Print Page | Close Window

Sahyadricha Manbindu-Raigad with Anandji Deshpande

Printed From: TreKshitiZ
Category: Historical and Trekking Destinations of India
Forum Name: Trekking Destinations
Forum Description: Visitors can post requests / information of any trekking destination on this globe.
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=341
Printed Date: 01 Jan 2025 at 3:07pm
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: Sahyadricha Manbindu-Raigad with Anandji Deshpande
Posted By: Shreyas Pethe
Subject: Sahyadricha Manbindu-Raigad with Anandji Deshpande
Date Posted: 20 Oct 2015 at 8:31am

..नऊ वाजता मनात आलं काय आणि दुसऱ्या दिवशी सकाळी
रायगडावर पोचलो काय,अगदी सगळंच अविस्मरणीय..

      ठरलं जायचं रायगडला ,बस
मिळाली,२.३० वाजता रात्री पुण्यात.तीन वाजता रायगडकडे वरंधा मार्गे.खूप खराब रस्ता,पण
जाणवतंच नव्हतं,फक्त रायगड दिसत होता.रोप-वे च्या इथे अमित दादा भेटला,मस्त वाटलं.

   काही वेळातच राहायच्या
ठिकाणी ठेऊन MTDC canteen जवळ एकत्र
आलो.आनंदजी देशपांडे यांची ओळख झाली.ट्रेक प्रमुख शुभदा चे आभार मानले.इथून पुढील
सुंदर अनुभव सांगण्यासाठी हा लेखनप्रपंच.

   मेणा दरवाजा
पासून झाली.पुढे असलेल्या राण्यांच्या महालाची बांधणी,पालखी दरवाजा,त्यांचं
वास्तुशास्त्र,महालांचे उन,पाऊस,वारा यांपासून
संरक्षण करण्याचे उपाय,शौचालायांची रचना,महाराजांची स्वच्छ्तेबाबतची भूमिका यांची
कल्पना आली.

   पालखी दरवाजातून बाहेर
पडल्यावर दिसतात ते म्हणजे रायगडचे सौंदर्य असणारे स्तंभ.त्यांची रचना,त्यावरील
कोरीवकाम,त्याचे राणीच्या महालाशेजारील स्थान,गंगासागर तलाव,त्याच्या बांधणीतील
कौशल्य,राजांनी व हिरोजींनी पाण्याचे १०००० लोकवास्तीसाठी केलेले नियोजन पाहून
थक्क झालो.नंतर पुढे पिण्याच्या पाण्याचा आजचा मुख्य स्रोत म्हणजेच हनुमान टाके
नजरेस पडते.दारू कोठाराबाबत नवीन माहिती समजली.तोफ डागण्याची पद्धत,कोठाराची निगा कशी
राखली जायची,तोफेच्या शेजारील पाण्याच्या हौदाची रचना हे ऐकता ऐकता कधी
युद्धभूमीवर पोचलो समजलेच नाही.

पुढचा महत्वाचा टप्पा
,रायगडचे आकर्षण म्हणजेच टकमक टोक पाहून मनात धडकीच भरली.पुढे बाजारपेठ पाहता
पाहता खूप वस्तू खरेदी केल्याचा भास होत होता.तिथून राजादर्बाराच्या दिशेने
प्रस्थान केले.नगारखान्यातून आत प्रवेश करते झालो आणि तिथेच शेजारी त्या मोठया
शिळेजवळ ठाण मांडून बसलो,एका अदभूत प्रसंगाचे साक्षीदार होण्यासाठी.आनंदजीच्या
तोंडून इतिहास ऐकताना ६ जुन १६७४ ला कधी पोचलो कुणास ठाऊक.राज्याभिषेक झाला.दरबार
पुन्हा मांगल्याने भरून गेला.शेवट झाला तो साश्रूनयनानीच.

   सदर,मेघडंबरी,अष्टप्रधानांची कामकाजाची जागा पहिली.त्यानंतर पोचलो ते
आपल्या मंदिरात ,महाराजांच्या निवासाच्या ठिकाणी.त्याशेजारील टांकसाळ,अष्टप्रधानांचे राजवाडे,धान्य कोठार पहिले.जाताना मस्तपैकी
तांदळाची भाकरी आणि पिठ्ल्यावर ताव मारला आणि विश्रांती साठी निघालो.

    दपारच्या संस्कारवर्गाचा
प्रारंभच छत्रपतींच्या समाधी पासून झाला.दर्शन घेतल,हलकेच पावसाला सुरुवात झाली
होती.जगदीश्वराच्या मंदिरात विसावलो.आता खरा जलाभिषेक चालू झाला होता रायगडला.

