गावाचे नाव :- फलटण जिल्हा :- सातारा जवळचे मोठे गाव :- सातारा, पुणे.
फलटण हे भारतातील एक पुरातन शहर आहे. महानुभाव साहित्यात याचा ‘पालेठाण’ असा उल्लेख आढळतो. येथे महानुभाव पंथीयांची अनेक मंदिरे असून फलटणला, महानुभाव पंथीयांची "दक्षिणकाशी" म्हणून ओळखले जात असे.
फलटणचे नाईक निबाळकर हे घराणे ७५० ते ८०० वर्षापूर्वीचे प्राचीन घराणे आहे. मालोजी राजे व शिवाजी राजे यांना या घराण्यातील अनुक्रमे दिपाबाई व सईबाई या मुली दिल्या होत्या. तसेच शिवाजी महाराजांची मुलगी या घराण्यात दिली होती. म्हणजे हिदवी स्वराज्याशी नातेसंबंध असलेले घराणे आहे. फलटण शहरातील श्रीराम मंदिर हे फलटण शहराचे ग्रामदैवत आहे. दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात श्रीराम रथोत्सव साजरा केला जातो.
फलटणचे श्रीराम मंदिर २२५ वर्षापूर्वीचे आहे. मंदिराभोवती उंच दगडी भिंत आहे. भव्य प्रवेशव्दारातून आत प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला राजवाडा तर उजव्या बाजूला श्रीरामाचे मंदिर आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिरासमोर तीन दिपामाळा आहेत. मंदिराच छ्त शिसवी खांबांवर तोललेल आहे. खांबांना वरच्या बाजूस लाकडी कमानी आहेत. मंदिराच्या बाजूने ३ ते ४ फूट उंचीचे कोरीव काम केलेल्या लाकडी जाळ्या बसवलेल्या आहेत. प्रत्येक जाळीवर वेगवेगळई नक्षी कोरलेली आहे.गाभार्यात राम लक्ष्मण व सीता यांच्या मुर्ती आहेत.
जाण्यासाठी :- फलटण शहर रस्त्याने सर्व शहरांशी जोडलेले आहे. पुणे - फलटण अंतर ११० किमी आहे. सातारा फलटण अंतर ६५ किमी आहे.
आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- १) श्रीराम मंदिर, फलटण २) निंबाळकर छ्त्री (समाधी), फलटण. ३) राजवाडा, फलटण ४)संतोषगड (ताथवड्याचा किल्ला) किल्ल्याची माहिती साईटवर दिलेली आहे.
Temples in Maharashtra, Ancient Temples in Maharashtra. Shriram Mandir , Village :- Phaltan, Dist :- Satara , Nearest city :- Pune, Satara.
|