Print Page | Close Window

खंजीर

Printed From: TreKshitiZ
Category: Information Section
Forum Name: Ancient and Medieval Weapons
Forum Description: In this forum information about Ancient and Medieval Weapons will be uploaded.
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=27
Printed Date: 29 Dec 2024 at 6:56am
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: खंजीर
Posted By: amitsamant
Subject: खंजीर
Date Posted: 16 Jun 2012 at 2:47pm

Khanjir

खंजीर हे हलके, लहान पण घातक शस्त्र आहे. याच्या दुधारी पात्यास दोन ठिकाणी वळणे असतात; त्यामुळे पाते नागमोडी दिसते खंजीराची मूठ लाकूड, हस्तीदंत, सोने, चांदी यापासून बनवलेली असते. खंजीराचे पाते ६ ते १५ इंच लांब असते. खंजीराच्या नागमोडी आकारामुळे घाव खोलवर व जीवघेणा होतो. खंजीराचे पाते चांदीने मढविलेल्या म्यानात ठेवले जाते. खंजीर हे मुघलांचे प्रमुख अस्त्र होते.

Khanjir, Ancient & Medieval weapons Khanjir, Ancient & Medieval weapons

      खंजीर हे ओमान देशात वापरले जाणारे परंपरागत शस्त्र आहे. ओमानच्या राष्ट्रीय ध्वजावरही खंजीर विराजमान आहे. ओमान देशात पुरूषांमध्ये पौंगडावस्थेत पदार्पण केल्यानंतर खंजीर बाळगायला सुरूवात होते. १९७० पर्यंत खंजीर हे केवळ शोभेसाठी अंगावर बाळगण्याचे शस्त्र बनले होते व खंजीराचे पाते म्यानातून बाहेर काढणे हे भयंकर कृत्य समजले जात असे कारण त्याचा उपयोग बहुधा बदला घेण्यासाठी वा हत्या करण्यासाठी केला जात असे.




Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk