Avismarniya Bhorgiri ani Bhimashankar
Printed From: TreKshitiZ
Category: Adventure Forum
Forum Name: Monsoon Trekking
Forum Description: All about trekking in rains, best locations, safety measures, precautions.
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=336
Printed Date: 27 Dec 2024 at 7:46am Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com
Topic: Avismarniya Bhorgiri ani Bhimashankar
Posted By: Shreyas Pethe
Subject: Avismarniya Bhorgiri ani Bhimashankar
Date Posted: 05 Aug 2015 at 9:48am
खूप दिवसांपासून इच्छा होती भीमाशंकर ट्रेक करायची .मोहन शी बोलणं झालं आणि लगेच तयारी चालू केली.तो म्हणाला राजगुरुनगर पासून बसावं लागेल ,मी तयारच होतो..मला काहीही करून ट्रेक करायचा होता ,अगदी त्यासाठी तहसीलदार बाई ना वडील आजारी आहेत म्हणून थाप पण मारली !!!! रात्री मित्राच्या घरी शिर्डी ला पोहोचलो ,मग मस्तपैकी सकाळी आवरून आम्ही दोघेही संगमनेर ला निघालो. त्याने मला संगमनेर ला सकाळी ६ वाजता सोडले आणि मी लगेचच पुणे बस ने राजगुरुनगर च्या दिशेने कूच केले.मोहन ला संपर्क करून मी चास (कमान) ला जायच ठरवलं. मला TREKSHITIZ चास ला भेटले.कुटुंब वाटत होता ते एक..थोडा वेळ थांबून तिथे चहा-नाश्ता केला आणि पुढच्या प्रवासाला लागलो...अंदाजे ११ वाजत आले होते... भोरगिरी म्हणजे किल्लेवजा एक टेहेळणी ची जागा अशासाठी बांधला गेलेला किल्ला..तिथल मंदिर सुंदर..स्कर्ट घातलेली गणपतीची मूर्ती रोमन आणि ग्रीकांशी त्या काळी चालू असलेल्या व्यापाराची साक्ष देणारी..कौठेश्वर मंदिराचे जुने अवशेष त्याची प्राचीन सुंदरता स्पष्ट करत होते.त्यानंतर एक छोटीशी ओळख परेड झाली .सगळे मुरलेले होते त्यासोबत एक नन्हा शिपाई पण होता १५ ट्रेक केलेला!!! भुरभूर पावसात भोरगिरी वर पोहोचलो.मी डबा आणला न्हवता पण तसा मला अजिबात जाणवल नाही.भोरगीरीवरील पाण्याचे कुंड,विरभद्राची मूर्ती,महादेव पिंडी तसेच भग्नावस्थेतील प्रवेशद्वार पाहत गुप्त भीमाशंकर कडे प्रयाण केले. वाटेत येणाऱ्या झाडांची,फुलांची,ऐतिहासिक गोष्टींची,पक्षांची माहिती अमित अदा,चिन्मय,प्रणोती,सुगंधा सांगत होतेच. गुप्त भीमाशंकर एक अविस्मरणीय अनुभव ठरला.तो पाण्याचा प्रवाह,गौरव आणि सचिन ने केलेली पाण्यातील साखळी,पाठीचा मसाज आणि शेवटी ती लपलेली महादेवाची पिंड!!!!!! पावसात भिजतच घनदाट अरण्यातून भीमाशंकर गाठलं.जबरदस्त भिजलो होतो.मुंबईच्या डबेवाल्यांच्या धर्मशाळेत निवासाची उत्तम व्यवस्था केली होती.रात्री जेवणाच्या आधी छोटे छोटे ग्रुप करून नाटुकले सदर केले.आम्ही मुकाभिनय केल्याने आम्हाला प्रथम क्रमांक मिळाला!!! झोपताना TD ने TREKSHITIZ ची ,चिन्मय आणि प्रणोती ने FLOURA AND FAUNA IN BHIMASHANKAR WILDLIFE SANCTURY ची,सुगंधाने फुलांबद्दल माहिती दिली.अमित दादा ने आम्ही ज्या मार्गाने आलो त्याचे ऐतिहासिक महत्व सांगितलं .जेवण खूप चं झालं ,तिथूनच एक मस्त घोंगडी घेऊन स्वर्गात गेलो!!!! ६ वाजता WAKE UP CALL झाला.चहा-नाश्ता आटोपून नागफणी पाहून आलो.अमित दादा सोबत वेगवेगळया विषयांवर चर्चा झाली.महाराजांचे दुर्ग बांधणीचे तंत्र,पद्मदुर्ग,सिंधुदुर्ग बद्दल चं माहिती मिळाली.येताना भीमाशंकर आणि भीमेचा उगम याचे दर्शन घेतले.प्रसन्न वाटलं .ती घंटा पहिली.चिमाजी आप्पांचा पराक्रम!!!! आल्यावर जेवण करून गणेश घटने उतरण्यास सुरुवात केली.उतरताना सारखा पदरगड साद घालत होता.पुढच्या वेळेस पदरगड सर् करायचाच या इराद्याने घात उतरलो.सुंदर धबधबे,निबिड अरण्य,मुसळधार पाऊस,त्यात सगळ्यांची साथ.कधी खांडस ला पोचलो समजलेच नाही.. भोरगिरी आणि पदरगड या व्यापारी मार्गावरील टेहेळणी दुर्गांमधील सुंदर ट्रेक दोन दिवसात कापला.कौठेश्वर आणि भीमाशंकर हि विश्रांती स्थाने पहिली.नवीन ट्रेक वेड्यांची ओळख झाली.जाणकार साथीदार मिळाले.नवीन नाती जुळली.अविस्मरणीय अनुभवांनी गच्च भरलेल्या या प्रवासाने खूप काही शिकवले.
|
Replies:
Posted By: amitsamant
Date Posted: 05 Aug 2015 at 10:26am
|