अनोळखी सुरगडा चे नेतृत्व!!
-दीपाली
लंके
अनोळखी सुरगडा चे नेतृत्व
करण्याची पर्वणी लाभली ते
ट्रेकक्षितीज संस्थेने
९ नोव्हेंबर २०१४
रोजी आयोजित केलेल्या
एकदिवसीय ट्रेक मूळे. आमची
४४ जणांची फलटण
या अनोळखी सुरगडावर
त्याचं अस्तित्व समजून घेण्यासाठी
जणू उत्सुक होती.नेतृत्वाची खरी कसोटी
होती ते आमच्या
सोबत असलेल्या ट्रेकर्स
मंडळीना सुरगड दाखविणे आणि
गडाबद्दल माहिती देणे याची.अनोळखी
सुरगड आणि त्याचे
नेतृत्व हि एक
सुवर्ण संधीच होती असे
म्हणावे लागेल.
महाराष्ट्रात
असे बरेचसे किल्ले
आहेत, की जे
अनोळखी आहेत पण
त्यांचा परिचय करून घेणे
तेवढेच महत्वाचे
आहे.सह्याद्रीतील अजस्र
डोंगररांगा मध्ये वसलेला आणि
स्वताचे भौगोलिक आणि ऐतिहासिक
महत्व टिकवून उभा
असणारा हाच छोटेखानी
सुरगड भटक्यांच्या नजरेत
न भरेल तर
नवलच.स्वराज्याच्या राजधानीच्या
संरक्षणार्थ बांधलेल्या प्रभावळीतील दक्षिणोत्तर
पसरलेला सुरगड हा किल्ला
आहे.
सुरगड ला भेट
देण्यासाठी पुण्याकडच्या ट्रेकर्सनी लोणावळा- खोपोली
-पेन मार्गे नागोठणे
गाठावे पुढे नागोठणे
खिंडीचा घाट उतरल्यावर
सर्वात पहिलं जे गाव
लागत तिथून डावीकडे
वळावे. जागोजागी मार्गदर्शक फलक
लावलेले आहेत.खाली
डावीकडे खांब आणि
मग वैजनाथ गावा
मार्गे घेरासुरगड या पायथ्याच्या
गावी पोहोचावे.आणि
मुंबईकडच्या ट्रेकर्सनी मुंबई गोवा
मार्गावरील नागोठणे गाठावे आणि
तेथून पुढे खांब
वैजनाथ मार्गे घेरासुरगड येथे
पोहोचावे.
घेरासुरगड गावातून
सुरगडावर जाण्यासाठी जंगलातून जाणारी मळलेली पायवाट असून जागोजागी मार्गदर्शक फलक बसविण्यात
आले आहे.याच वाटेने पुढे जात असताना डाव्या बाजूला एक विहीर लागते आणि पुढे ओढ ओलांडून
जावे लगते ,पुढच्या मार्गाक्रमनाच्या वेळी फलक बसविलेला असून अनसाई देवी मंदिर आणि सुरगड यांची दिशा दाखविलेली
आहे. पुढची चढण चढून गेल्यास पठारावर प्रवेश होतो.तिथून सुरगडाचे अभेद्य कातळ आपल्या
स्वागतासाठी सज्ज असल्यासारखेच भासतात.पुढे तासभर आपण चढून गेल्यावर आपण घळीत येवून
पोहचतो हाच राजमार्ग कर्नल प्रॉथर
च्या काळात उध्वस्त करण्यात आलेला आहे.येथून उजवीकडे गेल्यावर भुयारी
पाण्याचं टाक आहे तर त्याच्याच पुढे कातळात खोदलेल दुसर पाण्याच टाक आहे.
ते पाहून आपण छोटा कातळ टप्पा पार करून प्रवेशद्वारा जवळ पोहचतो. आणि गडावर आपला प्रवेश होतो.तिथे उजव्या दिशेला हनुमानाची अनोखी अशी मूर्ती आहे. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे हनुमाला मिशी असून कमरेला खंजीर आहे आणि पायाखाली पनवती राक्षसिनीला चिरडलेले दिसते आणि शेपूट हि माथ्यावर आहे.
तिथून पुढे उजव्या
दिशेला गेल्यास आपला माचीवर
प्रवेश होतो आणि
तिथून आपल्याला कुंडलिका
नदी ,ढोलवाल धरण
आणि सुंदर अरण्याच
विहंगम दृश्य पहायला मिळत.
या माचीवरून उतरून खाली
जात असताना आपल्याला
एक पाण्याच टाक
पाहायला मिळत .साधारणपणे १५
बाय १० च
ते असावं. घळीच्या
डावीकडून चढण गेल्यावर जोत्यांचे अवशेष पाहायला मिळतात.वर चढल्यास
डाव्या बाजूला कोठार आणि पडलेलं हेमाडपंथी
मंदिर असून मंदिरात महादेवाची पिंड आणि भैरव आणि भैरवीची मूर्ती पाहायला मिळते.
आणि ५ मिनिटे पुढे गेल्यास उजव्या बाजूला दगडी सिहांसन दिसते.
त्याच दिशेला पुढे एकमेकांना लागून असलेली ५ पाण्याची टाकी दिसतात
(हा गडावरील पाण्याचा मुख्य स्त्रोत आहे).येथूनच पुढे डाव्या बाजूला सदर असून तिची कालौघात पडझड झालेली
आढळते.उजव्या दिशेला चौथरा असून गवातांमुळे तो झाकला गेला आहे.सदरेच्या उजवीकडे खाली उतरून गेल्यावर आहेत ३ टाके असून खोली जास्त आहे.गुहा
टाक्यात दोन खांब आहेत.वरच्या दिशेला आल्यावर परत सदर समोरील
रस्त्याने डाव्या बाजूला सुकलेलं पाण्याचं
टाक आहे.तेथूनच पुढे चालत गेल्यास डाव्या बाजूला चौथरा असून उजव्या
दिशेला बुरुज आहे.
खाली उतरल्यावर उजव्या बाजूला शिलालेख असून त्यावर २ भाषांमध्ये माहिती दिलेली
आहे, वरच्या बाजूला अरबी भाषेत ज्या ओळी लिहिल्या आहेत त्याचच भाषांतर खाली
देवनागरीमध्ये केलेलं आहे. ह्या शिलालेखातून आपल्याला किल्ल्याच्या बांधणीची आणि
किल्लेदाराची माहिती मिळते.
पुढे शेवटचा ढालकाठी असलेला बुरुज असून खाली पाण्याच टाक आहे.
पुढच्या डोंगरावर समाधी पाहायला मिळते पण ती कुणाची आहे
याची नोंद नाही.पुढे पायवाटेने आणि जंगलातील मार्गाने खाली उतरावे हा गडाचा चोर
मार्ग असून तासाभरातच आपण चढून आलेल्या पठारावर पोहचतो आणि तेथून आलेल्या
मार्गानेच गावात पोहोचावे.या मार्गावर येताना एक तोफ आहे. पण
ती शोधावी लागते. आणि वाटेतच तिथूनच आपल्याला अनसाई देवीचे मंदिर पाहायला मिळते.
अशा या अनोळखी सुरगडाचा परिचय माझ्या सहकार्यांना करून देताना खूप आनंद वाटला आणि
अपरिचित सुरगड परिचयाचा करून घेवून आम्ही सुखावलो आणि असेच अपरिचित किल्ले परीचायचे
करून घ्यायचे हा निश्चय केला आणि आम्ही दिवसभरातील वास्तू वैभवाच्या आठवणीना उजाळा
देत घरी परतलो.