Print Page | Close Window

पाळणा

Printed From: TreKshitiZ
Category: Information Section
Forum Name: कविता संग्रह
Forum Description: पोवाडे, कविता आणि स्फूर्ती गीते
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=255
Printed Date: 11 Jan 2025 at 3:57am
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: पाळणा
Posted By: saurabhshetye
Subject: पाळणा
Date Posted: 12 Aug 2014 at 11:33pm
पाच देवींचा पाळणा

गुणि बाळ असा जागसि का रे वाया? ॥ नीज रे नीज शिवराया ॥धृ॥
अपरात्रीचा प्रहर लोटला बाई ॥ तरी डोळा लागत नाही ॥
हा चालतसे चाळा एकच असला ॥ तिळ उसंत नाहि जिवाला ॥
निजवायाचा हरला सर्व उपाय ॥ जागाच तरी शिवराय ॥
चालेल जागता चटका ।
हा असाच घटका घटका ।
कुरवाळा किंवा हटका ।
का कष्टविशी तुझी सावळी काया ? ॥ नीज रे नीज शिवराया ॥1॥
ही शांत निजे बारा मावळ थेट ॥ शिवनेरी जुन्नरपेठ ॥
त्या निजल्या ना तशाच घाटाखाली ॥ कोकणच्या चवदा ताली ॥
ये भिववाया बागुल तो बघ बाळा ॥ किती बाई काळा काळा ! ॥
इकडे तो सिद्दी-जमान ।
तो तिकडे अफजुलखान ।
पलिकडे मुलुखमैदान ।
हे आले रे तुजला बाळ धराया ॥ नीज रे नीज शिवराया ॥2॥

-     गोविंदाग्रज



Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk