शिवरायांचा
पोवाडा..
-सौ. रत्नमाला
दामाजी पाटील
शिवजन्मापूर्वी
महाराष्ट्रावर
स्वराज्य आपुले नव्हते
आदिलशहा निजामशहा सत्ता
गाजवीत होते..
शिवजन्मापूर्वी
महाराष्ट्रात
संतानी जागृती केली
अन्यायाविरुद्ध
लढण्याची
स्फूर्ती त्यांना दिली..
मराठे शूर भोसले
घराणे
फार पराक्रमी होते
वेरूळ गावाचे पाटील
मालोजी शिवभक्त होते..
रामकृष्ण भीम अर्जुन
पराक्रमांच्या
गोष्टी सांगून
रयतेचा वाली म्हणून
शिवा
आला जन्म घेवून..
शिवरायांचा
जन्म शिवनेरीवर झाला
शिवाईदेवी प्रसन्न
होवुनी
आशीर्वाद त्यांना दिला ..
घोड्यावर स्वार होणे तलवार चालवणे
यात शिवराय तरबेज झाले
न्याय निवाडा कसा करावा
त्याचे शिक्षण दादोजीने दिले
..
शून्यातून स्वराज्य तयार करण्याचा
संकल्प त्यांनी केला
शिवरायांच्या
हाकेने हो
सारा मावळा जागा झाला..
रायरेश्वराच्या
मंदिरात
शपथ त्यांनी घेतली
हर हर महादेव
गर्जना
महाराष्ट्रात
घुमली..
तोरण गड घेवूनी
तोरण बांधले
परकीयांचा बंदोबस्त करुनी
हिरे मोती पाचू
लोक जमविले...
प्रतापगडावर
अफजलखानाला
क्षणात धुळीत मिळवले
बोटे छाटून शायीस्तेखानाला
महालातून हकलविले..
वीर बाजीच्या रक्ताने
पावनखिंड पावन झाली
पुरंदरच्या
लढाईने
मुरारबाजीने
शर्थ केली..
पुरंदरच्या
तहामध्ये
तेवीस किल्ले गेले
तरी बहादूर शिवाजी राजे
मुळीच नाही खचले..
आग्र्याहून
सुटताना
त्यांनी ना ना
युक्त्या केल्या
बादशहाच्या
हातावर
हळूच तुरी दिल्या..
कोंढाणा सर करताना
शूरवीर तानाजी गेला
शिवराय वदले हळ
हळूनी
माझा गड आला
पण सिंह गेला..
शिवरायांच्या
पराक्रमाचे
नाव जगभर झाले
स्वराज्याच्या
रक्षणासाठी
ते छत्रपती झाले..
तारीख तीन एप्रिल
सोळाशे ऐंशी बारा
वाजण्याला
सर्वाना दुख सागरात
लोटुनी
रयतेचा वाली गेला..
असा शिवाजी राजा होता
महाराष्ट्राचा
प्राण
आपण सारे करू
तयांना
कोटी कोटी प्रणाम..
|