Print Page | Close Window

कट्यार

Printed From: TreKshitiZ
Category: Information Section
Forum Name: Ancient and Medieval Weapons
Forum Description: In this forum information about Ancient and Medieval Weapons will be uploaded.
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=25
Printed Date: 27 Dec 2024 at 3:41pm
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: कट्यार
Posted By: amitsamant
Subject: कट्यार
Date Posted: 16 Jun 2012 at 2:35pm

Katyar, Ancient & Medieval Weapons

कट्यार हे मराठा पध्दतीचे शस्त्र आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आवडते शस्त्र होते. त्यांच्या कमरेला शेल्यामध्ये कट्यार नेहमीच असायची. छत्रपती शिवाजी महाराजांचा असा दंडक होता की, प्रत्येक सैनिकाजवळ तलवार, ढाल या प्रमुख शस्त्रांबरोबर एक छोटे शस्त्र असले पाहिजे, जसे शेल्यामधील कट्यार, अथवा अस्तनीमध्ये बिचवा. युध्दात वेळप्रसंगी हे शस्त्र वापरता येत असे.

      कट्यार हे छोट्या शस्त्रांपैकी सर्वात प्रभावी शस्त्र आहे; त्यामुळे त्याला भारतभर प्रसिध्दी मिळाली व वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी आपल्या कारागिराकडून कट्यारी बनवून घेतल्या. त्या कट्यारींवर त्या- त्या प्रदेशांची छाप पडली व कट्यारीचे अनेक प्रकार तयार झाले. राजा, राणी व दरबारातील मान्यवर सतत आपल्याबरोबर कट्यार बाळगत असत. कट्यारीची लांबी १० इंच ते २० इंच च्या दरम्यान असते. कट्यारीचे पाते, नख्या व मूठ हे तीन भाग असतात. हे तीनही भाग अखंड धातूमध्ये ओतून कट्यार बनविली जाते. काही कट्यारींमध्ये हे तीनही भाग रिव्हेटने एकत्र जोडलेले असतात.

कट्यारीचे प्रकार:

१) मराठा कट्यार:- १० ते २० इंच लांबीची अखंड ओतीव असते, तिचा अर्धाभाग पकडण्यासाठी असून हाताचे संरक्षण करण्यासाठी दोन उभ्या पट्‌ट्या असतात.

२) मुघल कट्यार:- पाते, नख्या, मूठ असे कट्यारीचे तीन भाग रिबेटने जोडलेले असतात पाते बहुतांश:तलवारीचेच वापरतात नख्या व मूठ यांच्यावर नक्षीकाम केलेले असते.

Hydrabadi Katyar

३) हैद्राबादी कट्यार:- याचे पाते लांब व रुंद असते ते पातळ पत्र्याचे बनविलेले असते. या कट्यारीत हाताचे संरक्षण करण्यासाठी मूठीवर संरक्षण कवच असते, त्यामुळे मनगटापर्यंत हाताचे संरक्षण होते. हैद्राबादी कट्यारी १५ इंचापासून २५ इंचापर्यंत लांब असतात.

Hydrabadi Katyar

४) मानकरी कट्यार:- शोभिवंत, मजबूत, जाडजूड व सोन्या चांदीचे नक्षीकाम केलेली असते.

५) सैनिकांची कट्यार:- साधी पण मजबूत असते.

६) स्त्रिया व मुले यांची कट्यार:-  स्त्रिया व मुलांसाठी लहान आकाराच्या, कमी वजनाच्या शोभिवंत कट्यारी बनवल्या जात.

कट्यारीचे इतर प्रकारही आहेत जसे, जंबीया, खंजीर, खंजराली, पेशकबज इत्यादी.

Katyar, Ancient & Medieval WeaponsKatyar, Ancient & Medieval WeaponsKatyar, Ancient & Medieval WeaponsKatyar, Ancient & Medieval Weapons

Katyar, Ancient & Medieval Weapons




Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk