलेल्या साहसाने आणि त्याच्या चेहऱ्यावर झळकलेल्या आनंदाने कुठल्या कुठे विरून जातो.सलग तीन दिवस निबिड अरण्यात वास्तव करणं Valley Crossing यशस्वी होण्यासाठी जिकीरीचे प्रयत्न करणं अपूर्वाई आहे.Valley Crossing साठी किल्ल्यावर लोडफेरी करणं ,वजनदार दोरखंड, आणि लागणाऱ्या सगळ्याच गोष्टी किल्ल्यावर पोहचवण, आलेल्या पाहुण्या मंडळींची आबाळ होऊ नये म्हणून डोळ्यात तेल घालून येरझार्या घालणं काय हवं नको ते पाहणं खरच किती कठीण असच काम आहे. U technique ने सगळा Set Up उभा करणं प्रत्येक मंडळीला अत्माविशास देणं त्यांच्या सुरक्षेसाठी सगळी अंमलबजावणी करण आणि परत मागे दोर ओढणं हे अगदी मेहनतीचं काम असून घाण्यावरच्या कष्टांची आठवण ताजी होते. धुळीत अगदी कष्टांचा तांडवच उभा राहिलेला असतो वेळ मिळेल तसा पोटात उठलेल्या भुकेला शमवायचा आणि परत कामाला लागायच. असे सगळेच सदस्य नाना परीने कष्ट उपसत होते आणि जीवावर उदार होवून प्रयत्नांची परिसीमा गाठत होते. मुळातच Valley Crossing हा साहसी प्रकार मी मी म्हणून घेणाऱ्यांची हवा गुल करणारा, जीव टांगणीला लावणारा आणि मिश्किलपणे स्वताच्याच भीतीवर हसणारा अगदी विलोभनीय असाच आहे. आपण उघड्या डोळ्यांनी निसर्गाच सौन्दर्य पाहतो पण अगदी खोलवर पाहणं,वार्याच्या झोक्यावर दोरावर अधांतरी लटकून हे सौंदर्य उपभोगणं अंदाजे ६०० फूट खोल दरीत स्वताला आजमावण ,कातळ कड्यांना साद घालणं ,नजरेच्या टप्प्यात हि सुंदरता कैद करणं एक विलक्षणीय अनुभव गाठीशी जोडता आला यातच सुख मानावं लागेल.

एवढंच नव्हे तर सगळा पसारा आवरणं सगळे रोप थकलेल्या परीस्थित सुद्धा काढणं, सगळ्या गोष्टींची जुळवा जुळव फेर मोजणी आणि परतीला सुद्धा न चुकलेली लोडफेरी हि सदस्यांनी केली ते विजयी भाव मुद्रेनेच.

सामान्य माणसाला एक रोमांचक आणि साहसी प्रकाराशी खिळवून ठेवलं आणि ज्या सदहेतूने या कार्यक्रमाची आखणी केली तो सफ़ल संपूर्ण होवो हीच ईश्वर चरणी सदिच्छा.सगळ्या सदस्यांचे आणि संस्थेचे मनपूर्वक आभार.

 




Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk