गावाचे नाव :- पाटणादेवी जिल्हा :- जळगाव जवळचे मोठे गाव :- चाळीसगाव
चाळीसगाव येथील गौताळा अभयारण्याच्या गेटपासून १.५ किमी अंतरावर महादेव मंदिर अशी पाटी आहे. या मंदिराच्या मागेच कन्हेरगड आहे. पाटणा गावाच्या पुढे रस्त्यावरून उजव्या बाजूला वळून ५ मिनिटात आपण पुरातन हेमाडपंथी महादेव मंदिरापाशी पोहोचतो. ८ फूट उंच दगडी चौथर्यावर हे पूर्वाभिमुख मंदिर उभे आहे. चौथर्यावर फरसबंदी केलेली आहे. या चौथर्यापसून ६ फूट उंचीवर मंदिर बांधलेल आहे. मंदिर ७५ फूट लांब ,३६ फूट लांब ,१८ फूट उंच आहे. मंदिराचे गर्भगृह, सभामंडप व वर्हांडा असे तीन भाग आहेत. मंदिराच्या सभामंडपात नंदीची मुर्ती आहे. गर्भगृहात शंकराची पिंड आहे. गर्भगृहाच्या पट्टीवर गणपती , सप्तमातृका कोरलेल्या आहेत. मंदिराच्या छ्तावर नक्षी बनवलेली आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूस वेगवेगळया मुर्ती कोरलेल्या आहेत. ऊन पाऊस व वार्यामुळे मंदिराबाहेरील मुर्तींची झीज झालेली आहे.
आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- १) महादेव मंदिरामागिल डोंगरावर कन्हेरगड आहे. २) महादेव मंदिरापासून १ कि.मी अंतरावर पाटणादेवीचे पूरातन मंदिर आहे. ३) पाटणादेवी परीसरातील डोंगररांगेत धवलतीर्थ, केदारेश्वर, केदारकुंड, व पितळखोरे लेणी आहेत.
जाण्यासाठी :- जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव हे महत्वाचे शहर रेल्वेने व रस्त्याने सर्व महत्वाच्या शहरांशी जोडलेले आहे. चाळीसगाव पासून १८ किमी अंतरावर पाटणादेवीचे प्रसिध्द मंदिर आहे. पाटणादेवीचे मंदिर व कन्हेरगड गौताळा अभयारण्यात आहे. अभयारण्याचे गेट सकाळी ६.०० ते संध्याकाळी ६.०० पर्यंत उघडे असते. चाळीसगावातून सकाळी ६.०० पासून दर अर्ध्या तासाने पाटणादेवीला जाण्यासाठी एसटीची बससेवा आहे. त्याशिवाय चाळीसगावातून पाटणादेवीला जाण्यासाठी ६ आसनी रिक्षापण उपलब्ध आहेत. अभयारण्यापासून पाटणादेवी मंदिरापर्यंत जाणार्या रस्त्यावर अभयारण्याच्या गेटपासून १.५ किमी अंतरावर (पाटणा गावाच्या पुढे) महादेव मंदिर अशी पाटी आहे. या मंदिराच्या मागेच कन्हेरगड आहे. रस्त्यावरून उजव्या बाजूला वळून ५ मिनिटात आपण पूरातन हेमाडपंथी महादेव मंदिरापाशी पोहोचतो.
Temples in Maharashtra, Ancient Temples in Maharashtra Mahadev Mandir :- Village :- Patan, Dist :- Jalgaon, Nearest city :- Chalisgaon
|