Print Page | Close Window

SCUBA - THE WATER UNDER WORLD

Printed From: TreKshitiZ
Category: Adventure Forum
Forum Name: Adventure Sports
Forum Description: Information about Adventure Sports
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=309
Printed Date: 24 Dec 2024 at 7:57am
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: SCUBA - THE WATER UNDER WORLD
Posted By: tushardhuri
Subject: SCUBA - THE WATER UNDER WORLD
Date Posted: 02 Jan 2015 at 10:31pm
मालवण (चीवला, तारकर्ली, देवबाग) किनारपट्टीवर फिरताना आपल्याला बरेच जण स्कूबा करायचा आहे का असा प्रश्न विचारतात. आत्ता स्कूबा म्हणजे नक्की काय हे मी आपल्याला सांगायला नको. डोळ्यांना air tite चष्मा लाऊन नाकने स्वास घेणे बंद करून तोंडाला oxigen मास्क लावून तोंडने स्वास घेत पाण्याखालचे विश्व बघायची ही एक सुवर्ण संधी ती देखील आपल्या महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग किल्याजवळ मला अनुभवता आली. प्रत्येक भेटणार स्कूबा एजेंट आपल्याला स्कूबाबद्दल वेगवेगळी माहिती देत असतो आणि आपला स्कूबा activity कशी बेस्ट हे पटवून देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे आपल्या मनात अनेक प्रश्न तयार होतात खरे स्कूबा एजेंट मोजकेच दोन तीन, पण हे sub-agent आपला संभ्रम वाढवतात.

स्कूबा तर आम्हला म्हजे मी, माझी बहीण तृप्ती आणि माझे भाओजी गिरीश करयचा हे तर नक्कीच होत. पण तो कोणाकडे करयचा ह्यासाठी Scuba चा master agent शोधायच अस आमच ठरलं. सिंधुदुर्ग किल्ला फिरून येताना उजव्या हाताला मालवण बाजाराकडे एक रस्ता जातो तिथे आम्हाला Scuba चा एक master agent दिसला आणि आम्ही चौकशीसाठी आत गेलो. त्या agentच नाव होत 'ओम शिव मोरेश्वर स्कुबा आणि स्नोर्केलिंग सेंटर' आत गेल्यावर counter वर बसलेल्या श्री तोडणकर यांनी आम्हला स्कुबा आणि स्नोर्केलिंग बद्दल सविस्तर माहिती दिली.(स्नोर्केलिंग मणजे पाण्यावर तरंगून डोक पाण्यात घालून पाण्याखालचे विश्व पाहणे.) Scuba माहिती देत असताना त्याने आम्हाला Scuba चे दोन प्रकार सांगितले एक Commercial Dives आणि दुसरा Cylinder Dives आणि आम्हाला एक नवीन प्रश्न पडला तो म्हणजे Commercial की Cylinder scuba करायचा. (Commercial मध्ये pipe च्या मदतीने oxygen चा पुरवठा केला जातो तर Cylinder पाठीवर बांधून oxygen पुरवला जातो आणि आपण पाण्यात मुक्त संचार करू शकतो. एवढ्या लांब येउन पाण्यात मुक्त संचार नाही केला तर काय मजा ह्या मुद्द्यार सगळ्यांचे एकमत झाले व अधिक पैसे देऊन Cylinder Scuba करायचा ठरले आणि थोडस बर्गेनिग करून आम्ही दुसऱ्या दिवशी सकळीसाठी scuba साठी slot book केला.

