गावाचे नाव :- धर्मापूरी जिल्हा :- बीड जवळचे मोठे गाव :- आंबेजोगाई
आंबेजोगाई पासून २७ किमी अंतरावर धर्मापूरी नावाच एक प्राचीन धर्मक्षेत्र आहे. या गावात चालुक्य कालिन प्राचीन केदारेश्वर मंदिर याची साक्ष देत आजही उभ आहे. या गावात मुसलमानी राजवटीच्या काळात किल्ला बांधला गेला. हा किल्ला धर्मापूरीचा किल्ला म्हणून ओळखला जातो. या किल्ला बांधण्यासाठी जे दगड वापरले गेले आहेत त्यात मंदिरांवरील अनेक शिल्प पहायला मिळतात. या वरून या गावात अनेक मंदिरे होती व त्यांचेच दगड वापरून हा किल्ला बांधला गेला. धर्मापूरीचा किल्ला व अप्रतिम कोरीव शिल्पे असलेले केदारेश्वर मंदिर ही दोनही ठिकाण आवर्जून पाहाण्यासारखी आहेत. केदारेश्वर हे प्राचीन मंदिर गावा बाहेरील शेतात आहे. मंदिराचे छत अस्तित्वात नाही. मंदिरावर अप्रतिम शिल्प कोरलेली आहेत. मंदिराच्या परीसरातही अनेक शिल्प पडलेली आहेत.
आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- १) धर्मापूरी पासून २७ किमीवर असलेल्या आंबेजोगाई येथे प्राचीन हिंदू लेणी (हत्तीखाना) व योगेश्वरी मंदिर पहायला मिळते. २) आंबेजोगाई पासून २५ किमी अंतरावर परळी वैजनाथ हे १२ जोर्तिलिंगापैकी एक जोर्तिलिंग आहे. ३) धर्मापूरी पासून आंबेजोगाई मार्गे ५२ किमीवर धारूर किल्ला आहे. ४) धर्मापूरी पासून किनगाव , अहमदपूर मार्गे ७७ किमीवर उदगीर किल्ला आहे. जाण्यासाठी :- १) मुंबई, पुण्याहून आंबेजोगाई जाण्यासाठी थेट बस सेवा आहे. आंबेजोगाई - धर्मापूरी अंतर २७ किमी आहे. खाजगी गाडीने किंवा रिक्षाने धर्मापूरीला जाता येते. वहानानेही थेट किल्ल्याच्या प्रवेशव्दारापर्यंत जाता येते. २) मुंबई, पुण्याहून लातूर एक्सप्रेसने लातूरला जावे. लातूरहून खाजगी वहानाने किंवा बसने लातूर - आंबेजोगाई हे अंतर ६५ किमी आहे. ३) मुंबई, पुण्याहून रेल्वेने परळी वैजनाथ किंवा परभणी गाठावे. परळी वैजनाथ हे १२ जोर्तिलिंगापैकी एक आहे. परळी वैजनाथ ते आंबेजोगाई २५ किमी व आंबेजोगाई -धर्मापूरी २७ किमी अंतर आहे. परभणी ते आंबेजोगाई ९५ किमी अंतर आहे.
सूचना :- १) खाजगी वाहानाने आंबेजोगाई मंदिर व लेणी आणि धर्मापूरी किल्ला ही सर्व ठिकाणे एका दिवसात पाहून होतात. २) उदगिर आणि धारूर किल्ल्याची माहिती साईटवर दिलेली आहे.
Temples in Maharashtra, Ancient Temples in Maharashtra Kedareshwar Mandir :- Village :- Dharmapuri, Dist :- Beed, Nearest city :- Ambajogai
|