Print Page | Close Window

राम मंदिर (जटायू मं

Printed From: TreKshitiZ
Category: Information Section
Forum Name: Temples of Sahyadri
Forum Description: TreKshitiZ Writing team would be uploading the information of Temples in Sahyadri in this section.
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=189
Printed Date: 08 Jan 2025 at 5:06pm
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: राम मंदिर (जटायू मं
Posted By: amitsamant
Subject: राम मंदिर (जटायू मं
Date Posted: 10 Nov 2013 at 11:32pm
गावाचे नाव :- टाकेद
जिल्हा:- नाशिक
जवळचे मोठे गाव :- घोटी, भंडारदरा



मुंबई - नाशिक रस्त्यावर इगतपुरीनंतर - घोटी गाव आहे. घोटी गावतून एक रस्ता सिन्नरला जातो. या रस्त्यावर भंडारदर्‍याला जाणारा फाटा फुटतो. या भंडारदर्‍याला जाणार्‍या रस्त्यावर धामणी गावाच्या पुढे टाकेद गावाला जाणारा फाटा आहे.  घोटी पासून टाकेद पर्यंत (२० किमी) पोहचण्यास पाऊण तास लागतो. टाकेद गावा बाहेर प्राचीन राममंदिर आहे. मंदिर परीसरात पूरातन वृक्ष आहेत. गावापासून लांब असल्याने वातावरण शांत आहे. 

रामायणातील जटायु व रावणाचे युध्द याच ठिकाणी झाले होते. जखमी जटायूला रामाने याच ठिकाणी पाणी पाजले होते. त्यानंतर जटायूने इथेच प्राण सोडला अशी येथील लोकांची श्रध्दा आहे. त्यामुळे या मंदिर संकुलात जटायुचे मंदिर सुध्दा आहे. त्यात रामाने जटायूला माडीवर घेतले आहे, अशी मुर्ती आहे. मंदिरा समोरच रामाने जटायुला पाणी पाजण्यासाठी जमिनीत बाण मारुन तयार केलेला झरा व पाण्याचे कुंड आहे.पाण्याच्या कुंडाजवळ शंकराची पिंड आहे. काठावर एक विष्णूची पुरातन मुर्ती उघड्यावर ठेवलेली आहे. 



आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- 
१) टाकेदहून पट्टा गड (विश्रामगड) १५ किमीवर आहे.
२) टाकेदहून बितनगड २० किमीवर आहे.
३) टाकेदहून भंडारदरा डॅम २९ किमीवर आहे.
४) टाकेदहून कळसूबाई ३२ किमीवर आहे.

कळसूबाई, बितनगड व पट्टा गड (विश्रामगड) ची माहिती साईट्वर दिलेली आहे.

जाण्यासाठी :- मुंबई - नाशिक रस्त्यावर इगतपुरीनंतर - घोटी गाव आहे. घोटी गावतून एक रस्ता सिन्नरला जातो. या रस्त्यावर भंडारदर्‍याला जाणारा फाटा फुटतो. या भंडारदर्‍याला जाणार्‍या रस्त्यावर धामणी गावाच्या पुढे टाकेद गावाला जाणारा फाटा आहे.  घोटी पासून टाकेद पर्यंत (२० किमी) पोहचण्यास पाऊण तास लागतो. टाकेद गावा पुढे १ किमीवर प्राचीन राममंदिर आहे. 



Temples in Maharashtra, Ancient Temples in Maharashtra
Ram Mandir ( Jatayu Mandir) :- Village :- Taked,  Dist :- Nasik, Nearest city :-  Ghoti, Igatpuri, Bhandardara.



Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk