Print Page | Close Window

केशवराज मंदिर (आसु

Printed From: TreKshitiZ
Category: Information Section
Forum Name: Temples of Sahyadri
Forum Description: TreKshitiZ Writing team would be uploading the information of Temples in Sahyadri in this section.
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=302
Printed Date: 08 Jan 2025 at 11:42am
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: केशवराज मंदिर (आसु
Posted By: amitsamant
Subject: केशवराज मंदिर (आसु
Date Posted: 13 Dec 2014 at 9:39am
केशवराज मंदिर (आसुद, दापोली)
गावाचे नाव :- आसुद
जिल्हा :- रत्नागिरी
जवळचे मोठे गाव :- दापोली, मुरुड हर्णे.


Keshavraj Mandir , Aasud , Dapoli
दोपोली हे रत्नागिरी जिल्ह्यातील महत्वाच गाव आहे. दापोली जवळ असलेल्या आसुद गावी व्याघ्रेश्वराचे आणि केशवराजचे प्राचिन मंदिर आहे. आसुद गावातील दाबकेवाडीत्तील डोंगरात आणि घनदाट वृक्षराजीत केशवराजाचे पुरातन मंदिर आहे. मंदिरासमोरच दगडी बांधणीच्या पाटातून आणलेल्या पाण्याची गोमुखातून संततधार पडत असते.  निसर्गरम्य वातवरणात असलेल्या या साध्याश्या विष्णु मंदिराच्या गाभार्‍याच्या दरवाजावर वरच्या बाजूस गणपती आणि उजव्या व डाव्या बाजूस अनुक्रमे हनुमान व गरूड कोरलेले आहेत. विष्णूच्या मुर्तीचे त्याच्या हातातील शंख, चक्र , गदा, पद्म आयुधांच्या धारण करण्याच्या क्रमावरुन २४ प्रकार पुराणात (अग्नि,पद्म,स्कंद) सांगितलेले आहेत. केशवराज मंदिरातील विष्णू मुर्तीच्या हातात डावी कडून उजवीकडे अनुक्रमे पद्म, शंख, चक्र, गदा आहेत. त्यामुळे ही केशव मुर्ती आहे, म्हणून हा "केशवराज".

Keshavraj Mandir , Aasud , Dapoli

जाण्यासाठी :- मुंबईहून दापोलीला पोहोचावे. दापोलीहुन ८ किमी वरील मुरुड हर्णे गाव आहे. दापोली हर्णे रस्त्यावर दापोली पासून साधारणपणे ५ किमीवर आसुद गावातील दाबकेवाडीत  जाणारा फ़ाटा आहे. आसुद गावातील दाबकेवाडी पर्यंत गाडीने जाता येते. दाबकेवाडीतून केशवराज मंदिराकडे जाणारा मार्ग नयनरम्य आणि सुंदर आहे. आसुद गावातील दाबकेवाडीतून व्यवस्थित बांधलेली पायवाट नारळी पोफ़ळीच्या बागेतून उतरत ओढ्यापाशी (ओहळापाशी) येते. या ओढ्यावरचा पुल ओलांडल्यावर पायर्‍यांच्या वाटेने १० मिनिटे चढून गेल्यावर आपण केशवराज मंदिरापाशी पोहोचतो.  
  
आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :-  १) http://trekshitiz.com/marathi/Suvarnadurg-Trek-S-Alpha.html" rel="nofollow - सुवर्णदुर्ग , http://trekshitiz.com/marathi/Goa_Fort-Trek-G-Alpha.html" rel="nofollow - गोवा , http://trekshitiz.com/marathi/Fattegad-Trek-F-Alpha.html" rel="nofollow - फ़त्तेदुर्ग , http://trekshitiz.com/marathi/Kanakdurg-Trek-K-Alpha.html" rel="nofollow - कनकदुर्ग .
 
२) http://trekshitiz.com/trekshitiz/discussionboard/_topic300.html" rel="nofollow - आंजर्ल्याचा कड्यावरचा गणपती .
 
३) व्याघ्रेश्वर मंदिर, आसुद.
 
४) http://trekshitiz.com/trekshitiz/discussionboard/_topic301.html" rel="nofollow - दुर्गादेवी मंदिर, मुरुड हर्णे .
 
वरील सर्व ठिकाणांची माहिती साईटवर दिलेली आहे.

Keshavraji  Mandir , Asud, Dapoli, Murud Harne, Keshavraj  Temple , Aasud, Dapoli, Murud harne,  Temples in Kokan , Temples near Dapoli, Temples in Ratnagiri District. Vishnu Mandir in Kokan.




Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk