Print Page | Close Window

पत्र

Printed From: TreKshitiZ
Category: Information Section
Forum Name: कविता संग्रह
Forum Description: पोवाडे, कविता आणि स्फूर्ती गीते
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=261
Printed Date: 26 Dec 2024 at 8:49pm
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: पत्र
Posted By: saurabhshetye
Subject: पत्र
Date Posted: 23 Sep 2014 at 2:59pm
अफझलखान निघाला असल्याची सूचना देणारे 
समर्थ रामदासांचे पत्र – सन १६५९


विवेके करावे कार्य साधन ।

जाणार नर तनू हे जाणोन ।

पुढील भविष्यार्थी तन ।

हाटोचि नये ॥1॥

चालू नये असन्मार्गी ।

त्यता बाणल्या अंगी ।

घूवीरकृपा ते प्रसंगी ।

दासमहात्म्य वाढवी ॥2॥

जनीनाथ आणि दिनकर ।

नित्य करिती संचार ।

घालिताती येरझार ।

लाविले भ्रमण जगदिशे ॥3॥

दिमाया मूळ भवानी ।

हे सकल ब्रह्मांडाची स्वामिनी ।

येकान्ती विवेक करोनी

इष्ट योजना करावी ॥4॥


(प्रत्येक ओवीचरणाचे आद्याक्षर घेतल्यास 

“विजापूरचा सरदार निघाला आहे” 

ही सूचना मिळते.)




Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk