आंबेजोगाईची लेणी (हत्तीखाना) लेण्यांचा प्रकार :- हिंदु (ब्राम्हणी) लेणी जिल्हा : बीड श्रेणी : सोपी
बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई हे प्राचीन गाव तेथील योगेश्वरी देवीच मंदिर यामुळे प्रसिध्द आहे. या मंदिरा पश्चिमेस जयंती नदीच्या तीरावर हिंदू (शैव) लेणी आहेत. या लेण्यामधे असलेल्या मोठ्या हत्तीच्या शिल्पांमुळे या लेण्यांना स्थानिक लोक हत्तीखाना या नावाने ओळखतात.
लेणी ;- आंबेजोगाई येथील लेणी खडकात खोलवर खोदलेली आहेत. काळानुसार उन वारा पाऊस यामुळे या लेण्यांची झीज झालेली आहे. लेण्याचे प्रवेशव्दार दक्षिणेला असून पायर्या उतरून दगडात कोरलेल्या छोट्या प्रवेशव्दारातून लेण्याच्या प्रांगणात प्रवेश करता येतो. प्रवेशव्दारासमोर दोन हत्तींची भव्य शिल्प आहेत. प्रांगणात नंदीमंडप आहे. नंदिमंडपाच्या समोर लेण्याच्या दोन बाजूला दोन हत्तींची भव्य शिल्प आहेत. लेण्यात सभामंडप व गर्भगृह कोरलेल आहे. सभामंडप ३२ खांबांवर तोललेला आहे. गर्भगृहाच्या बाजूला ३ खोल्या कोरलेल्या आहेत. त्यात सप्तमातृका, शिव, महिषासूरमर्दिनी यांच्या मुर्ती आहेत. लेण्याच्या प्रांगणात एक पायर्यांची विहिर खोदलेली आहे.
जाण्यासाठी :- मुंबई पुण्याहून आंबेजोगाईला जाण्यासाठी एसटी बसेसची सोय आहे. रेल्वेने परभणी (९५ किमी ) किंवा परळी (२५ किमी) येथे उतरून आंबेजोगाईला जाता येते.
आजुबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- १) मुंबई, पुण्याहून आंबेजोगाई जाण्यासाठी थेट बस सेवा आहे. आंबेजोगाई - धर्मापूरी अंतर २७ किमी आहे. खाजगी गाडीने किंवा रिक्षाने धर्मापूरीला जाता येते. वहानानेही थेट किल्ल्याच्या प्रवेशव्दारापर्यंत जाता येते. २) मुंबई, पुण्याहून लातूर एक्सप्रेसने लातूरला जावे. लातूरहून खाजगी वहानाने किंवा बसने लातूर - आंबेजोगाई हे अंतर ६५ किमी आहे.
Ambejogai :- Dist Beed. (Yogeshwari Temple)(Yogeshwari Mandir)
|