   गो.नि.दांच्या
पुस्तकातील खिळवून ठेवणारे उतारे,कडाडणाऱ्या वीजा,हिरोजींची
स्वराज्यनिष्ठा,जिजाउंचे आणि महाराजांचे हळुवार नातं याने जगदिश्वराचा गाभारा भरून
गेला.धाडसी माणसांच्या मागे तो नेहमी असतोच.याचा प्रत्यय आला.आम्ही बाहेर पडताच
पावसाचा जोर ओसरला.सरांचे एक वाक्य हृदयावर कोरलं गेलं, “अरे,देव नाहीच.यावर तरी
पूर्ण विश्वास ठेवा”.

जेवणापूर्वी थोडा वेळ
मिळाला त्यात मग सरांकडून खुप गोष्टी समजल्या.आमच्या प्रश्नांना उत्तरे देताना
अनेक नाजूक विषयांना सरांनी स्पर्श केला.इतिहासाचे भविष्य ,एखाद्या गोष्टीमागील intention वरून त्याला काय
म्हणायचं हे ठरवावं,इतिहासाचे मानवी जीवनाशी नाते समजावून सांगितलं. MTDC मध्ये जेवण करून
आल्यावर सरांशी सोलापूर बद्दल थोड्या गप्पा झाल्या,झोप कधी लागली समजलच नाही.

wake up
call देण्याआधीच
जाग आली.आवरून,पोह्याचा double नाश्ता करून समोर दिसणाऱ्या श्रुष्टीसौंदर्याचे
फोटो काढले आणि थेट कुशावर्त गाठले.वाडेश्वराचे दर्शन घेतले.आनंदजींनी इथे ठरवून
एका विषयाला हात घातला,नवीन पिढीची इतिहासाबाबतची जाणीव,संवेदना. कुठली पुस्तके
वाचावीत,बाबासाहेबांचे योगदान,किल्लेबांधणी चे तंत्र यावर चर्चा झाली.आम्हीपण
त्यांना निरोप देताना भावूक झालो.पेशाने वकील असूनही त्यांची इतिहासाबाबतची तळमळ
जाणवत होती.सोलापूर करांबाबत काही गोष्टी मनाला टोचल्या,पण सुधारणा हाच जीवनाचा
मूलमंत्र आहे हेपण लक्षात आल.
वाटेने खाली
उतरून गेल्यावर वाघ दरवाजा पहिला.राजाराम महाराज,ताराराणी साहेबाना पाळणा करून
येथूनच बाहेर काढले गेले होते.परत फिरून,आवरून गड उतरण्यास प्रारंभ केला.

2 दिवसात रायगड पाहणं
म्हणजे अशक्यच.पण अनुभवाची शिदोरी पूर्ण भरून गेली होती.इतिहासाचे अनेक नवीन पैलू
समोर आले.Knowledge आणि information यातील दरी जाणवली .पाचाडला देशमुखांकडे जेवण
केले. trekshitiz ने मला आणि प्रथमेश ला राजमुद्रेची प्रतिमा भेट दिली.सर्वांचा निरोप
घेऊन पुण्याकडे गाडी दामटली.

अष्टविनायक जेंव्हा
गाडीवरून केले तेंव्हा वाटलं होतं कि पावसाळ्यात ताम्हिणी तून जायलाच
हवं.महाराजांनी इच्छा पूर्ण केली,पण.इतका प्रचंड पाऊस कधीच पहिला नव्हता.तीन
फुटांवर समोर दिसत नव्हतं,वीज दोन वेळा शेजारी पडल्यासारखी वाटली.पण शेवटी
“त्याची” साथ होतीच,पुण्यात सुखरूप पोचलो          AgaiN THANK YOU TREK
KHITIZ AND ANANDAJI!!!!!!

LAST BUT NOT THE LEAST PRATHMESH NANNAJKAR,MY TREKKING
FRIEND.




Replies:
Posted By: tushardhuri
Date Posted: 23 Oct 2015 at 11:07am
मित्रा

खूप छान लिहल आहेस. वाचताना खूप छान वाटलं. मला काही कारणास्तव नाही येत आला ट्रेकला पण तुझा लेख वाचून ट्रेकला आल्याचा आनंद  मिळाला.

TD


-------------
TD


Posted By: devadeshmukh
Date Posted: 24 Oct 2015 at 8:28am
मस्त श्रेयस...


खुप छान लिहील आहेस मित्रा.



Posted By: Umeshhkarwal
Date Posted: 26 Oct 2015 at 12:16pm
khup chhan mast 
Smile



Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk