Print Page | Close Window

आग्र्याच्या किल्ल

Printed From: TreKshitiZ
Category: Information Section
Forum Name: कविता संग्रह
Forum Description: पोवाडे, कविता आणि स्फूर्ती गीते
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=328
Printed Date: 19 Nov 2024 at 7:38pm
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: आग्र्याच्या किल्ल
Posted By: amitsamant
Subject: आग्र्याच्या किल्ल
Date Posted: 05 May 2015 at 10:45pm
या जमिनीवर 

या जमिनीवर असेल तेंव्हा 
प्रिय माझ्या त्या शककर्त्याचे 
पडले पाउल 
या भूमीच्या सुगंधसिंचित 
धुलिकणाना 
या भिंतीवरी रुळझुळणार्या 
गर्भरेशमी आवरणाना 
या मंचातिल रत्नमण्यांच्या 
चंचल गर्वोध्दत किरणाना 
सह्याद्रीवर अवतरलेल्या 
उर्जस्वल स्वातंत्र्य उषेची 
इथे लागली 
पहिली चाहुल.

याच ठिकाणी --
मावळखोर्यामधले वादळ 
इंद्रसभेवर या आदळले
कृष्णेचे जळ खडकामधले 
यमुनेच्या श्रीमंत तटावर 
येथे वळले
इथे तमाच्या अधिराज्याला 
तेजाचे बळ प्रथमच कळले.

येथे रुजम्यावरी जरीच्या 
असतिल कुजबुजल्या तलवारी 
थरथरले शिरताज हिर्यांचे 
असतिल श्रवुनी ती ललकारी 
संगमरवरी चिर्यात झाले
असेल स्पंदन 
शिवनेरीच्या वनराजाचे 
होता दर्शन !

या स्तंभातुनि असेल घुमली 
ती शिववाणी
या दगडांवर असेल थिजले 
त्या शब्दातिल अभिमानाचे 
जळते पाणी 
मखमाली गाद्यांवर सळसळ 
संतापाची असेल उठली
माळ करातिल या तख्तावर 
असेल तुटली 
काच बिलोरी ऐश्वर्याची 
पोलादाच्या त्या तुकड्यावर 
इथेच फुटली.

कुसुमाग्रज

स्वगत

1962




Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk