Print Page | Close Window

शिवरायांचा त्रिवा

Printed From: TreKshitiZ
Category: Information Section
Forum Name: कविता संग्रह
Forum Description: पोवाडे, कविता आणि स्फूर्ती गीते
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=265
Printed Date: 26 Jan 2025 at 12:31am
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: शिवरायांचा त्रिवा
Posted By: saurabhshetye
Subject: शिवरायांचा त्रिवा
Date Posted: 30 Sep 2014 at 11:08pm

छत्रपति शिवरायांचा त्रिवार जयजयकार

 

धर्माचा अभिमान राजा

देशाचा संरक्षक राजा

चारित्र्याचा पालक राजा

घडवी देशोद्वार ॥1॥

 

स्फुर्ति केंद्र हे भारतियांचे

दैवत अमुच्या नव तरुणांचे

आद्य प्रवर्तक संघटनेचे

सदा विजयी होणार ॥2॥

 

पूजा बांधू सामर्थ्याची

इच्छापूर्ति श्रीशिवरायाची

उठता ऊर्मी समर्पणाची

काय उणे पडणार ॥3॥

 

रात्र भयानक ही वै-याची

जाणिव होई कर्तव्याची

घेउ प्रतिज्ञा एकजुटीची

नको आता माघार ॥4॥

 

कितिक झाले आणि होतील

राजे असंख्य जगती

परि न शिवबासमान होइल

या अवनीवरती, राजे छत्रपति ॥5॥




Replies:
Posted By: Deepali Lanke
Date Posted: 01 Oct 2014 at 4:24pm
Mastach ahe.



Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk