छोटासा पण सुंदर कि
Printed From: TreKshitiZ
Category: Adventure Forum
Forum Name: Monsoon Trekking
Forum Description: All about trekking in rains, best locations, safety measures, precautions.
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=355
Printed Date: 23 Dec 2024 at 11:21pm Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com
Topic: छोटासा पण सुंदर कि
Posted By: Shreyas Pethe
Subject: छोटासा पण सुंदर कि
Date Posted: 11 Jun 2017 at 1:48pm
तसं पाहायला गेलं तर नावापासून सुरुवात होती.प्रथमच नाव ऐकत होतो,”सोंडाई”.विसापूरच्या वेळीच शार्दुल कडे नाव दिला होतं.तयारी महिनाभर आधीच चालू झाली होती रिझर्वेशन पासून.ठरल्याप्रमाणे मी आणि ओंकार (माणकेश्वर) २ जुलैला सिद्धेश्वरने बसलो. ५.३० च्या आसपास कर्जतला उतरलो.दौंडच्या पुढेच पाऊस कोसळायला सुरुवात झाली होती.अक्षरशः रप रप आवाज येत होता.ट्रेकक्षितिज टीम आम्हाला ७.३० च्या सुमारास लोणावळ्यात भेटली.प्रथमेशही पुण्यातून आला होता.पोहे व चहाचा करून सहा टमटम मधून ‘वाव्हरले’ गावाकडे निघालो. सोबत मेंबर्स बरेच होते.त्यामुळे मजा येणार होती.सोबतीला पाऊस होताच.आमची संख्या ४७ पर्यंत गेली होती.ओळख परेड झाली.सहा वर्षांची ‘सांज’ पासून सुमती काकुंपर्यंत सगळे उत्साहात होते.जातानाच एक छोटं धरण लागलं.’वाव्हरले’ गावाच्या मागेच बांध घातला होता.तो पार करून सोंडाईकडे निघालो.पाऊस थांबायचे नाव घेत नव्हता.त्यामुळे आजूबाजूची सर्व डोंगररांग झरे आणि धबधब्यानी भरून गेली होते.अशाच एका धबधब्यात डुंबण्याचा मनसोक्त आनंद घेतला.घसरगुंडी,दंगा यामुळे सर्वाचा आनंद ओसंडून वाहत होता.
काही वेळातच एका सपाट ठिकाणी येऊन पोचलो.जोडटाक्यांनी दर्शन दिले.इतक्यातच त्यांची स्वच्छता झाल्याचे शार्दुलने सांगितले.तीसुद्धा भरून वाहत होती.त्या ठिकाणापासून माथ्यावर जाण्यासाठी शिडीची व्यवस्था केलेली आहे.शिडीच्या वरच्या तोंडाशीच एक जोडटाके नजरेस पडते. माथ्यावर काही देवी देवतांच्या मूर्ती,घंटा अशा गोष्टी पहावयास मिळतात.या देवी सोंडाई नावाने गावात ओळखल्या जातात.कोणतीही निवाऱ्याची सोय गडावर नाही.वारा आणि पाऊस अक्षरशः बोचत होते.तिथेच वर निमिशाने आजूबाजूच्या प्रदेशाची आणि किल्ल्याची ओळख करून दिली.माथेरानचा डोंगर,मोरबे धरण येथून स्पष्ट दिसतात.टेहेळणीसाठीचा किल्ला हाच या किल्ल्याचा मुख्य उद्देश असावा.मी माझ्यावर सोपवलेली जबाबदारी पार पाडली.किल्ल्यांवरील ‘टाक्यांचे महत्व’त्यांची रचना इ.ची माहिती सविस्तर सांगण्याचा प्रयत्न केला. खाली उतरताना सुद्धा पावसाने उघडीप दिली नाही.एका ठिकाणी जेवणासाठी डबे सोडले.अश्विनीच्या कृपेमुळे यावेळीही ‘मेजवानी’ मिळाली.पावसाने कृपा केली.जेवण झाल्यावर एक छानसा खेळ खेळलो.काही नाटिका सादर केल्या.धमाल आली. ४.३० पर्यंत सोंडेवाडी गावात उतरलो.ही वाट अतिशय साधी आहे.पावसामुळे थोडी घसरडी बनली होती एवढंच.सांजनेपण मस्त साथ दिली.गोड आहे मुलगी.छानसे फोटोज काढले.पावसाळ्यातला पहिला ट्रेक मस्त झाला.अक्षरशः शरीराचा प्रत्येक भाग भिजला.पावसामुळे अधिक रंगत आली.ट्रेकक्षितिज सदस्यांची साथ नेहमीप्रमाणे मिळाली.शर्दुलने या एवढ्या मोठया ताफ्याला छान सांभाळले.सर्वांच्या शिस्तप्रिय वागण्याने जोरदार पावसातही ट्रेक उत्तम पार पडला.पुण्यातून ओंकार सोबत ११.०० वाजता Passenger ने निघालो.नेहमीप्रमाणे Late Passenger ने ९.०० सकाळी सोलापूर गाठले.
|
|