Print Page | Close Window

Takmak Wachwa

Printed From: TreKshitiZ
Category: Adventure Forum
Forum Name: Safe Climbing Initiative
Forum Description: Safe Climbing Initiative (SCI) is the only organization working for the Mountain Safety in India. .  This is a social org
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=198
Printed Date: 26 Jan 2025 at 12:14am
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: Takmak Wachwa
Posted By: Deepali Lanke
Subject: Takmak Wachwa
Date Posted: 25 Nov 2013 at 10:43pm
                                टकमक वाचवा !!

                                                                                                                                                                                    - दीपाली लंके

उपेक्षित आणि दुर्लक्षित असलेल्या साधारणतः २००० फूट उंचीवर असलेल्या टकमक दुर्गाला वाचवण्याचे आवाहन काल श्रीदत्त राउत यांनी ट्रेक क्षितीज संस्थेने आयोजित केलेल्या एकदिवसीय ट्रेक मध्ये २४ नोव्हेंबर २०१३ रोजी केले.प्रश्न असा कि कोण आहेत हे श्रीदत्त राउत ....हे एक असाधारण असलेले व्यक्तिमत्त्व आहे ज्या माणसाने निस्वार्थी पणे महाराष्ट्रातील दुर्ग संवर्धनासाठी झोकून दिलेले आहे.आणि खरे पाहता त्यांच्या त्यनच्यमुलेअच गडाचा खरा आणि जिवंत इतिहास आम्हाला अनुभवायला मिळाला .

 

अशा या आमच्या टकमक दुर्गावर ट्रेकिंग सकाळी वाजता डोम्बीवालीतून शिवाजी पुतल्याहून चालू झाली...ट्रेक साठी २९ जन सहभागी झाले ...सकाळी सकाळी नंदू मामानी मला आरती आणि प्रज्ञा ला तांब्याची अंगठी दिली आणि ट्रेक साठी बेस्ट विशेस दिल्या धन्यवाद मामा Smile ...

 

सगळ्यांनी इडली चटणी वर ताव मारला आणि टकमक दुर्गाचा प्रवास चालू झाला ...सकवार गावा मध्ये पोहचून आम्ही इंट्रो रावुंड घेवून दुर्ग कडील ट्रेकिंग ला शुभारंभ केला...खालून अफिल्यवर्च मनात धसकी भरवणारा ह्या टकमक वर बर्याच मार्गांनी पोहचता येते...वाट चुकू नये म्हणून दोन माडाची झाडे लक्षात ठेवायची असा श्रीद्दत्तानी सांगितले आणि आम्ही मनाशी पक्की खुणगाठ बांधली ....घनदाट जंगलातून जाणारी वाट हि चाधावाची होती...ट्रेकर्स ला सोयीस्कर आणि भविष्याच्या दृष्टीने मार्ग मिळावा म्हणून रूट मार्किंग केली याचा प्रतिनिधित्व राहुल मेश्राम आणि मोहन शेट्टी यांनी केले आणि अमित दादा यांनी त्यांना मदत केली ....या ट्रेक चे वैशिष्ट्य म्हणजे सगळ्या वयोगटातील ट्रेकर्स सहभागी झाले होते ३रित असलेल्या अथर्व आणि ५वित असलेल्या कश्वी आणि ६२ वर्षांचे आजोबा या साग्लाय्न्मध्ये आम्ही होतो....रख रखत्या उन्हात आम्ही चढण चढतच राहिलो पण तरीही दुर्गा की आम्हाला जवळ करत नव्हता ...उन्हामुळे विकेट पडत होत्या परत चार्ज होवून ...एकमेका सह्या करू अशा रीतीने आम्ही घोडा तर सर केलाच पण टकमक सुद्धा ....माझ्या मनाच्या खेळांमुळे आणि पूर्व तयारी केल्यामुळे माझ्या जोड्यांनी दम तोडला आणि मला दम लागण्यास सुरुवात झाली ...आणि चालू झाला माझा अनवाणी प्रवास टकमक वर ; दगड माती धोंडे पाला पाचोळा आणि तापलेले कातळ यावरून चढाई आणि उतरण करताना जम लागली...पण इच्छा शक्तीच्या बळावर तुम्ही कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊ शकता त्याचा हेय एक अगदी उत्तम उदाहरण आहे असाच मी म्हणेन Smile Tongue Clap

