Print Page | Close Window

दिनविशेष 4 जानेवार

Printed From: TreKshitiZ
Category: Information Section
Forum Name: Articles on Indian History
Forum Description: Articles on Indian History
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=310
Printed Date: 06 Nov 2024 at 2:19pm
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: दिनविशेष 4 जानेवार
Posted By: chaitanya
Subject: दिनविशेष 4 जानेवार
Date Posted: 04 Jan 2015 at 6:01pm
दिनविशेष 4 जानेवारी

1 . सन 1851, पेशवा दुसरा बाजीराव यांचे कानपूर जवळ ब्रम्हावर्त येथे निधन

2 . सन 1881, लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी मराठी वृत्तपत्र 'केसरी' ची स्थापना केली.

लोकमान्य टिळकांनी जनतेला स्वातंत्र्य चळवळीस उद्युक्त करावयाच्या व सामाजिक परिवर्तनांसाठी जनजागृतीचा एक महत्त्वाचा भाग या विचारांनी १८८१ मध्ये 'केसरी'हे वृत्तपत्र सुरू केले. 'केसरी'चे प्रथम संपादक गोपाळ गणेश आगरकर यांनी १८८८ पर्यंत काम केले. आगरकर हे बुद्धिवादी होते. त्यांनी प्रारंभीच्या काळात जनतेच्या विचार परिवर्तनाविषयक लिखाणांवर भर दिला. समाज सुधारणांच्या मूलगामी विचारांतून सामाजिक सुधारणा वेग धरू शकतील याबाबत त्यांनी जागरूकतेने सामाजिक सुधारणांवर आग्रही राहून 'केसरी'त लिखाण केले. त्याचबरोबर राजकीय स्वातंत्र्याचाही पुरस्कार केला. आगरकरांचा सडेतोडपणा, वैविध्य यामुळे 'केसरी'ची लोकप्रियता वाढली खरी; परंतु पुढे टिळक व आगरकरांत वैचारिक मतभेद वाढत गेल्यामुळे १८९० पासून 'केसरी'चे काम लोकमान्य टिळक पाहू लागले.



Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk