Print Page | Close Window

Baramotanchi Vihir

Printed From: TreKshitiZ
Category: Information Section
Forum Name: Forts of Sahyadri in Hindi
Forum Description: In this section one can find information of forts of Sahyadri in Hindi.
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=276
Printed Date: 04 Jan 2025 at 2:38pm
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: Baramotanchi Vihir
Posted By: amolnerlekar
Subject: Baramotanchi Vihir
Date Posted: 15 Oct 2014 at 5:28pm
बारामोटेची विहीर

सह्याद्रीत फिरताना जाणवत की ह्याच्या पोटात अशा असंख्य वास्तू लपलेल्या आहेत आणि त्याची अजून म्हणावी तशी आणि म्हणावी तेवढी माहिती अजून आपल्याला उपलब्ध झालेली नाही. हेच नेमक जाणवलं साताराजवळील लिंब गावातील बारामोटांची विहीर बघताना. सामान्य जमिनीच्या पातळीखाली एखादी एवढी असामान्य आणि विशाल ऐतिहासिक वास्तू असू शकते हे कळल्यावर आश्चर्य वाटल्यावाचून राहात नाही. 

      

सातारा शहरापासून मुंबई-पुण्याकडे यायला लागल्यावर साधारण १२ कि.मी वर आपल्याला लिंब फाटा लागतो आणि तेथून उजवीकडे आत गेल्यावर ३ कि.मी. वर लिंब गाव लागते. ह्या गावाच्या दक्षिणेला २ कि.मी. अंतरावर बारामोटेची विहीर वसलेली आहे. 
(लिंब फाट्याच्या आधी लागणाऱ्या नागेवाडी  गावातून पण येथे जाता येते). 

   

या विहिरीचे बांधकाम शके १६४१ ते १६४६ या कालावधीत श्रीमंत सौ. विरुबाई भोसले ह्यांनी केले. विहिरीचा आकार अष्टकोनी आणि शिवलिंगाकृती असून ह्या विहिरीचा व्यास ५० फूट आणि खोली ११० फूट आहे. ह्या विहिरीतून पाणी उपसण्यासाठी एकावेळी १२ मोटा लावता येऊ शकायच्या आणि त्यामुळे ह्याचे नाव बारा मोटा असलेली विहीर म्हणजेच 'बारामोटेची विहीर' असे पडले. विहिरीतून उपसलेले पाणी मुख्य:त आजूबाजूच्या आमराईसाठी वापरण्यात येत असे. 

    

जमिनीपातळीखाली उभारलेल्या महालात ही विहीर आहे.खाली उतरायला चालू करताना समोरच एक शिलालेख दिसतो. काही पायर्या उतरून खाली आले की आपल्याला महालाचा मुख्य दरवाजा बघायला मिळतो. ह्या दरवाज्यावर चक्र लावलेली दिसतात. ह्या दरवाज्याच्या आतील बाजूस शरभाची दगडी मूर्ती नजरेस पडते. तिकडून पुढे आल्यावर आपण महालात प्रवेश करतो. महालात चित्रे कोरली आहेत. तसेच वाघ, सिंहाची शिल्पे बसवलेली आहेत. विहिरीला प्रशस्त असा जिना आणि चोरवाटा आहेत. विहिरीवर १५ थारोळी आहेत. ह्या चोरावाटांतून वर आले की १२ मोटांची जागा, दरबाराची आणि सिंहासनाची जागा बघायला मिळते. सातारचे राजे श्रीमंत छ. प्रतापसिंह महाराज ह्यांची विहिरीच्या महालात खलबते चालत असा उल्लेख आहे. 

    

बारामोटेची विहीर ही एक अप्रतिम कलाकृती आहे. महालाचे दगडी बांधकाम त्यावेळेच्या स्थापत्यशास्त्राचे उत्तम उदाहरण आहे आणि म्हणूनच लिंब सारख्या लहानश्या गावातही ही ऐतिहासिक विहीर आजही आपले अढळ स्थान टिकवून आहे. 

 -- अमोल नेरलेकर 



Replies:
Posted By: AARTI
Date Posted: 15 Oct 2014 at 8:08pm
अमोल लेख मस्त लिहला आहेस… आणि माहितीपण…


Posted By: Umeshhkarwal
Date Posted: 17 Oct 2014 at 12:01pm
khupcha chhan aani mast lihale aahe amol  n
Smile


Posted By: tushardhuri
Date Posted: 18 Oct 2014 at 8:56pm
Chan mahiti lihali ahes anhi photo pan mast ahet. Mala pan jayla avdel baramota vihir bagayla



-------------
TD


Posted By: saurabhshetye
Date Posted: 10 Dec 2014 at 10:59am
Masta Lihila aahes!!



Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk