Print Page | Close Window

भंडारा डोंगर

Printed From: TreKshitiZ
Category: Information Section
Forum Name: Caves in Sahyadri
Forum Description: TreKshitiZ Writing team would be uploading the information of Caves in Sahyadri in this section.
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=291
Printed Date: 27 Dec 2024 at 9:48am
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: भंडारा डोंगर
Posted By: amitsamant
Subject: भंडारा डोंगर
Date Posted: 29 Nov 2014 at 11:16am
भंडारा लेणी (भंडारा डोंगर)
लेण्यांचा प्रकार :- बौध्द लेणी
जिल्हा : पुणे  श्रेणी : मध्यम


Bhandara Dongar (Leni), Dehu road, Dist Pune
      देहु गावापासून दुरवर असलेल्या भंडारा डोंगरावर तुकाराम महाराज येउन बसत आणि इश्वराच्या भजन किर्तनात रंगुन जात. तुकाराम महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या डोंगरावर आता तुकाराम महाराजांचे मंदिर बांधलेले आहे. डोंगरावर जाण्यासाठी चार पदरी रस्ता झाल्याने वर्षभर वारकरी आणि पर्यटकांचा डोंगरावर राबता असतो. 

Bhandara Dongar (Leni), Dehu road, Dist Pune

या डोंगरच्या मागच्या बाजूस उतरण्यासाठी एक पायवाट आहे. या पायवाटेने १० मिनिटे खाली उतरुन गेल्यावर आपल्याला कातळात कोरलेली गुहा दिसते. ्या गुहेत वारकरी संप्रदायाचे विद्यार्थी वास्तव्यास असतात. या गुहेसमोरच पाण्याचे एक कुंड आहे. गुहेच्या वरच्या बाजूला एक स्तुप आहे. लेण्याचे छप्पर कोसळल्यामुळे हा स्तुप उघडा पडलेला आहे. स्तुपावर किंवा इतर कुठेही गौतम बुध्दाची प्रतिमा दिसत नाही. त्यामुळे ही लेणी हिनयान कालिन असावी. याशिवाय येथे एक दोनन अर्धवट खोदलेल्या गुहा पाहायला मिळतात. 

Bhandara Dongar (Leni), Dehu road, Dist Pune Bhandara Dongar (Leni), Dehu road, Dist Pune


जाण्याचा मार्ग :-  पुणे - नगर रस्त्यावर तळेगाव पासून ७ किमी अंतरावर भंडारा डोंगरावर जाणारा पक्का रस्ता आहे. या रस्त्याने  डोंगरावर गेल्यावर रस्त्याच्या विरुध्द बाजूस एक पायवाट खाली उतरते. (ही पायवाट चटकन सापडत नाही त्यामुळे मंदिरातील वारकरी किण्वा दुकानदारांना विचारावे). या मळलेल्या पायवाटेने १० मिनिटे खाली उतरल्यावर आपण प्राचिन बौध्द गुंफ़ेपाशी पोहोचतो.

आजुबाजूची पाहाण्याची ठिकाणे :-  मुंबई आणि पुण्यापासून भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर व इंदुरीचा किल्ला ही तिनही ठिकाण एका दिवसात पाहाता येतात.


तुकाराम महाराज, देहू, तळेगाव जवळची पाहाण्याची ठिकाणे, पुण्या जवळची पाहाण्याची ठिकाणे.
Tukaram Maharaj, Dehu,  Talegaon, Chakan, Pune



Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk