निवांत ट्रेक - पुरंदर आणि मल्हारगड - दीपाली लंके
प्रस्तावना : ट्रेक क्षितीज संस्थेने आयोजित केलेल्या पुरंदर आणि मल्हारगड उर्फ सोनोरी किल्ल्याला दिलेली विस्मरणीय भेट आनंदी , आल्हाद ,आणि अगदीच सुखदायक होती.म्हणूनच या ट्रेक चे वर्णन मी निवांत ट्रेक असे करत आहे.३३ हौशी ट्रेकर्स नि हा निवांत ट्रेक अनुभवला.या ट्रेक चे प्रमुख आकर्षण प्र.के. घाणेकर हे दिग्गज होते.खूपच माहितीपूर्ण आणि विविध फुलांचे ज्ञान मिळाले.( तसा मी आणि बरेच जन उनाडक्या करत मागेच होतो पण तरीही घेत येईल आणि झेपेल तेवढं ज्ञान आम्ही घेतलं..
दिवस पहिला :- मी रात्री ३ वाजता सहभागी झाले आणि सुरु झाला निवांत ट्रेक चा प्रवास ..सकाळी साधारणतः आम्ही ४ वाजता नारायणपूर गावी पोहचलो आणि बस मधेच झोप काढण्याचा प्रयत्न केला ..सकाळी फ्रेश होवून सद्गुरू प्रसन्न येथे गरम गरम पोहे आणि चहा झाल्यवर गड पायथ्याशी पोहचलो ..इंट्रो रावुंड झाल्यावर ट्रेक चे आकर्षण असणारे प्र.के.घाणेकर सरांची वाट पाहता पाहता आणि निसार सौंदर्य ...डोंगरांनी पांघरलेला हिरवा शालू डोळ्यात साठवून घेत असतानाच सर आले आणि सुरु झाला खरा अभाय्स्पूर्ण ट्रेक चा प्रवास....पुरंदर आणि वज्रगड एकाच पठारावर असले तरी मिलिटरी कॅम्प असल्यामुळे प्रवेश मिळवण्याकरीता ओळखपत्र दाखवावे लागते आणि आम्हाला परवानगी मिळाली ती फक्त पुरंदर पाहण्याची...मी मयुरी आणि आशिष वैद्य ने ओळखपत्र न दाखवता गर्दीचा फायदा घेत कसा प्रवेश मिळवला ते तर न उलगडणार गुपितच आहे....गेट मधून प्रवेश केल्याबरोबर इतिहास आणि वास्पती आणि फुलांच्या माहितीची देवन घेवाण चालू झाली...आणि द्यानात खूपच भर पडली ..त्यापैकीच मयुरी ने पाठ केलेल्या फुलांची नावे पुढील प्रमाणे आहेत :- कल्प,विष्णुकांत,निसुर्दी,उंदरी,रानमुग,दुरंगी शेवरा,निलांबरी,तेरडा,सोनकी,घाणेरी,इंद्रनील,पुनर्नवा,झारवाड,आणि गोधडी हे आहेत....फारश्या वस्तू नसल्या तरी प्रशस्त असा हा किल्ला चर्च,देवूळ आणि मुरारबाजी यांच्या स्मारकाने नटला आहे....जैव विविधतेने नटलेल्या किल्ल्यावर रमत गमत मापिंग करताना महेंद्र दादा सोबत मजा आली...आणि परत नारायणपूर गावी येवून सद्गुरु प्रसन्न मध्ये भोजन करून निद्राधीन झालो ....
दिवस दुसरा :- सकाळ झाली ती प्रसन्न वातावरणा मध्ये आणि परत सद्गुरु प्रसन्न मध्ये शेवटचे पोहे,मिसळ चहा घेवून राम राम ठोकला आणि मोहीम मल्हारगड सुरु झाली ...सोनोरी गावात पोहचून प्रशस्त वाद आणि त्यात असलेले देवूळ,बुरुज,वाड्यांचे अवशेष,विहीर पाहून मन भरून आले...आणि गावातूनच दिसणाऱ्या सोनोरी किल्ल्याला गवसणी घालण्यची वेळ झाली ...मराठ्यांनी बांधलेला शेवटचा किल्ला त्रिकोणाकृती असून खूपच सुंदर आहे...चढताना थोडा घाम गाळण्याची वेळ आली...आणि थांबत फोटो काढत किल्ल्यावर पोहचलो आणि मोहीम सोनोरी उर्फ मल्हारगड फत्ते झाली...गडावर बुरुज,देवूळ,पाण्याचे टाका,विहीर आणि मस्त सोंड या सगळ्यांची नोंद करून घेतली..या सगळ्या गोष्टी अगदी निवांत पाने चालू होत्या ते विसरता कामा नये ....डोळ्यात आठवणी साठवून घेत घेत खाली उतरलो आणि हॉटेल मोहिनी मोहीम चालू झाली सगळ्यांना जम भूकुने घेरले होते ...मस्त राइस प्लेट वर तव मारताना मजाच आली...आणि अश्या या निवांत ट्रेक चा प्रवास सुखदायक झाला...
ठळक मुद्दे :
मयुरी आणि माझी सुमती देसाई यांनी घालून दिलेली सागर वेणी फोटो साठी सगळीकडे पोज ( धन्यवाद महेंद्र दादा,पंकज,अमित दादा आणि ज्या सगळ्यांनी आमचे फोटो काढले ) फीडबक कार्यक्रम शेवटी मयुरीची प्रणोती ने घालून दिलेली खजुरी वेणी आणि तिने फोटो काढण्यासाठी केलेली धडपड
अशा या निवांत ट्रेक चे नेतृत्व चैतन्य सबनीस आणि तुषार धुरी यांनी यशस्वी रित्या केले.
|