आणि माझ्या इच्छा शक्तीला आणि जिद्दीला मी स्वतःहूनच खरोखर सलाम करेल...दुर्गावर पोहचून पाण्याच्या टाक्याजवळ आम्ही ठाण मांडले आणि श्रीदात्तानी काढून दिलेल्या पाण्याने सर्वांची तहान शांत केली ...दुर्गावर असणार्या १३ टाक्यापैकी फक्त एकाच टाक्यातील पाणी पिण्यायोग्य होता ते सुद्धा वर्षानु वर्षे कठीण परिश्रम केल्यामुळेच...जेवताना दुर्गच्या इतिहासावर श्रीदात्तानी खूपच सोप्या भाषेत टकमक चा इतिहास बारकाव्यासह सांगितला एकता एकता...अगदी इतिहास परतल्याचा भास झाला आणि चिमाजी अप्पा ,पोर्तुगीसे शिवराई आणि संभाजी राजा यांच्या काळातील घडामोडी कशा रीतीने झाल्या याचा वृतांत त्यांनी अत्यंत मार्मिक शब्दात मांडला ...आणि गाव कार्यांची स्वार्थी वृत्ती आणि इतिहासापारी असणारी नावड पाण्याच्या टाके साफसफाई मध्ये सापडलेल्या तोफ्गोल्याना विकून स्पष्ट होते ...घनदाट जंगले;चाहु बाजूनी वेढलेल्या डोंगर रांगा मध्ये वसलेल्या टकमक ची दुरवस्था झाली आहे...आणि येत्या कला संवर्धनाचे काम चालूच केले पाहिजे...दुर्गावर भार्मंती करून मोक्याची ठिकाणे पाहून आणि एक जबरदस्त घोषणाश्रीदात्तानी दिली आणि जो दर्या खोर्यान मध्ये आवाज गुंजला आणि ज्या भावना मनात दाटून आल्या त्याला तोडच नाही ...आणि परतीचा प्रवास चालू झाला...श्रीदात्ताना रानडुक्कर दिसले ते कोयता घेवून धावले आणि त्याला पळवून लावले...नाही तर...विचारच नको...उतरताना घसारा असल्यामुळे बरेच लोक घसरले आणि धडपडले सुद्धा आणि नेहा बालांखे :  या पुरस्कार चे मानकरी ठरले....अगदी नवखे आणि मेम्बेर्स सुद्धा यात होते..त्यांची नवे अशी कि मौसम,मंदार,मोहन,प्रियांका आणि रितिका आणि छोटू अथर्व पण ......

 

असा हा साधा सोपा वाटणारा टकमक भल्या भल्यांची लावतो ...आणि अश्याच या साग्लायंची लावणाऱ्या ट्रेक चे नेतृत्व तुषार धुरीने पार पडले...

 

श्रीदत्तांचे संशोधकांना आणि ट्रेकर्स ला आवाहन :-

 

टकमक वाचवा मोहीम :- पाण्याच्या टाक्यांची साफ सफाई मोहीम

टकमक च्या प्रवेशद्वाराकडून जंगलातून दुरागावर पोहचण्याची वाट शोधणे

मराठ्यांनी प्राण वाचवण्यासाठी जो भुयारी मार्गाचा वापर केला तो शोधणे

 

अशाच प्रकारे टकमक आणि महाराष्ट्रातील दुर्गांचे संवर्धन करणे आणि प्रत्येक ट्रेक ग्रुप ने या कामात सहकार्य करणे अपेक्षित आहे....Star




Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk