Print Page | Close Window

आज म्हणजेच ७ जून ला

Printed From: TreKshitiZ
Category: Adventure Forum
Forum Name: Adventure Sports
Forum Description: Information about Adventure Sports
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=351
Printed Date: 04 Jan 2025 at 10:46am
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: आज म्हणजेच ७ जून ला
Posted By: harshalmahajan
Subject: आज म्हणजेच ७ जून ला
Date Posted: 11 Jun 2017 at 4:35am

महाविद्यालयात असताना चार डोकी एकत्र येतात, डोंगर भटकंती सुरु होते आणि त्यालाच ट्रेकींग ग्रुपचे स्वरूप मिळते अशीच काहीशी आपल्या संस्थांची कूळकथा आहे. डोंबिवलीतील अशाच तेराजणांना प्रमोद जोशीसरांनी गडकिल्ल्यांच्या, डोंगरांची ओळख करुन दिली आणि त्यातूनच 'स्वप्न दुर्गभ्रमंतीचे आव्हान क्षितिजाचे' असे ध्येय बाळगून २००१ साली क्षितिज ग्रुपची स्थापना झाली. ट्रेक क्षितिज संस्था एक NGO आहे.

 

* इंटरनेट युगातील या तरुणांनी केवळ भटकंती करता गडकिल्ल्यांची नोंद करायला सुरुवात केली. तीदेखील वेबसाईटच्या माध्यमातून. त्यामुळेच २००१ साली www.trekshitiz.com (ट्रेकक्षितिज.कॉम) ही किल्ल्यांची  मराठीतून माहित देणारी पहिली वेबसाईट सुरु झाली. आज या वेबसाईटवर तब्बल ३०० हुन जास्त किल्ल्यांची मराठीतून, २२० हून जास्त किल्ल्यांची इंग्रजीतून माहिती असून, सुमारे दहा हजार छायाचित्रे, ११० संगणकीय नकाशे उपलब्ध आहेत. डोंगरभटक्यांना एकत्र आणणारे विविध फोरम, अनेक संस्थांची माहिती, डोंगर गावांच्या गाड्यांचे वेळापत्रक असे अनेक गोष्टींचे भांडार या वेबसाईटच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिले आहे. गेल्या पंधरा वर्षात ही वेबसाईट तब्बल दोन करोड लोकांनी पाहीली आहे. २००५ साली ट्रेक क्षितिजच्या वेब साईटला उत्कृष्ट मराठी वेब साईट म्हणुन महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विकास परिषदेचे तिसरे पारितोषिक मिळालेले आहे.

 

* किल्ल्यांच्या भटकंतीला अभ्यासाची जोड होती म्हणूनच प्रत्येक ट्रेकमध्ये काहीना काही नाविन्यपूर्ण उपक्रम करण्याचा संस्थेचा प्रयत्न राहिला आहे. गड किल्ल्यांचा प्रसार व्हावा या दृष्टीने संस्थेने शिवोत्सव या नावाने वार्षिक कार्यक्रम सुरू केला. शस्त्रात्रांचे प्रदर्शन, रेखाचित्रांचे प्रदर्शन असे उपक्रम त्यात होतात. तर २००६ साली दहा महत्त्वांच्या किल्ल्यांचे फायबर मॉडेल्सचे प्रदर्शन भरवून शिवसृष्टीच निर्माण केली होती

 

* २००५ साली सुधागड या पालीजवळील किल्ल्यावरील कामाने, या भटकंतीला गडसंवर्धनाची जोड मिळाली. संस्थेने गेल्या वर्षात सुधागडवर अनेक उपक्रमांचा धडाकाच लावला आहे. महादरवाजातील माती सफाई, वीरगळ सफाई, नियमित वृक्षारोपण संवर्धन, नियमित टाकेसफाई या माध्यमातून सुधागडवर संस्थेच्या कार्यकर्त्यांचा कायम राबता असतो. केवळ गडावरच नाही तर पायथ्याच्या पाच्छापूरातील शाळेत वाचनालय, विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम नियमित केले जातात.

 

* ट्रेकक्षितिजने आजवर गडकिल्ल्यांचे दोनशेहून अधिक स्लाईड शोज केले आहेततर दरवर्षी डोंबिवलीत होणार्या नववर्ष स्वागतयात्रे दरम्यान गडकिल्ल्यांची विविध प्रदर्शन आयोजित केली आहेत. गड किल्ले, इतिहास, शस्त्रास्त्रे, मंदिरे यांची रेखाचित्रे, छायाचित्रे यांचा योग्य वापर करून आठ वर्षे संस्थेमार्फत दिनदर्शिकादेखील काढल्या जात होत्या.

 

* २०१२ पासून वर्ष ट्रेक क्षितिज संस्था डोंबिवली परिसरात दिवाळीत किल्ले बांधणी स्पर्धा घेते. त्यापूर्वी किल्ले बांधणी शिबिर घेउन मुलांमधे आणि पालकांमधे किल्ल्यांबद्दल जा्गृती निर्माण करण्याच कार्य करत आहे.

 

* सह्याद्रीच्या पट्ट्यात ३०० पेक्षा जास्त किल्ले आहेत. निसर्ग आणि मानवाकडुन होणारा त्याचा र्हास आपण रोखु शकत नाही. पण आज अस्तित्वात असलेल्या किल्ल्यांचे, वास्तुंचे जर आपण डॉक्युमेंटेशन केले तर पुढच्या पिढीसाठी तो एक अमुल्य ठेवा होईल. या भावनेतून ट्रेक क्षितिज संस्थेने "नकाशातून दुर्गभ्रमंती" हे १२५ किल्ल्यांच्या अद्ययावत नकाशांचे पुस्तक तयार केले. या पुस्तकाला "२०१४ साली पुणे मराठी ग्रंथसंग्रहालयाचा ना..आपटे पुरस्कार" मिळाला.

 

* २०१४ साली झालेल्या तेराव्या गिरिमित्र संमेलनात गिर्यारोहण आणि सामाजिक क्षेत्रातील या योगदाना बद्दल ट्रेकक्षितिज संस्थेचा "गिरिमित्र गिर्यारोहण संस्था सन्मान" देऊन गौरव करण्यात आला.   

 

* दुर्गांबद्दल जनजागृती व्हावी यासाठी ट्रेक क्षितिज संस्थेतर्फ़े दर महिन्याच्या दुसर्या आणि चौथ्या शनिवारी/ रविवारी दुर्गभ्रमणाच्या पदभ्रमण मोहिमा (ट्रेक्स) नेल्या जातात. डोंबिवली ते डोंबिवली असलेल्या या दुर्गभ्रमण मोहिमां दरम्यान किल्ल्याची त्याच्या इतिहासाची संपूर्ण माहिती दिली जाते. वर्षातून काही ट्रेक्स इतिहासतज्ञ, निसर्गतज्ञ यांच्या बरोबर नेले जातात. जेणे करुन त्या विषयाची माहिती आणि तज्ञांशी संवाद साधण्याची संधी ट्रेकर्सना उपलब्ध होईल.

 

महाविद्यालयात सुरू झालेले ट्रेकींग ग्रुप चार पाच वर्षे एकत्र राहतात आणि थांबतात असे काहीसे चित्र असण्याच्या आताच्या काळात क्षितिजमध्ये नव्या फळीने ग्रुपची वाटचाल जोमाने पुढे सुरू ठेवली आहे.

 

 

 

अमित सामंत

ट्रेक क्षितिज संस्था



-------------
See ya in the Hills of Sahyadri !!



Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk