अभूतपूर्ण ट्रेक - घरगड उर्फ गडगडा
२७ ऑक्टोबर २०१३ रोजी ट्रेक क्षितीज संस्थेने आयोजित केलेल्या घरगड उर्फ गडगडा या अंत्यंत कठीण श्रेणीत मोडणाऱ्या आणि गिर्यारोहण ने नटलेल्या या ट्रेक चे नेतृत्व राहुल आणि को लीडर ऑगस्टिन यांनी यशस्वीरित्या केले.
३१ हौशी ट्रेकर्स नि घरगड सर केला ..धन्यवाद संजय आणि दिनेश काका यांना त्यांच्या मार्गदर्शना मुलेच हा किल्ला आम्ही सर करू शकलो :)
रात्री १०:३० वाजता चालू झाला प्रवास घरगड चा ...नवीन आणि ट्रेक क्षितीज मेम्बर्स च्या मनात हळूच डोकावणारी घर्दाबाद्दल्ची धाकधूक न कळत पणे जाणवत होती ...गिर्यारोहण चा हा बर्याच जणांचा हा पहिलाच ट्रेक असल्यामुळे कुतूहल हि होतेच...३:३० वाजता
आम्ही घरगड च्या पायथ्याशी पोहचलो आणि कुडकुडीत थंडीत मंदिरात सगळ्यांनी स्वच्छंद आणि मुक्त हस्ताने प्रकाश उधळणाऱ्या चांदण्याच्या प्रकाशातील झोप अनुभवली...संजय काकांनी उभ्या केलेल्या टेन्ट मध्ये मी आणि मयुरी ने मस्तच झोप काढली आणि मी पहिल्यांदा टेन्ट मध्ये झोप्नायचा माझा अनुभव छानच झाला ....मानसी नेहा आनि मौसम ने परत परत सांगून सुद्धा हे निद्रेचे सुख मिस केले :p :) (y) .... सकाळी टेन्ट आवरताना संदीप काकांसोबत टेन्ट बांधणीच्या टिप्स पण मिळाल्या .. :)
सकाळी आवरून नाश्ता झाल्यावर घरगड वर
नजर फिरवली आणि सहजच मनात आलं :-
हे घरगड तू
नाशिक महामार्गावरील कठीण गड तू
आंबोली अघोरी शिखारांमधील दुवा तू
रॉक पाचेस ची पर्वणी तू
ट्रेकर्स आणि क्लाय्म्बेर्स चं प्रेरणास्थान तू
हे घरगड तू
शत्रूंवर नजर ठेवणारा तू
अभेद्य डोंगर कपारींनी,निसर्गाच्या वैविध्याने नटलेला तू
बर्या बर्यांचा घाम टिपणारा तू
गिर्यारोहानाने युक्त तू
हे घरगड तू क्लाय्म्बेर्स चं प्रेरणास्थान तू ....
संख्या जास्त असल्यामुळे २ टीम बनवण्यात आल्या ... टीम पहिली गिर्यारोहानाची तयारी करण्यासाठी अगोदर निघाली त्यामध्ये संजय आणि दिनेश काका ,आनंद, चैतन्य,सचिन,तुषार हे होते.....राहिलेलेल्या लोकांनी आरामात आवरून इंट्रो राउंड घेवून घरगड मोहीम चालू झाली ..तख्त तळपणार्या उन्हात आम्ही भवानी मातेचा दर्शन घेवून पहिल्या वहिल्या रॉक पाचेस वर पोहचलो आणि कडक उन्हात सनबाथ घेतली ....मधेच साप देवता दिसल्यामुळे थोडा व्यत्यय आला आणि क्ल्याम्बिंग ची गती मंदावली ....पण तरीही न धीर सोडता आम्ही सनबाथ घेत राहिलो ....एका नंतर एक अशी चढाई चालू झाली ...आणि गतीने सगळ्यांनी संजय आणि दिनेश काका यांच्या मार्गदर्शना खाली माकडाच्या :प गतीने किल्ला सर केला...आणि एकदाचा सुटकेचा निश्वास सोडला....पण घरगड इथेच न संपता रापेल डॉवून करायचा होता...आणि इथेच आम्हाला क्ल्याम्बिंग आणि रापेल डॉवून ची संधी मिळाली...किल्ल्यावर
१ पाण्याचा टाक, आणि १ तळ, एवढेच अवशेष होते ..गडाचा वापर वाच टॉवर साठी होत असे... म्हणूनच वस्तू अवशेष नसल्यामुळे रापेल डॉवून चालू झालं... आणि २५ मुलांमध्ये ५ मुलीनी बाजी मारली आणि सर्वात अगोदर यशस्वीरीत्या रापेल डॉवून करून बाजी मारली ... :) :प (य)
एक एक करत सगळी मुल राप्पेल डॉवून करत भवानी मातेच्या मंदिरात पोहचली आणि परतीचा प्रवास चालू झाला...तो हनुमान मंदिराच्या दिशेने... खाली पोहचल्यावर विहिरीवर मस्त गार पाण्याने हात पाय धुवून भुकेले आम्ही डब्बे फस्त करण्यास चालू केले...टेकनिकल टीम गिर्यारोहणाची साधन गोल करून येत येत आमचा जेव्नायचा पहिला रावुंड संपला ....आणि मोहीम Tang Testing चालू झाली ....जेवल्यानंतर मयुरी ने ट्रेक खितीझ बद्दल दिलेली माहिती खूपच माहितीपूर्ण होती ...चैतन्या ने घरगड बद्दल माहिती दिली...आणि अशा प्रकारे ग्रुप फोटो काढून परतच प्रवास चालू झाला....
मी आणि वरुण दिवसभरातील आठवणीना उजाळा देत आणि मधेच डुलकी घेत पुण्याला परतलो ...
खरोखरच घरगड हा मनात घर केल्याशिवाय राहत नाही.... Hats of to Each & Everyone
:)
|