जलसौन्दर्याचे स्वप्न बघत सकाळ कशी झाली हे कळलच नाही. आम्ही सकाळचा चहा नस्ता उरकून scuba center पाशी पोहोचलो. एका २०-२५ seater बोटीतन आम्हाला Scuba activity चालू असलेल्या बोटीत नेण्यात आल. कपडे change करून, पायात safety shoes घालून, पाठीला वजन बांधून आम्ही Scuba साठी तयार झालो. मनातील उसुकता शिगेला पोहोचली आणि मी शिडी उतरून पाण्यत आलो पाण्यात माझ्याबरोबर दोन Guide होतेच. त्यातील एकाने माझ्या पाठीला Cylinder असलेले jacket बांधले. त्या jacket चे व्यैशिष्ट म्हणजे त्याला एक पिवळे बटन होते आणि ते तीस सेकंद दाबल कि Cylinder मधली हवा त्यात भरली जाई आणि वेळ प्रसंगी आपण पटकन पाण्यावर येऊ शकू आणि दुसरा मणजे ४० किलोच्या oxygen cylinder चे वजन jacket आणि पाण्याचा योग्य तालमेलीमुळे पाठीवर काही विशेष जाणवत नव्हते. आता डोळे आणि नकाभवती air tite goggle, तोंडात oxygen mask, पाठीवर ४०किलोच oxygen Cylinder, पायात safety shoes, कमरेला वजन, अशा सगळा सापोस्कर करून मी आता पाण्याखाली जायला तयार झालो. Guide च्या निर्देशानुसार प्रथम मी शिडीजवळ air tite गोगल्स लावून नाक बंद करून तोंडाने स्वास घेऊ लागलो, मग तोंडाला oxygen मास्क लाऊन पाण्याखाली श्वासोस्वास घेण्याची practice करू लागलो. ते जमल्यावर मला हाताला फ्लोट बांधून शिडी पासून लांब पाण्याचा मधोमध नेण्यात आले. ते करत असताना पाण्याखाली श्वासोस्वास घेण्याची practice चालूच होती. आता माझ्या हातातील फ्लोट काढून हळू हळू मी पाण्याचा आत जाऊ लागलो हे करत असताना एक guide सतत माझ्या बरोबर होताच. आता हळू हळू पाण्याखालची अनोखी दुनिया माझ्या दृष्टीस पडू लागली. त्यात वेगवेगळ्या आकारचे रंगाचे coral माझ्या प्रथम दृष्टीस पडले. ८-१० फूट पाण्याखाली गेल्यावर मला एक coral पकडायला सांगून कॅमेरा घेण्यासाठी guide माझ्यापासून जरा लांब गेला आणि मी पाण्याखाली मुक्तपणे आजू बाजूचे छोटे मासे व coral बघत होतो. हा क्षण माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण होता. थोड्या वेळात तो guide माश्यांच्या आवडीचा काहीतरी खाद्यपदार्थ घेऊन आला आणि त्याने माझ्यासमोर सोडला त्याबरोबर अनेक मासे माझ्यासमोर अनेक विविध रंगाचे मासे बागडू लागले त्यात एक चांगला १.५ -२ फुटाचा मासा त्या खाण्यावर आपला हक्क सांगू लागला व छोटे छोटे मासे त्याला बघून लांब पाळले. हा मासा पाण्यातील त्या area चा DON असल्यागत मला वाटला आणि ह्या लेखाचे शीर्षक "मझी गोताखोरी" वरून बदलून "SCUBA - THE WATER UNDER WORLD" हे ठेवाव अस सुचल (या माश्याचे नक्की नाव मला सांगता येणार नाही पण इथे share केलेल्या video त तो तुम्हाला बघता व ओळखता येईल). काही वेळ तिथेच video आणि फोटो कडून झाल्यावर त्या guide ने माझा हात पकडून मला vision clear असे पर्यंत पाण्याखाली नेले आणि थोड्या वेळात आम्ही 'ही' अनोखी दुनिया बघून परत पाण्यावर शिडीजवळ आलो.

थोडावेळ त्या guide ची परवानगी गेऊन मी त्या बोटीजवळच माझी समुद्रात पोहण्याची इच्छा पूर्ण करून घेतली. थोड्या वेळात मी बोटीवर परत आलो तो एक रोमांचक आठवण घेऊन, घरी परतण्या करता !

तुषार सुर्यकांत धुरी(TD)
Mob : 9323787529
Email Id : tushardhuri@yahoo.co.in


ओम शिव मोरेश्वर स्कुबा आणि स्नोर्केलिंग सेंटर,
MOB :9404742843 / 9923454944
TELE : 02365-२५१०७४

Video Link : https://www.facebook.com/photo.php?v=10200134115351646" rel="nofollow - https://www.facebook.com/ - photo.php?v=102001341153516 - 46


-------------
TD



Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk