Print Page | Close Window

माडू

Printed From: TreKshitiZ
Category: Information Section
Forum Name: Ancient and Medieval Weapons
Forum Description: In this forum information about Ancient and Medieval Weapons will be uploaded.
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=44
Printed Date: 01 Jan 2025 at 4:46am
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: माडू
Posted By: amitsamant
Subject: माडू
Date Posted: 16 Jun 2012 at 9:50pm

Madu, Ancient weapon made with horns of Antelope    

  माडू हे काळविट, नीलगाय यांच्या शिंगापासून बनविले जाते. या शस्त्रात शिंगाची टोके विरुध्द दिशेला ठेवून शिंगे एकमेकांना धातूच्या पट्टीच्या सहाय्याने जोडतात, व जोडताना मध्ये हाताची पकड घेता येईल ऐवढी जागा ठेवतात. शिंगांच्या टोकावर धातू पासून बनविलेली टोकदार (बाणाच्या आकाराची) टोपणे बसवितात.

Madu, Ancient weapon made with horns of Antelope

      माडू या शस्त्राचा उपयोग संरक्षण आणि आक्रमण या दोन्हीसाठी करता येतो. माडू या शस्त्राच्या दोन शिंगामधील जागेत हात घालून शस्त्र मुठीत घट्ट पकडतात. यामुळे दोन शिंगापैकी एक शिंग हाताच्या वर येऊन त्याचे संरक्षण होते.साधारणत: उजव्या हातात तलवारी सारखे मुख्य शस्त्र व डाव्या हातात माडू घालून युध्द खेळले जाते. माडूच्या टोकदार भागाचा उपयोग शत्रुला भोसकण्यासाठी केला जातो. माडूच्या एका प्रकारात ढालीच्या मागच्या बाजूस मूठीला दोन शिंगे बसविलेली असतात. अशा ढालीचा उपयोग संरक्षणाबरोबरच शत्रुला मारण्यासाठीही होतो.




Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk