गडावर झाडे जी असतील ती राखावी. याविरहीत जी जी झाडे आहेत ती आंबे, फणस, चिंचा ,वड पिंपळ आदिकरून थोर वृक्ष निंबे ,नारींगे आदिकरून लहान वृक्ष तसेच पुष्पवृक्ष वल्ली किंबहुना प्रयोजक, अप्रयोजक जे झाड होत असेल ते गडावर लावावे, जतन करावे. --- आज्ञापत्र
सुधागड किल्ला म्हणजे पुण्यातून कोकणात उतरणार्या "सवाष्णीच्या घाटाचा" पहारेकरी. या प्राचीन किल्ल्याच्या माथ्यावर विस्तिर्ण पठार आहे. एकेकाळी झाडांनी आच्छादलेला गडमाथा आज मात्र उजाड झालेला आहे. गडसंवर्धनाची इतर कामे करतांना ही गोष्ट "ट्रेक क्षितिजियन्सच्या" प्रकर्षाने जाणवली. त्यातूनच गडावर वृक्षारोपण करण्यासाठी दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला गडावर ट्रेक नेण्यास सुरुवात झाली. गेली १२ वर्षे आलेल्या अनेक अनुभवातून आम्ही शिकत गेलो असे म्हणण्यापेक्षा निसर्गानेच आम्हाला अनेक धडे दिले.
घराच्या बाल्कनीतल्या कुंडीत किंवा घराच्या परीसरात झाडे लावणे आणि घरापासून १५० किलोमिटरवर झाडे लाऊन ती वाढवणे यातील अडचणी आमच्या ध्यान्यात यायला लागल्या. त्यातून लावलेल्या झाडांची जोपासना करण्यासाठी डिसेंबरमध्ये सुधागड किल्ल्यावर ट्रेक नेण्यास सुरुवात झाली. उन्हाळ्यात लागणारे वणवे, गडावरील मोकाट गुरे, पाण्याची कमतरता इत्यादी अडचणींना तोंड देत आम्ही आजपर्यंत ६० झाडे जगविण्यात यशस्वी झालो.
यावर्षी सुध्दा वृक्षारोपण करण्यासाठी ट्रेक क्षितिज संस्थेने दिनांक २२ व २३ जून २०१३ रोजी सुधागड किल्ल्यावर ट्रेकचे आयोजन केलेले आहे. या ट्रेकमध्ये पहील्या दिवशी सकाळी किल्ल्यावरील पठारावर ३० रोपटी लावण्याची ,तसेच दुसर्या दिवशी गड पाहून परत येण्याची योजना आहे. या ट्रेकचे नोदंणी शुल्क रुपये ६००/- आहे. अधिक माहितीसाठी :- वैभव पालांडे - ९८३३९१२००१ & www.trekshitiz.com
|